पिकनिक पुराण
शेवटी पिकनिक नावाचा
मैत्री एकत्रीकरणासाठी व एकूणच
निसर्गदर्शनसाठी पूरक उपक्रमास
हातभार लावण्यासाठी आम्हा मित्र-मैत्रिणीचं टोळकं जागा
नक्की करण्याच्या हेतूने
राबवलेली सो-कोल्ड
मिटींग आटपून, केवळ् आमचा
मित्र शंशागच्या सांगण्यावरुन
कोण्या एका नव्या
अजबश्या दुकानात चाललो होतो.
… सॉरी दुकान नाही… सर्विस सेंटर… आणि ते ही पिकनिक साठी … काय गरज .. माझ्या डोक्यात चालेल्या प्रश्नांना … कळेल तुला असं म्हणत उत्सुकता वाढवून ठेवली होती. आम्ही आल्या-आल्या एकत्र जमून पिकनिकचा स्पॉट ठरवून झाले की लगेच या शंशागच्या सांगण्यावरुन पिकनक सर्विस सेंटरकडे वळ्ण्याची ही पहिलीच वेळ. जमलेले आम्ही सारे जण चित्रा, मीनी, रीतू, प्रकाश आणि इतर शंशागच्या सांगण्यावरुन, पायपीट करत, आपल्याच धुदींत उडत चाललेल्या थव्याला शेवटी लगाम लागलाच…. ओ हो… फायनली आलं याच पिकनिक सर्विस सेंटर… सर्विस सेंटरची जागा तशी नेमकीच होती. पिकनिक आणि सर्विस सेंटर… म्हटलं दुकानाची पाटी तर पाहू.. ‘पाहून जीपीजी सेंटर’.. हे काय.. नाव… वेगळेपणाची हदद..
सर्विस सेंटरचा दरवाजा उघडला. एकमेकाला धक्के देत आम्ही सारेजण दुकानात मावलो एकदाचे… सगळ्यात पुढे शंशाग… सोन्याच्या दुकानाला शोभेल अशी काऊंटरची रचना होती. सेंटरच्या चारही भिंतीना वेगवेगळ्या प्रदेशाचे मोठामोठाले पोस्टर लावले होते. कुठे बर्फाच्छादीत काश्मीर, कुठे उंटासहित वाळवंट, उंचावरुन पडणारा केरळातला धबधबा… हॅअ.. स्लेफी स्टिक पण ठेवल्यात विकायला… पिकनिक किट पण पिकनिकच्या या ना त्या वस्तूचं भंडार.. या सगळ्यात `चित्रा’च लक्ष मात्र नेलपॉलिशकडे गेल… “यात काय खास?” चित्रानं नेहमीचा ठेवणीतला प्रश्न विचारला. तिला जगातल्या प्रत्येक क्षुल्लक गोष्टीत ना जाणे काहीतरी खास दिसे… देव जाणे. काउंटरवरची गर्दी बघून, आले का माझी `गि-हाईक’या अभिर्वात दोन पंचीवीशीतले तरुण.. आपली टाय सावरत समोर उभे राहले.
शुभ प्रभात.. नमस्कार मी समेर गायतोंडे … मॅडम हे नेलपॉलिश खास पिकनिकसाठी आहे.. हो हो स्पेशल.. मॅडम मी सगंळ समजावून सांगतो… असं म्हणत त्या गायतोंडेने त्या दुस-या आपल्या प्रतिनिधी मित्रांस नाही प्रतिस्पर्धी शत्रूंस बाजूला करत कमान स्वत:च्या हातात घेतली. “शुभप्रभात म्हणे, चांगल उन्हातून चालवत आणलं या शंशागने” मीराने पाण्याचा ग्लास रीता करत पुटपुटली. “तुमच्यापैकी शंशाग कोण?” गायतोंडेने हसत विचारलं. या गायतोंडेने …शंशागच काही कमिशन ठरवलंय की काय.., या पोरीचं घासाघीस करुन कमिशन उडवून देतील… मी मनातल्या मनात म्हटलं.
मित्रांनो ही आमची पिकनिक सर्विस देणारी कंपनी आहे. आपण पिकनिकला जातो.. एन्जॉय करतो.. घरी परतो… आणि मग पिकनिक कशी एन्जॉय केली ते सांगतो… प्रत्येकला सांगण कठीण असत. मग काय करता.. मग आपण फोटो सोशलनेटवर्किंग सार्डट वर अपलोड करतो. प्रत्येक वेळी फोटो चांगले येतातच असे नाही... हो ना… हा समेर गायतोंडे सुटतच चालला होता. आणि आम्हालाही ‘हो’ म्हणन्यावाचून पर्याय नव्हता. रीतू किचांळली ”माझे फोटो नेहमीच चांगले येतात”. “पण चित्रापेक्षा नाही” प्रकाश शांतपणे म्हणला आणि सगळ्यानांच हसू आलं. “प्रकाश असतानाही फॅल्श वापरल्यावर अजून काय होणार आहे..” शंशागने आपला कोपरा चित्राला मारत पुटपुटला. “नाचता येईना अंगण वाकडं.. तुझ्यातर प्रोफाईल फोटोला साध्या १०० पण लाईकस येत नाहीत, हॅ..अ..जाऊ दे आता मला फोटो गॅलरी नको ओपन करायला नको लावूस…. कीती weird pose देतेही. .माझे फोटो बघ.. OMG… सतिशने ही comment केलीय” रीतूने प्रकाशचा टोमणा जरा जास्तच मनावर घेतला होता बहुतेक, म्हणूनच इतक्या तावातावाने मोबाईलकडे बघत बोलत सुटली होती. चित्राही मग न राहवत बोललीच “इतक्या काही फुशारक्या मारण्याची गरज नाहीय.. समजलं ना.. मी लोकांना माकडाच्या पिल्लांनाही so cute म्हणून comment दिलेली बघितलय… आता या बया इथंच भांडता-भांडता एकमेंकाच्या झिज्यां उपटणार का असं वाटू लागलं.
तितक्यात, एक्झॅक्टली.. असं म्हणत गायतोंडेने आपलं तोंड उघडलं.. मुळात बदलत्या वातावरणात आपण पिकनिक नुसती एन्जॉय न करता ती अजून मेमोरेबल कशी करता येईल हे पाहत असतो.. इतकं असूनही आपल्या प्रत्येकाला, समान न्याय देणारा असा कोणीही फोटो काढण्याचा प्रयत्न करत नाही.. आणि आपल्याकडूनही सर्व जाणीवपूर्वक ठरवून काही होत असंही नाही… गायतोंडे अशी न्यायनिवाडाची भाषा मारुन नेमक आमच्या माथी नेमंक काय मारु पाहतो आहे यांची कल्पनाच येत नव्हती…. इतक्यात माझ्याकडे पाहत, मागच्या पिकनिकचे फोटो असतीलच ना… त्यांच्या या होकारर्थी प्रश्नाने शेवटी… गायतोंडेने माझा मोबाईल हातात घेत “हा फोटो इतका डल का आलाय… ती ही इतकी background चांगली असताना.. अहोहो या पोझला तुम्ही मान ताठ करायला पाहिजे होती… फोटो क्लास आला असता”. आता तर कहरच झाला..हा मोबाईल मी स्वत:च्या पैशांनी घेतालाय यापेक्षा अजून किती ताठ मानेने वागायचं.. असं मनातल्या मनात म्हणत मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करत असतानाच “अय्या हा फोटो दिलाच नाही तू मला किती स्मार्ट दिसतेय मी यात…” मीरा बोललीच.. पण जर का फोटो टॉप अंन्गल ने घेतला असता तर याला काही तोड नव्हती…गायतोंडेने आपल नाक खुपसणं पुन्हा चालू केलं तेही चेह-यावर स्मित राखत… गायतोंडे नेमक काय सांगू पाहत होता हे न कळ्ण्यासारखंच होत. आता हा काय आमचे फोटो एडिट करुन देणार काय?....
हो…हो… आजकाल आपण पण काय वन-डे पिकनिकचे प्लॅन करतो आणि महिना दोन-महिने त्या फोटोसहित जोडून घेतो.. आणि विचार करा जर त्यातला प्रत्येक फोटो चांगला निघाला तर आणि आपल्या ग्रुप मेंबरसोबत सगळ्याचे फोटो चांगले आले तर…गायतोंडेचं प्रवचन चालूच होतं. म्हणजे याला नेमंक म्हणायचयं… माझं डोक अजूनही याच विचारात होत. “म्हणजे प्रत्येक वेळी अनोळखी माणसाला दादा-पुता न करता एखादा hire केलेला माणूसच तुमच्या दिमतीला तुम्ही पिकनिकला आणला असेल तर”…. गायतोंडेचा हेतू आता कुठे माझ्या थोडा थोडा लक्षात आला होता… म्हणजे आपण पिकनिकच्या वेळी खर्चाकडे न बघता खुल्या दिलानं हात मोकळा करतोच ना थोडा अजून केला तर काय बिघडणार आहे. शे-हजार रुपये… गायतोंडे आता कुठे मेन पटरीवर येऊन कायतरी बोलत होता. आणि या मुलीसुध्दा इतरवेळी नेलपॉलिश पासून चपलापर्यंत आणि भाजीवाल्यापासून ते पेटोलपंपापयत घासाघीस करण्या-या बार्गीनक्वीनसुदधा या गायतोंडेच्या हा ला हा करत होत्या. गायतोंडेने मोहिनी केली की जादूटोणा…
अक्चुली, आमचा एक माणूस तुमच्यासोबत पिकनिकला येईल… तो तुमचे पिकनिकमध्ये फोटो काढेल.. गायतोंडे व्हवहारी भाषेत बोललाच एकदाचा. फायनली माझी टयुब पेटली.. म्हणजेच फोटोग्राफरच ना!… मी युरेकावाल्या माझ्या गगनभेदी आवाजात ओरडलो. समेर गायतोंडे नावाच्या प्राण्याने आपली नतद्रष्ट नजर माझ्या मोबाईलच्या दिशेने सरकवत पुन्हा आपली नकल्ली स्माईल बाहेर काढत, “चुकलात तुम्ही.. तो हनुवटी वर हात ठेवून काढलेला ब्लर फोटो तुमचाच ना”. “तो तुम्हाला पोझसहित फोटो काढायला सांगेल शिवाय आम्ही तुम्हाला महागडे गॉगल्स, हॅटस, खास पाच-सहा सेकंदात बदलता येतील असे एकाच रंगाचे पोशाख आणि मिस चित्रा हया स्पेशल पिकनिक एनस्टिक नेलपॉलिश ज्या पोशाखासहित मॅच करतील … आय नो यू लव्ह पॉउट पॉझ… आणि या नेलपॉलिश खरचं नखांना नक्षत्र बनवून टाकतात… सरसकट म्हटलं तर हे पॅकेज खूपच हॅपनिग आहे तुमच्यासाठी आणि बजेटमध्येही” गायतोंडेने रेट कार्ड पुढे केलं.
“याची काय गरज आहे” या माझ्या प्रश्नाला… यार याचीच तर गरज होती..यार इतके दिवस आपण हेच तर मिस करत होतो.. शी प्रकाश किती वाईट पदधतीने फोटो काढायचा ना.. आपण फार पूर्वीचं करायला हवं होत हे.. थॅक्स शंशाग.. चित्रा आणि मीराचं एकमत झालं एकदाचं तर… आमच्या एकूण पिकनिक बजेटला या ‘पाहून जी.पी.जी. सेंटर’ने चांगलाच मोठा केला होता. तरीदेखील मी शेवटचा प्रयत्न म्हणून ”यार आपल्यामध्ये एखादा अनोळखी माणूस.. ठीक वाटतयं काय?”. ”त्यात काय विशेष इतरवेळी तुम्ही तुमचे कॉमन फ्रेंड घेऊन येताच की नाय… बेजटमध्ये बसवण्यासाठी… तू तर मागच्या टाईमाला तुझ्या मामेआजीला घेऊन आला होतास… थेऊरचा गणपती आणि आजीचा नवस” रीतूच्या बोलण्यानी आजूबाजूला हसण्याच्या आवाजात माझ्या म्हणण्याविरोधात किती मोठी हवा आहे ते कळलं होत.
“पिकनिकची डेट आणि टाईमिंग कन्फम सांगा आणि आमचा माणूस तेथेच भेटेल” समेर गायतोंडेने आपली साठा उत्तराची कहाणी संपवली एकदाची. "बाय द वे एक गोष्ट विचारु.. तुमच नाव थोंड वेगळ आहे समेर.. काही खास कारण" मी आपलं उत्सुकतेने विचारलं. गायतोंडेने आपला खाकरणारा घसा साफ करत म्हटलं "काही विशेष नाही इतरापेक्षा वेगळं असावं म्हणून खास समीरच समेर करुन घेतलं.” मला त्यांच्या वेगळेपणाची कीव येत होती, समेरपेक्षा समेट असायला हवं होत
मी मनातल्या मनात पुटपुटलो. एव्हाना सर्व दुकानांच्या बाहेर आलोच होतो शंशागने पावती स्वत: जवळ ठेवली आणि आम्ही एकमेंकाचा राम-राम घेतला.
पिकनिकच्या आदल्या रात्रीपासून, निव्वळ् एक्साईटमेंन्टपोटी सकाळच्या कातरवेळी अलाम होणा-यापूर्वीच उठून घरच्यांनी बनवून दिलेल्या शिदो-या घेवून साडेसहा वाजता रेल्वेस्टेशनपाशी सगळे टाईमावर हजर होतो. अर्थात शंशागच्या चेह-यावर अजून झोप होती आणि रीतूचा अजून पत्ता नव्हताच. नेहमी सारखच…. “एकदाच्या आल्या मॅडम… तब्बल दहा मिनिट लेट… मला वाटलं आता काय सूर्याची कोवळी किरण डोक्यावर पडेपर्यंत वाट पाहावी लागणार की काय” प्रकाशचं टोमणं मारणं सकाळी-सकाळी चालू होतं. “तुझ्यासारख्या मडदूस झालेल्या माणसाला याची जास्त गरज आहे, हो की नाही!” रीतूचा पलटवार ही नेहमीचाच. पण आज तू खरचं खूप छान दिसतेयस… शंशागचा मूड काहीतरी सांगू पाहत होता. रीतूने गालावरची खळी आवरत, केसांना झटकत सेल्फी काढण्यासाठी मोबाईल काढणार इतक्यात “बहुतेक आज आंघोळ झालेली दिसतेय..रीतूची” चित्राने थंड आवाजात म्हणत मग कारंज्यासारख एक-एक करत सगळ्याच्याच चेह-यावर हास्याचे फवारे उडवून टाकले.
प्रवास दीड-दोन तासांचा.. तोही रेल्वेने…. म्हणजे तर आणखी धमाल, मग वर्षाचा विषय काढून मला चिडंवणे.. संदानदाच्या नावाने चित्राला छेडनं असू…. शंशागला रीतूच्या नावाने चिडवण् असो… किस्से आणि टाळ्या यांनी अख्खा डबा दणाणला होता. प्रत्येक टाळी, कोपरखळी का कोण जाणे मैत्रीचं नात अधिक घटट करत होतं. शंशागने आणलेले पोहे… अवघ्या पाच मिनिटांतच संपले… प्रवासातल्या एकेक स्टेशनागणिक माणसं कमी-अधिक होत होती. आणि शेवटी आमच्यासारखेच पिकनिकला निघालेले घोळके राहिले होते. आलं फायनली पिकनिक स्पॉट.. ये.. ये… वॉव.. समोर उंचावरुन कोसळ्णारा धबधबा.. सहज चढून जाता येईल अशी सोमेश्वर टेकडी.. आणि सूर्यास्त पाईन्ट… नेहमीच असंल तरी प्रत्येकवेळी नवीन वाटणार.
पोचल्या-पोचल्या चित्राची नजर काहीतरी धुडांळयाला लागली. “काय…बघतेयस नक्की” मी तिच्या विस्फारलेल्या डोळ्याकडे बघत म्हटलं. आणि ती ही तितक्याच तहानलेल्या आवेशात नाखुशीच्या स्वरात म्हणाली ”समेर गायतोंडेचा माणूस”. इतक्यात कोणीतरी पाठून थाप मारली, मागे वळून पाहतो तर. मध्यम अंगाचा, डोळ्यावर गॉगल, थ्री-फ्रोरथ पॅन्ट घातलेला. पाठीवर एक भलीमोठी बॅग अडकवलेला चेक्सच शर्ट परिधान केलेला वीस-एकवीस मुलगा फक्त हनुवटीवर उगवलेली झुपकेदार दाढीवरचा हात काढत मला म्हणाला.. मिस्टर सुशीर.. का?. “हो मीच सुशीर” मी स्वतःला सावरत म्हटलं. “हॅलो मी सुधीर डोंगरे.. P.R.(Picnic Representative) फ्रॉम पाहून g.p.g. सेंटर”, सुधीरशी ओळख झालीच. तुम्ही एकूण आठ जण ना! या सुधीरने आपला लॅपटॉप काढत (sheet)शीटकथा सुरु करत काही रकाने भरत होता. इतक्यात मी बाकीच्या पंटर-लोकांना हाका मारत गोळा केलं पण त्यांना एका सरळ रेषेत उभं करण जरा कठीणचं गेलं. आजूबाजूच्या लोकांच्या नजरा आम्हाच्यांकडून लष्कराच्या कवायतीच्या हेतूने पाहत जाणं स्वाभाविक होत. या सुधीरने आमच्यातल्या चार जणानां पुढे आणि बाकीच्या चार जण त्याच्या मागे असं उभं केलं.
“मित्रांनो, माझ्याकडे असलेल्या बॅगेत खूप सारे एक्यूपमेंन्ट आहेत. जे आपण वेळोवेळी वापरु…खूप सारे फोटे काढूच.. धमाल मस्ती.. तुम्ही पिकनिक एन्जॉय आणि यादगार कराल अशी आशा करतो” सुधीर बोलत होता. चला किमान हा तरी त्या समेर सारखा नाहीय. तर आपण आता एक शुभारंभ फोटो काढू… ओ.के. रेडी… तुम्ही मागे जाता का? नेहमी फोटो काढण्यासाठी पुढे उभा राहण्या-या शंशागला तू उंचपुरा आहेस ना म्हणत मागे टाकलं. बिचा-या शंशागचं खंर स्मॉईलचं हरवून गेलं. “मित्रांनो आता एक चीरफुल फोटो काढणार आहोत…. फक्त मी सांगतो ते जोरात ओरडून म्हणा.” सुधीर समजावत होता. मी आपलं हळू आवाजात घोळक्याला उददेशून म्हटलं की आता हा सुधीर नक्की गणपती बाप्पा मोरया म्हणायला सांगणार. रीतूने भुवया उंचावत नकाराथी मान हालवत ”हो का?” अशी पुटपुटली.
मी एक वाक्य म्हणेल. तुम्ही जोरात ओरडा… तूटो…! तूटो…! तूटो!.. आता हे काय नवीन.. आमच्या आठही जणांची ‘त’ ची बाराखडी सुरु झाली होती. शंशागने हळूच पुढे उभ्या असलेल्या प्रकाशच्या कानात कायतरी पुटपुटला आणि लागोलाग दोघंही सातमजली हसायला लागले.. तुटली.. तुटली… करत. बाकीच्या सगळ्यांना सुधीरच्या वाक्याची प्रतीक्षा लागून राहली होती. सुधीरने बोटाने एक-दोन-तीन चा इशारा करत जोरात ओरडला “तूट को तूट को” आणि आम्ही सारेजण ओरडलो… तूटो.. तूटो!! पण प्रकाश आणि शंशागने मात्र तुटली म्हणत… पोटावर हात ठेवत हसत होते. पण सुधीर जाम सिरीयस होऊन एका मागोमाग एक फ्रेम कॅपेचर करत होता आणि पुन्हा एकदा ओरडला तूटको तूटको…. आणि आम्ही पुन्हा एकदा का कोण जाणे हसत हसत तूटो म्हटलंसुदधा.
या तुटोघोषणेनंतर… आम्ही पिकनिक एन्जॉय सॉरी रिलॅक्स करण्याकरता म्हणून… त्या हिरव्यागार गवतावर चटई अंथरुण टाकत खुल्या निळ्याभोर आभळाकडे पाहत नेहमीच्या धकाधकीनंतर येणा-या साचलेपणा दूर करत एक टक पाहत, उडणा-या थव्याकडे नजर टाकत त्यातल्याच एखाद्या पक्षाकडे नजर स्थिरावत पार नजरेआड होईपर्यंत डोळ्यात साठवून ठेवत पुन्हा आजूबाजूच्या जगात डोकावण्य़ाचा खेळ चालू होता. "हा गॉगल महागडा आहे का?, ल्विश, लव्हेंडर कलर, खरंच तुझ्यावर सूट होईल" असं म्हणत रिया, चित्राने सुधीरने ठेवलेल्या गॉगलबॉक्स मधले गॉगल्स धुंडाळत होते. मी ही असाच एक गॉगल त्या पहुडलेल्या अवस्थेत लावणार इतक्यात…. त्याची गरज नाहीय मिस्टर सुशी… आणखी एखादा थवा असाच पाहत रहा… यू लूक फॅब… सुधीर पाच-सहा स्नॅप घेवून निघून गेला.
“माझा अस्सा सुधीर… सुधीर हा पिकं गॉगलवर … सुधीर आमच्या तिघीचा… हे माझा सोलो…” सुधीरच्या नावाची चालेली सुरवट वाढतच होती आणि त्यात आणखी पोझबुक नावाच्या विविध फोटो पोझ् दाखवणा-या पुस्तकाने हा राग अजूनच वाढवून ठेवला होता. मग आपलं फुलझाडावरचं प्रेम दाखवण्याकरता चाललेला खटाटोप यांनी त्या फुलझाडाजवळं जावून निवळ्ळ् पाकळ्या पकडून, ठरवून काटे टोचण्याच्या वेदनाकडे दुर्लक्ष करत, चेह-यावर हास्य कायम राखत… त्यांची चार-पाच पान खुंटलीच… दागिने, कपडे याबाबतीत निवडीच्या वेळी होणारा वेळप्रपंच हा फोटो काढण्याच्या हौसेसही लागू होतो हे समजण्यास पुरुष म्हणून ही पिकनिक कामी आली. अनंत या शब्दास लाजवेल इतके फोटो आणि पोझेस दिल्यानंतर साधारण तासाभरानंतर गॉगलदेखावा संपला एकदाचा. शंशाग-प्रकाशचं गॉगल परिचय पहिल्या पाच मिनिटातच संपला हे विशेष.
सुधीरच्या पेटा-यातून आता… अजून एक ‘इन्स्टंन्ट नेलपॉलिश’ नावाचा प्रकार बाहेर काढला. “व्हु ईज चित्रा” असं मुददाम म्हणत खास तुमच्यासाठी गायतोंडेनी दिलयं असं सांगत सुधीरने डब्बी चित्राकडे सोपवली. चित्राला तर स्वर्गाचे दरवाजे खुले केल्याचा आंनद ओंसडून वाहत होता आणि पुन्हा एकदा मॅचिंग गॉगल आलेच. बिचारा सुधीर.. कंडक्टरची सुटटया पैशाच्या चणचणी बाबतीत होणा-या अवस्थेस जाऊन पोचलेला.. यांच्यापासून तो पेटारा संभाळताना त्यांची पार नाकीनऊ झाली. पण निलिमाच्या तब्येतीच्या मानाने तिचा प्रत्येक फोटोतली तिची पोझ इतरांना न कळत बाजूला सारत होतीच नेलपॉलिश तर तिने मेहंदीसारखी अख्खा हातभर रंगवली होती आता फक्त होळी खेळणं बाकी होतं. अर्थात तिला पाऊट करत म्हणजे ओठांचा चबू करुन पोझ देणे जमत नव्हते हे पहिल्यांदा समजले. तिल्या या गोष्टीवरुन चिडवल्यावर या रुसूबाई रागीट लालंबुद चेह-याला पुन्हा हसरा करण्यास एक गोड गालगुच्चा घेतलेला गुप्र फोटो शिवाय तुटो..तुटोचा नाद पुरेसा होता.
एव्हाना अजून एक तास सहज उलटून गेला होताच. सुधीरने बोटाने इशारा करताच.. चलो चलो धबधबा एक एक करत आम्ही सारे धबधबापाशी पोचलो एकदाचे… पहिल्या वीस मिनिटांतच आम्ही सारेजण पार चिबं-चिबं होऊन भिजून गेलो होतो. इतक्यात “गाईज आता पुन्हा काही पोझेझ…” सुधीरने अंगठयाने इशारा करत कॅमेरा डोळ्यापाशी नेत आपल्या कामास लागला. शंशाग-प्रकाशंच एकमेकांकडे पाहत ‘तुटली’घोषणा सुरुच होत्या. बाकीच्यांच्यासुदधा 'तूट को तूट को' च्या आरोळ्या सुरु होत्या. उंचावरुन कोसळ्णा-या त्या पाण्याच्या धारात भिजण्यात पुन्हा-पुन्हा मजा येत होती. एवढयात “हे रे काय शंशाग” त्याच्या डोक्यावर फेस बघत मी म्हटलं. “काही नाही साबण! सकाळी लवकर उठायची सवय नाही ना… मग आघोळं राहिली करायची आणि आता काय पाण्याचाही तोटा नाही… हा थोडी जागा निराळी आहे पण ठीक आहे दोस्तांनो निसर्गाशी जवळीक साधायची यापेक्षा उत्तम संधी नाही” शंशाग ने आपली बाजू, लाजेचा लवलेशही न पाळता सांगितली. शंशागने अख्खं शरीर पाढं-या-शुभ्रफेसांने पार भरून टाकलं होतं. ट्रेनमध्ये रीतूला चिडवणारा हाच का तो?, याने पोहे सुदधा खाल्ले होते पारोश्या अंगाने… असं म्हणत सगळ्यांनी त्यांची खिल्ली उडवली. मग या सगळ्या हसण्यात सुधीर ही सामील झाला. सुधीरने आपल्या बॅगेतून अजून एक अस्त्र बाहेर काढलं. “अय्या सेल्फी स्टिक” चित्रा पुन्हा एकदा युरेकामुव्हेमेंट मध्ये आली. “नो प्रोम्बेम… वॉटरप्रुफ आहे” असं म्हणत सुधीरने स्टिक धबधब्यातल्या पाण्यात भिजलेल्या आमच्या हातात दिली. शंशागने या वेळी संधी न दवडता आपल्या उंचीचे गोडवे गात स्टिक पकडत होताच की, “कानाजवळ फेस राहायलाय” रीतू ओरडली. “कुठे” शंशाग कानाजवळ हात नेत म्हणाला एव्हाना सेल्फी स्टिक निलिमाच्या दणकट हातात स्थिरावली सुदधा. आणि निलिमा सेल्फी काढण्याच्या पवित्रात असतानाच सुधीरचा सूचनामय आवाज आलाच… “मित्रांनो एक दीर्घ श्वास घ्या… आणि फोटो किल्क होण्याअगोदर जोरात बोला ‘झुपेडा ग्रीप’ ”. हे आता काय नवीन आम्ही सारे आपआपसांत पुटपुटत होतो. शंशाग आणि प्रकाशंच मात्र पहिलंवाल ‘तुटली’च चांगल होत म्हणत एकमेंकाना टाळ्याचं सत्र सुरु केलं. मेढरांप्रमाणे आम्ही सुधीरच्या सांगण्यावरुन ओरडलो खरे पण फोटो खरंच नेहमीपेक्षा वेगळे येत होते. सुधीर आता कुठे स्लेफी स्टिकमुळे निवांत बसला होता. बाकी आमच्या सगळ्याचं हे स्वयंप्रतिमेचं भूत काही केल्या थांबत नव्हतं. मनसोक्त पाण्यात उडया मारत, उंचावरच्या धबधब्यातून कोसळ्ण्या-या पाण्याच्या धारेत उभा राहत निर्सगाचा अभिषेकीपणा अनुभवत एव्हाना खूप वेळ झाला होता. उन्हाचा जोरकसपणा वाढत होता. चिबं अंगाने पाण्यातून बाहेर येत उन्हामध्ये निवांतपणे पहुडून घेत टॉवेलने ओलं डोक फुसण्याची मजा काही औरच.
थोडयावेळाने एक-एक करत सगळ्यांनी आपल्या धबधबा ओढीला आहोटी घालत आणि शंशागने आपली आंघोळ आटपत घरुन आणलेल्या शिदो-या सोडायला सुरवात केली. ”अरे कुणी त्या सुधीरला सुदधा घ्या जेवायला जेवणानंतर फोटो काढणं बाकी आहे म्हणावं” प्रकाशंन आरोळी देत सुधीरला सुदधा या गोलाकार पंगतीत आणून बसवलं. मुळात आम्ही एकमेंकाचे शाळेपासूनचे मित्र-मैत्रिणी आणि आजदेखील शाळेतल्या मधल्या सुटटीतल्या डब्यासारखंच थोडसं भांडत-भांडत, थोडसं एकमेकांच्या डब्यातल्या पदार्थाचं कौतूक करत सगळे डब्बे गटटम केले सुदधा. यात निलीमाचा वाटा जास्त होता हे वेगळं सांगायला नको. “पण मालपोवे खरचं छान… पूर्वी आई बनवायची आता चित्रा स्वतः बनवते चवीत जराही फरक नाही” निलीमा रीतूला बोलत होती. “सुधीर यार खरंच तू काही जास्त घेतलंस नाही समेरने बजावलंय की काय!” शंशागने म्हटलं. “नाही मित्रा तसं काही नाही” सुधीर हसत हसत म्हणाला. सगळ्यांची जेवण आटपत आली होती सगळ्याच्या चेह-यावर थोडासा वामकुक्षीवाला मूड होत होता.
सुधीरने आपल्या बॅगेतून एक-एक करत एकाच रंगाचे वेगवेगळ्या साइजचे टीशर्ट काढले. अगदी लालभडक रंगाचे डिटयाचेबल फेटे. निलीमा सोडून बाकी सगळ्यानां आपला साइज शोधताना जास्त त्रास झाला नाही. सुरवातीला सर्वांना पाढं-या रंगाचे टीशर्टवर पुन्हा तूटोचे नारे देत आमची वारी सुटली होती. कधी धबधबाच्या शेजारी, कधी हनुमानासारखी टेकडी हातात ठेवल्याचे भास देणारे, कधी फुलपाखरासारखे हात बाहेर काढत, कधी पोझबुक चेक करत मोरापासून पार खारुताईची आठवण करुन देणा-या पोझेस करता करता अक्षरशः ताराबंळ होत होती. कधी कुणी पुस्तकातल्या पानाकडेच बघत तर कुणी बिचारा तातकळत उभं. यानिम्मिताने शाळेतल्या कवायतीच्या तासाची आठवण झाली. समोरच्याच्या खांदयावर आपला हात टाकत सार वजन टाकण्यातली मजा पुन्हा एकदा अनुभवता आली. एक पाय वरती उचलून दोन्ही हात पाठमो-या उभ्या असलेल्याच्या खांदयावर टाकायचे. काय बरं त्या पोझचं नाव… पिकॉक लेगसाईड बेस पोझ. बरं झाल निलीमा माझ्या मागे उभी नव्हती.
संध्याकाळ सरत आली होती. आम्ही सगळे जण शेवटच्या पाईटंवर येऊन थबकलो होतो. सुधीर कुठल्यातरी लगबगीत समोरच्या टपरीवर गेला. इथला सूर्यास्त मावळतीची
किरणं… सुरेख विश्वाच्या राहटगांडाशी बांधील राहत….. पार
क्षितीजापलीकडे स्वतःस
लोटत…. अगदी
निष्पाप कर्मयोगासारखं
पुन्हा नव्यानं उमलण्यासाठी… येणाची खूणगाठ राखत…. क्षुल्लक का होईना
पण विश्राम घेऊ
पाहणारं… स्वर्गीय सुख देणारं….मनाचा तळ गाठणारा हा सूर्यास्त खरंच खूप छान. बाल हनुमानाची आठवण करुन देणास कारण की
लालबुंद सूर्यास पुन्हा
एकदा आपल्या तोंडापाशी
घेण्याचा मोह प्रकाश-शंशाग या माकडांनी करत सुधीरला
पुन्हा एकदा फोटोची
खैरात करण्यास भाग पाडले. सुधीरने सगळ्यांना टपरीवर
चहास येण्याचा आग्रह करत
पिकनिकचा शेवट खऱ्याअर्थी गोड केला.
आम्ही सवजण रेल्वेस्टेशवर जमा झालो होतो अवघ्या पधंरा मिनिटानंतर ट्रेन आगमनाची घोषणा होऊन गेली होती. गुळाभोवती जसे डोंगळे जमा व्हावेत तसे सुधीर भोवती फोटो घेण्यासाठी सा-याची लगबग सुरु झाली. मुळ्चा पलीकडच्या गावात राहणारा सुधीर थोरात कॉलेजला मॅनेजमेंटच्या शेवटच्या वर्षाला होता आणि सुटटीच्या दिवशी चार पैसे कमवणे व फोटोग्राफीची आपली आवड या दुहेरी फायदा बघत तो ‘पाहून सेंटर’ला जाईन झाला होता. सगळ्यांनी सुधीरला बाय केलं. माझी सर्विस आणि फोटो कसे आलेत ते नक्की कळवा सुधीरने बाय बाय करण्यासाठी हात उंचावला. ट्रेन आलीच, गर्दी नव्हती खिडकी जवळची जागा मिळाली अजूनही सुधीर आम्हाला अलविदा करण्यासाठी थांबला होता. “मित्रा ते तूटो आणि झूपेडा ग्रीप नेमकं कुठल्या भाषेतलं आहे नेमकं” प्रकाशनं खिडकीजवळ येत सुधीरला विचारलं. गाडी हळुहळु सुरु झाली होती “विशेष काही नाही नेहमीपेक्षा वेगळं, एकसुरीपणा टाळण्यासाठी, सतत हसरा चेहरा ठेवण्यासाठी वापरली जाणारी सिपंल ट्रिक होती आणि आपली मराठी भाषा आहे मित्रा पाहिजे तेव्हा!… पाहिजे तेथे हवी तशी वळते” सुधीरने हसत धावतधावत खिडकीजवळून निघून दरवाजात पोचलेल्या शंशाग-प्रकाश जोडगोळीला टाळी मारत “तुटली-तुटली”चा जयघोष करत अलविदा केला. गाडीच्या वेगासोबत रेल्वेच्या डब्यात एव्हाना तूटो-तूटोचे स्वर जोर पकडू लागले.
-आशिष गुरव .
********************** कथा आवडल्यास अभिप्राय (कॉमेंट मारा) नक्की कळवा ***************
( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online ,must be shared in totality . )
( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online ,must be shared in totality . )
No comments:
Post a Comment