माझं मन
स्वतःच्या शोधात
मनाच्या डोहात
स्वतःच्या शोधात
मनाच्या डोहात
खोलवर जात
तळ गाठत
तळ गाठत
ओजंळीत सापडेल
तेवढं घेऊन
काठावरती….
तेवढं घेऊन
काठावरती….
गुदमरलेला
श्वास घेत
सापडलेली पुंजी
एक एक करत उलगडत…
चिकटलेली जळमट
दोन-चार रुसवे-फुगवे
थोपवलेल्या आणा-भाका
पश्चातापाच्या फुगीर
खुणा
फुशारकीच्या फाजील
बाता
वर्चस्वाची छुपी लढाई
आणि गलितगात्र झालेला स्वाभिमान
वर्चस्वाची छुपी लढाई
आणि गलितगात्र झालेला स्वाभिमान
या सगळ्याचा…
काठावरती हिशोब मांडत
काय खर अन किती खरं
विवेकवादाशी फारकत
घेत
जुना मामला झाकत
नवा मुलामा लावत
पुन्हा एकदा तयार केलं
मन
रस्त्यावरच्या खडडयापासून
खटकणा-या स्पर्शापासून
पदोपदी होणा-या अपमानासाठी
जातीपातीच्या राजकारणासाठी
आरक्षणाच्या टक्कयासाठी
सगळ्यासाठी तयार केलं
मन
सोशलसाईटवरच्या हॅशटॅगसाठी
सरकारला निव्वळ दोष
देण्यासाठी,
माणुसकीला कॅमेरात
कैद करण्यासाठी
गरीबीचे फोटो घेण्यासाठी
अपघाताचे विडिओ अपलोड
करण्यासाठी
सगळ्यासाठी तयार केलं
मन
दुभंगलेलं माझं मन
पुन्हा एकदा
थकत आणि स्वतःच्या
शोधात
मनाच्या डोहात
खोलवर जात
तळ गाठत……
-आशिष अशोक गुरव
********************** कविता आवडल्यास अभिप्राय (कॉमेंट मारा) नक्की कळवा ***************
******************* Please comment if you like the poem ***************
( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online ,must be shared in totality . )
( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online ,must be shared in totality . )