Saturday, 29 October 2016

ओटी, गा-हाणा आणि वायफाय

ओटी, गा-हाणा आणि वायफाय

           

            सुनंदा दरवशीप्रमाणं यंदापण देवीची ओटी भरुकं आपल्या दोन झीलांका घेवून माहेराकं ईला हूता. दोन झील…बारको सतरा आणि मोठो एकवीस वरशाचो. तळकोकणातला नारळापोफळीनं गच्च भरलेला गावं, गावाच्या कडेनं जाणारी नदी, तरीपण दोघवे काल संध्याकाळी मामाकडे ईलापासून हिरमुसले हूते. चारीबाजूनं डोंगर असल्याकारणानं मोबाईलचा नेटवरक दर दोन-दोन मिनिटानं येत-जायत व्हता. आता सकाळी ते दोघवे आवशीबरोबर देवळाकडे चाले हूते. एकदाचो इलो सडो! वीस मिनिटाची घाटी चलून घामाघूम झालेले झीलाकां बघून सुनंदा म्हणता “अरे हैतेशे आम्ही दिवसाचो पन्नासएक खैपा घालू…. आज तैची फळा तुमचो मामा खाता… माझी भैहनची बोळवण दरवरशी दोन आबेंच्या पेटायेवर करता हा…” देवळ्यालागी ईल्याबरोबर सुंनदाचो बारको झील नाराजीनं म्हणता ”मामा बोला होता इकडे सडयावर रेजं पकडेल म्हणून”

            “तात्यानू वळखलास की नायं…”सुनंदानं देवळाच्या पाय-याकडे चप्पल काढीत गुरवाक हाक दिलानं. पण दोघा पोरग्याचा लक्ष अजून पण मोबाईलमध्ये “दादा इथं देवळात पण रेजं नाय… नीट… शीट…” गुरवानं सुंनदाक वळखलानं. “आता नजर कमजोर झाली म्हणून आपल्या वाडीतल्या चेडवाक ओळखल्याशिवाय रहवानं काय, महादेव सुताराची लेकना तू, खयंगो दिलेला तुका”” हातातली उरलेली दोन फुलां पिडीसमोर ठेवीत म्हटलानं.

            “वारंगावात” खांदयाक लावलेल्या बॅगेसून ओटी काढीत सुनंदा बोला.  गुरवानं पाट देवीच्या मूरतीसमोर ठेवत बोलो “पावणे नाय येवकं?” “मिस्टराक सुटटी नाय भेटली यंदा कामावरना, तेनी, मग रेल्वेत बसवलानीं, आता काय पोरगे हतं वागडानं… मग काय प्रवासाचां टेशनं नाय” सुनंदानं नारळ आणि ब्लाऊजपीस पाटावर ठेवीत म्हटलानं.

            सुनंदाच्या दोघव्या झीलानी देवळाच्या आत इल्यावर मोबाईल खिश्यात ठेवल्यानी खरे, पन दोघावंचा लक्ष अरध्यामुडदया नेटवरकवरती ‘प्राफाईल पिचर’ अपलोडिगंकडे लागून रहवला हुता. दोघवाचां एकडेतकडें बघत देवळच्या भितींवरच्या देणगीदारात मामाचां नाव शोधूचा चालला हुता. ”मला दिसलं मामाचं नाव एकशे एकावन्न रुपये….” थोरल्यानं बारक्याक म्हटलानं. तकडे देवळाच्या पडवीत थव्यानं बसलेल्या पोराचो खिदडण्याचो आवाज केवढयानतरी येत हुतो. गुरव कशी तयारी करता तें आता दोघवे बघत हुते…गुरव हातानं काम करती जरी असलो तरी तोंड काय बंद नव्हता “फाटफटी सहा वाजोच्या आधीपासून, हल्ली पोराचो घोळको जमान तयार! मुबंईवाल्यानी गावच्यानसाठी म्हणून एक कायतो राऊटर लावून दिल्यापासून बघूकच नको…” राऊटर ऐकल्याबरोबर दोघवे मुबंईवाले पोरगें चाट पडले. आणि दोघवांनी आपल्या खिशातून मोबाईल काढलानीपनं. “मेलो यता तो हय देवळ्च्या पडवीलागी येवून बसता, राडेच्याका देवीक वाकून नमस्कार घालूचा म्हणशाल तर शपथ…चार फूला काढून आनूक सांगितली तर नाय म्हणती…या बावडेचा पानी उन्हाळ्यात रहवता हा….त्या साखरकराच्या नळाकडना आणूचा लागता…सगळे येवून आपलो मोबाईल घेवून नुसते चकाळतत नुसते…आपला पाचट हसना…ता पन देवीसामनी…या जा काय चाला हा ता काय बरा दिसत नाय… त्या मुबंईवाल्याक लय गावचो कळवळो म्हणन या कवतीक दिलानी बसवून देवळात…” साठी गाठलेलो तात्या गुरव उघडया अंगान सगळी तयारी करीत बडबडत हुतो.

            “स्वयंभू पाषाणी पावणाईदेवीचा मंदिर हा कायतरी अपशकूनी घडात तेव्हा कळात” सुनंदा आपलो पदर सावरीत बोलला. गुरवानं देवीसमोर नारळ ठेवलानं खरो पण तेचो लक्ष सतत अकडे-तकडे काय चालला हा तेच्याकंडेच होता …आता कुणाक तरी बघितलानं. सुनंदाक तेच्याकडे बोट करीत दिखवून म्हणता….“तो तो बघ तो जाबुरकराच्या नानाचो धाकटो…बघ अवतार बघ…जीनच्यो पॅन्टी घालणार काय…फटफटी घेवून शायनींग काय…अरे मुंबईवाले पण अशो फॅशनीन रवत नाय…या मायझव्या कामा काय असततं…मुबंईक जाऊन दोन-चार पैशे कमवाचा धाडस नाय, बसतत हय येवून टावळको करत…”

            गुरवानं सुनंदान आणलेलो अगरबत्तीक पेटवूक माचीसची काडी काढलानं. “तू खय रहवतसं मुबंईक” तात्या गुरव बोलतं हुतो. इकडे या गुरवाचं बोलणा ऐकल्यापासून सुनंदाचे दोघव्या झीलाका ख-या अर्थोनं देवी पावल्यासारखा वाटत हुता. मामाकडें ईल्यापासून काय तरी चुकचुकल्यासारखं वाटत हुता, “वायफाय आहे इथं…तो ही फुल रेंज अरे वा… पण….लॉक आहे” धाकटयानं थोरल्याकं मोबाईल दाखवत म्हटलानं. तिथं बसलेल्या घोळक्याकं पासवरड ईचारूची थोरल्याची हिमंत व्हतं नव्हती पण वायफाय वापरुकं आतून जीव कासावीस झालो हुतो …. दोघावकं मागच्या दोन दिवसापासूनचे मॅसेज चेक करुचे हुते, स्टेटस अपडेट करुचे हुते, प्रॉफिल पिचंरा चेजं करुची हूती, अकडे बारक्यानं थयचं पडवीत बसलेल्या एकाकं “पासवरड काय” विचारुनं नेट चालू पण केलानं…

            “सांग, मला पासवरड काय आहे तो” थोरल्यानं मग आता धाकटयाकं विचारालानं. धाकटा हसत हसत म्हणाला “पावणाईदेवी”

            “होत का नाहीयं…” थोरला रागानं म्हटलानं.

            “पी कॅपिटल…टाकं…” धाकटा पुन्हा हसत हसत बोला…. आता दोघावें जाम खूश दिसत हुते…दोघवानीं देवीच्या मूर्ती बघितलनी…मोबाईल खिश्यात ठेवून…. दोन्ही हातानी नमस्कार केलानी…आता तेका देवीच्या मूर्तीतं तेज दिसत हुता…

            सुनंदा बोलत हुती “मी आता बदलापूरका रहवतयं….पहली रहवत हूतावं लालबागका पेरुच्या चाळीत पण जशजशी सगळ्या दीराची लग्ना झाली तशी रहवक जागा कमी होवक लागली …आमच्या मिस्टरचा कुटूंब काय न्हानं हा….मग काय…चौघाच्या मालकीची ती रुम विकालानी… वाटणी करुन टाकली नी आमच्या हिस्साचो म आम्ही बदलापूरका फॅल्ट घातलो”. तात्या गुरवाच्यां डोळ्यासमोरुन झराझरा मुबंई समोर येवकं लागली. तेंनीं असुयेचो आवढों गिळत म्हटलानं “…आजून म्हणून तकडे काळाचौकीक काय दहा बाय दहाचो रुमचे भाव काय कमी हत…करोडोचो भाव चाललो हा म्हणततं……त काय? आपला मुबंईक स्वत:चा घर तरी झाला नाय गो”.

            “तुमचे झील खय असततं” सुनंदाक एकदा काय माहेरचा माणूस भेटला की मग विचारता सोय नायं…. बोलणं काही थाबंत नव्हतं….देवीक ओटीभरुक आणलेलं तांदूळ सूपात ठेवूचा चाललां हूता…तिचें दोघवे झील आता त्या पडवीच्या भितींजवळ बसलेल्या बाकीच्या टोळक्यात जाऊन मिसळलेपण….तात्यागुरव खूजो अभिमान आणित बोलत हुतो “माझे दोनी झील मुबंईकच असतत विरार का….आमच्या जावयाचो बिल्डींगमध्ये रुम असा…आमचे दोघवे जेवक चेडवाकडेच असतं …रहवोक अशी बैठया चाळीतच रुम घेतालानी… भाडयानं हा… त काय आपला खानावळी आणि आपला कपडालत्ताचा भैहन हा म्हणून चालून जाता…नायतर परत यांच्या आवशीक पाठवूचा लागला असता…. समजूदे तेकां पन बापसान काय दिवस काढलान हुते…ते…आता पासून व्हवहार कळोक लागलो त उदया बायका इलो को परपजं चालवूक मोकळे..त काय…“ तात्या गुरवाचो गळो जरासो का होईना कापरो झालो हुतो…डोळे थोडेशे पाणावल्यासारखे झाले हुते…मिल सुटल्यावर थयचं खयतरी झोपडा बांधून रहवलं असतयं तर आज पोरा का असा मुबंईक भाडयानं रहवचा लागला नसता…मोठो झील म्हणत व्हतो….बाबानो कलमा विकून विरार का रुम घेवून देवा…म्हटला आता तूका घेवून दिलय तर परत बारको झील पण हा…. उदया तो पण मागतलो… आणि रेवती हाच, माझा चेडू… आता परक्या घरचा आपण म्हणू गो… कायदयानं पोरीक तेवढोचं हिस्सो देवचो लागता…चेडू आपला… जावई आपलो नाय…आणि फटकीखावून ईली कलमा पन नाय ना तीन-चार वरश्या झाली…सगळो आंबो कलटावर यंदापण…एक फळ चांगला नाय….काय पेटयो पाठवणार दलालाका…त्यात आणखी पावस…सगळो मोहर गेलो ना वाया…. आणि शेती काय माझ्यानं काय आता व्हतायं एकटानं…आमच्या हिचा आयुष्य गेला चुलीजवळ आता काय होणार हा….तिच्यानं… सगळी बरगडयो गेलो कामातून… तेव्हा अख्खो सडो चलणारी बाई आता दोन पावला चली तरी श्वास कोंडता…तरी बरा आता गावात तो सिलिडंर येवक लागलो… आमची शेती… ती तशीच मागची दोन वरशा पडोन असता …..तेच्या अगोदर परयत तो रघ्याचो झीलगो व्हतो तवसर दोघा भुतू वारगुळ्यात करीत हुतावं… तो रघ्याचो नितो… तकडे बाहेरगावी गेलो ना कोईटला-दुबईक… गेलो त्या रफीकाबरोबर…आता काय बापसाक दर महिनाकं पाच हजार पाठवता…तो तरी कशाक म्हणून शेती करीत वारगुळ्यात.. म्हटलं माज्याकडनं त काय व्हवहाचा नायं एवढा खंडीभर भात लावूकं, लावणी करुकं, दाढ काढूकं, यंदा पंचायतच्या मिटींगीत ठरला हुता…त्या बापूमास्तराची सून संरपच हा ना काय बरा तीचा नाव…” तात्या ओटी भरुचा सामान जवळ करीत हूतो.

            सुनंदानं अवाक होऊन म्हटलानं “बापूमास्तराची सून!”

            एक घटका थांबत तात्या गुरव पाटावर ठेवलेले दोन्ही हात कपाळावर ठेवीत डोळे बंद करीत नाव आठवूक बघित हुतो….पुटपुटत हुतो “नाव असा तोडावर हा बघ… शेम नाव…बघं संध्याकाळच्या सिरयलीमधला नटीचा नाव हा गो…शिरापडली तोंडावर…काय बरा….हा… कल्याणी!… कल्याणी म्हणतं व्हती यंदा वाडीवाडीचे गट करुन सगळ्यानीं ट्रक्टर लावयचो सगळ्या वावळीत….त्या रांडेच्या त्या आमच्या विठोबा गुरवाचा त्योडं सकाळी उठून बघू नये…खयं ख्वाड घालूचा ता येचो पहलो नंबर…वरगनीक तयार पन झाले सगळे वाडीतले….पन हयं राडचों तालूक्याकं कधी गेलो नसात…म्हणता या सगळा घाटावरचा हयं चालूचा नाय… राडचें जळततं एकमेकावरं… यो हुदूदू…गोधळं….एकमेकाकं मारुक काय उठले नी काय… काय ना वरसून आदेश येततं याच्यां साहेबाचे…. आमदारा-खासदाराचे… अनी हे तशे वागततं……बिनपैशाचो तमाशो…ती बापूमास्तराची सून.. संरपच हा नावाक…सगळा काय यो आमचो विठो गुरव बोलणार नी ती कल्याणी ऐकणार…म्हटलां बघितला असता ट्रक्टरनी शेती करुन…आता यंदा काय व्हना नाय…वाटतं… तिघां पोराकां सागूंन ठेवलयं… माझी लाकडा एकदा मसणात गेली की मग काय तो हिस्सो करुन घ्येवा…तवसंर माझ्या जीवान कायं व्हवचा नाय”

            सुनंदान दोन्ही पोराकां खूणेनं बोलावानं. मोबाईल खिश्यात ठेवून दोघवें हात जोडून उभे रहवले. देवीपुढे पेढाचों पुडो सुनंदेनं ठेवीत तात्याक बोली ”तात्यातून गा-हाणा घाला यंदा पोरगो ग्रजुअशनच्या शेवटच्या वरसा असा…यंदा पास होवून चांगल्या कंपनीत लागलो तर पुढच्या वरशी पाच नारळाचा तोराण देईन देवीक…” माहेरवशीननं बोलायची खोटी की अकडे तात्या गुरवानं “हे देवी पावणाई…ही माहेरवशीन सुनंदा तुझी न चुकता दरवरशी परमान यंदापन वटी भरुक इली हा….ती पावणं करुन घे… तिच्या मालकाक, मुलाबाळाक सुखात ठेव…..तिचो पोरगो यंदा” गुरवाचां थांबलेला गा-हाणा बघून थोरलो बोलो “शेवटच्या वर्षाला”, “शेवटच्या वरश्याक बसलो असा… तैका चांगल्या मारकानं पास कर… आणि पुढच्या वरशी चांगल्या कंपनीत रहवलो की ही माहीरवशीण तुका पाच नारळ्याचा तोराण घालीत“

            …गाभा-यात नारळ फुटलो…खोबरयाचें बारीक तुकडे करताना पडवीजवळ बसलेल्याचां खिदडना तात्याच्यांक काय रुचतं नव्हता. तात्या गुरव बोलत सुटलो “राडंच्यानो मुबंईक नाय रहोक जमत तर गावक रहोन कलमा शिपा ता पन नाय…चिखलात हात घालूक लाज वाटता…मोठे झाटलीमन हे… आता यो बबन्या गुरवाचो लेक अगो दारु म्हणो नको… सिगरेट म्हणनू नको…अरे जातीचे गुरव नारे…कसो तुमका देव पावात…आपल्या कुळात कोंबडो बकरो खाउ का नाय…तरी तकडे तालुक्याक जाऊन चायनीज कायता हासडततयं… अरे देव बघता…मागे आवस खुळावली हुती…बापूस पन अडमिट हुतो सायन हॉस्पीटलात मुंबईक…यास हा कुटंबाक…अख्खा घरदार भोगता मग…”
“पहिली काय भरभराट हुती नाय तात्यानूं..” सुनंदा आजूबाजूक बघीत हलक्या आवाजात बोलला.
गुरवही मग आवाज ब-यापैकी खाली नेत बोलत हुतो “अगो काय तरी हुता गुतांड करुन ठेवल्यानी……वस्तू हुती घरात…देवदेवस्की काय कमी हा…आता नाबूत झाली खयं वस्तू…मरु देत करीत ता निस्तारीत… कोण कसो वागतां तां…देवी पावणाई बघता हा…”

            “…तर आता काय रवला नाय पयल्यासारखा तात्यानू…आमच्या सासरी सगळे भट आता मच्छी-मटाण खाततं…तकडे मुबंई तर सगळा आपला चालता” सुनंदानं नाराज होवून म्हणत हुता. खोंब-यांचे तुकडे गुरवानं सुनंदाच्या हातावरं ठेवीत बोलो “नाय पन गावाकं शंभू भटांन तरी टिकवलान हा…. तेचो एक झिल पुण्याक असता…विधी वैगरा शिकता हा…आता बापसानंतर तोच चालवितसा वाटता”

            सुनंदान खोब-यांचो तुकडो देवीक नमस्कार करीत तोडांत घातलानं “आणि त्यांचा चेडूचा…झाला काय लगीन…?” सुनंदाक सगळां लफडा माहित असून पण मुददाम कुचाटन्या काढूचा म्हणून विषय काढलानं…गुरवाक पन असले विषय चगळीत बसूची सवय….आजूबाजूक नजर फिरवीत कोण बघीत नायना येच्याकडे बारीक लक्ष देत सुनदांक सागोक लागलो “जायत हुता तेलयाबरोबर पळून…आवझारी आवस-बापूस दोघवा बारामाशी… चेडू खय जातां येता तेच्यावर लकक्ष नको…वाडीतले बाकीचे प्योर बघितचं व्हतें कोण करता काय…हंत आजून दोघं-तिघं अशी लफडयावालीं…गावातं रहोन हेच धंदे सुचततं…म्हणून आमच्या दोघवाकं मुबंईक पिटाळलें…म्हटलं हयं रवले तर…चिरे फोडाता फोडता… संगतीनं खयचे तरी नुकोतो वासे मांडवाक लावचा बघती…” पण सुनंदाची दोंघंव झील मागसंपासून पडवीजवळ…. मोबाईलवरुसून देवीचे फोटो अपलोड करण्यात दंग झाले हुते…

            “देवाच्या गाभा-यात पण शांती ठेवलानी नाय फटकेक नायती कुळकशा होउदेत रांडच्याचो…ते बघं अजून दोघेजण इले मायझवे….देवापुढे विडे पन ठेवचो माग रहवलो नाय आता
अक्करमाशानो….दुपारतिपराचा झोप म्हणून पण नाय… तो बाबा मेरोपकर येवदे यंदा गावच्या मिटीगं नाय ते का झाडून टाकतय की नाय ता बघ…राडच्यानू तुमच्या त्या बंद घरापुढ लावा तो वायफाय कायतो..हयं देवळालागी नको…मोठे मुंबईवाले ना मायझवे..” तात्या गुरवानं पाच पेढे आणि अरधी नारळाची वाटी सुंनदाक देत बाकीचो सगळो मेवो आपल्या खुटयेक टांगलेल्या पिशवीत टाकीत बोलत हुतो. सुनंदाची एक नजर गुरवाच्या पिशवीतल्या पेढयाकडे कितीवेळ टिकून हुती…

            “अरे त्या ईलास दुसनकराची आऊस लयं सिरीयस हा…..! काय जगातशी वाटत नाय म्हातारी... ! पुढच्या क्षणाक डोळें मिटातशी वाटता” पक्यानं व्हाटसअपवर इलेलो मॅसेज सुधीराक दाखवित म्हटलानं. सुनंदा आणि तिचे दोघवे झील चप्पल घालूक लागले, गुरव आता थयसर येवून सुनंदेक बोलता “या बघ……मुबंई कुणाचा काय झाला ता सगळा वाडीभर अगदी दुस-या मिनीटाक कळतां आणि गावाकं जरा काय साटंसुट झाली रे झाली की मुबंईक बातमी वा-यासारखी पसरता….”

            “चला तात्यानू चलतयं….आज संध्याकाळी जावचा नाधीवडयात सासरका” सुनंदा गुरवाच्या पाया पडीत म्हटलानं….दोघवे झील आता खूश हुते…सगळा तेच्या मनासारखां झाल्यासारखा दिसत हुता…मोबाईल पॅन्टच्या खिश्यात ठेवत तेनी मग गुरवाच्या पायाक हात लावलानी… “बाबोनो म्हातारे-शितारे व्हावा….हेतेशेच येतं रहावा मामाकडे…मामाकं पोरगी नसली म्हणून काय झाला…”तात्या गुरवान दोघवाच्या डोकावरना हात फिरवलानं…सुनंदा आणि पोरा निघाली. आता मघाच्या पक्याच्या बोलण्याकडे तात्याचों लक्ष हुतोच…गुरवच तो आता ऐकलान हा तर गप्प कसो रवतालो ”…जास्त सीरीयस हा की? मोठया झीलाकडे राहवं गेली होती ना? फटखी खाव दें आता खयं म्हातारीचे खावचे दिवसं सुरु झालेनी…या असा…” गुरवानं खोबराचे तुकडे पडवीत बसलेल्या बाकीच्याक वाटूकं लागलो… तात्या गुरवानं असा म्हणोक की सुधीरानं व्हाटसअपवर इलेलो म्हातारेचे सलाईना लावलेलो फोटो गुरवाक दाखवलनं, ”तो आमचो थोरल्या काकाचों अजितनी गेले हुते बघुगं सायनका.. यो फोटो काडलानी तेव्हा” “बाकी कुकूं आजून तसाच्या तसा हानारे” गुरवानं मोबाईलच्या स्क्रीनवरच्या फोटोकडे बघतं म्हटलानं. “राडच्यानं आमच्या अजितानं सोळा मेगापिकसलवालो मोबाईल घितलान हा …कुकं भडक दिसात नाय तर काय? म्हातारेन उदयाचो दिवस तरी काढूक हवो नायतर उदया परशुरामाच्या घरीचो बारसो बारगळलो म्हणून समजा…हा तेका आणखी आता धाकधूक म्हातारेच्या तब्यतेचो…” सुधीर काळजीनं म्हणतं हुतो. “सगळा आणून ठेवलान हा वेपर, फरसान, झीलगाच नाव कोरुक थरमकाल, हा आपलो रातरी बसूचो पण बेत ठरलोलो हा पण या म्हातारेवर हा….!” पक्यानं आपल्या जवळची खबर सांगत म्हटलानं. तेवढयात निलेशानं म्हटलानं “पन वाडीत सांगोचाच नायाना…बारसो व्हयंसर… पयली आदी पावशेर घशाच्या खाली उतरु दे मग काय तो गावभर डको पीटा…तं काय….मुकेशाक आणि बाकी पोराका तसा सांगोन ठेव”  

            आता सुनंदा जाऊन सुतारवाडीतला अजूऩ एक नवीन जोडपा देवीच्या दरशानक ईला हुता. गुरव आता त्येंका सांगत हुतो “या बघ या असा चालेला सगळा आमच्या टाईमाक माणूस मरुन चार दिवस झाल्यावर मुबंईत पत्र यायचा नि आता थय माणूस हार्ट अटैक येवच्या अगोदर हय बारावाचा जेवान बनवूक लागले पण…”

                              ------------------

``````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````
-आशिष गुरव .
********************** कथा आवडल्यास अभिप्राय (कॉमेंट मारा) नक्की कळवा ***************
( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before  publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online  ,must be shared in totality . ) 

Saturday, 15 October 2016

ख़रीदारी


ख़रीदारी

रेल्वेस्टेशनके प्लॅटफॉर्म नंबर छे के उपर के पब्लिक पूलकें आखिरी कोनेमें पार्वती और उसका पती किशन  हाथभरसी जगह में सामान बेचने के लिए बैठे थे। 

सामान में ज्यादा कुछ नही… वही मोबाईल के प्लॅस्टिक कव्हर, ताला और चावी, बच्चों का मन बहलानेवाले खिलौने, रंगीबेरगी लाईटवाले लॅम्प, फोन नंबर लिखने के लिए ईस्तमाल होनेवाली डायरी, गॅस लायटर…. पर आज ज्यादा कुछ बेच नही पाऐं थे…. उसी कारण दोनो कुछ खफा-खफासे दिख रहे थे। 

”सुबहसे एकभीं खिलौना बेच नही पाऐं….मैने आपसे कहा था खिलौने आजकल कोई नही खरीदतां….आजकल के सब बच्चे मोबाईल के उपर गेम खिलने में लगे रहते हे…” पार्वती नाराज होकर कहने लगी।

“अरे अभी तो रात के साडेसात ही बजे होगे…अभी देख… सात चालीस की फास्ट लोकल आऐगी ना तो ज्यादा भीड होगी, कोई ना कोई तो जरुर कुछ ना कुछ खरीद लेगां….” 

इतने में फास्ट लोकल प्लॅटफॉर्म नंबर छे पर आने की अनाऊस्टमेंट हो गई….”आप तो सुबहसे यही कह रहे है…. ताला-चाली कोई खिरीदता ही नही….” 

पार्वती सामने रखे सामान को हाथसें एकबार गिनने में जूट गई “अब गिनो मत” किशनने अपने तरफ आऐं पार्वती के हाथको, अपने हाथोसें रोकते हुऐ कहा “ट्रेन आ गई” नीचे की तरफ जैसे ही ट्रेन आ गई वैसेही लोगोंकी उपर की और सीडीयों की तरफ भागने की आवाजे दोनो को सुनाई दे रही थी……लोगो की चहलपहल को वो महसूस कर रहे थे। 

किसनने एक बार हलकांसा अपना गला साफ किया….और जोरसे चिल्लाने लगा ”मोबाईल कव्हर ले लो मोबाईल कव्हर…! !घर की सुरक्षा ताला चाबी…छोटे बच्चे के लिए खिलौना ले लो ! !” 

किसन की उम्मीद थी…दो-तीन बार चिल्लाने पर कोई ना कोई तो जरुर खरीदने के लिए रुकेंगा…. पर नही….किसीने भीं नही पूछां….भीड की आवाज कम हो गई और उसी कारन किसन काफी निराश हो गया….”लगता है बारिश का मौसम खत्म होने आ गया है ना….. ईसलिऐ कोई मोबाईल कव्हर ले नही रहा है” किसन पार्वतीसे अपनी निराशा को हंसी में बदलने की कोशिश करते हुऐ कह रहा था। 

पर पार्वतीने बात को पकड लिया “कौनसी कौनसी चीजों के लिए कौनसे कौनसे नये बहाने बनावोंऐगें आप….वो दस रुपये वाली बॅटरी बेचने के लिए रखनी चाहिए थी, सरला कह रही थी आजकल बहोत चलती है…वो लाईट अच्छी देती है और सस्ती होने के कारण बहोत लोग लेते है….” 

किसनने बेचने के लिए रखें सामान के उपरसे हाथ घुमाकर गिनते वक्त कहा “उसे कैसे पता दस रुपयेवाली बॅटरी अच्छी लाईट देते है या नही, आखिर वो भीं तो अपने जैसे है ना, पर सरला तो लॉटरी की टिकीट भेजती थी ना….” पार्वती थोडीसी गुस्सा होकर कहने लगी “सरला नही उसका पती किशोर लॉटरी की तिकीट बेचता है ओ… हो ….आप को कुछ भी याद नही रहता आज कल” किसनने मुस्कराकर कहा “क्या करे अब बूढे होने लगे है हम”। 

“बुढे और आप….काला चष्मा डालके रस्ते पर ज्यादा घुमना मत… लोग फिल्मवाला हिरो समज लेंगे” पार्वतीके बात खत्म हुई नही थी की दोनों पती-पत्नी जोरजोरसे मुस्कराने लगे। 

इतने में फिरसे प्लॅटफॉर्मपरसे और एक ट्रेन निकल गई…..ट्रेन की आवाज के साथ ही दोनो की हंसी भी कही गायब हो गई…. पार्वती आवाज सुनते हुऐं बोली ”लगता है फास्ट ट्रेन है” हा..ट्रेन आ गई…भीड की आवाज के साथ ईस बार पार्वती जोरजोरसे चिल्लाने लगी ”अरे लायटर ले लो लायटर….प्लॅस्टिक का फोल्डर ले लो..फोल्डर…” पार्वती की उम्मीद पर फिरसे एक बार पानी फिर गया था। 

चिल्लाते रहने के कारण उसका गला पूरी तरह सुक गया था। ”आज सिर्फं चालीस रुपयें का सामान बेचा गया है…..उपरसे यहां बैठने का हप्ता तीनसौ रुपयां महिने का अलग… मुझे नही लगता हम दोनो ये सामान बेच पाऐंगें…इसमें हमारा महिने का गुजारा होना मुश्कील लग रहा है” “अरे शुरुशुरु में ऐसे होता है….” किसन बीवी को समझाने की कोशीश कर रहा था। पर पार्वती तुरंन्त बोल पडी “आज पूरे दस दिन हो चुके है अब तो पता चल चुका है ना, चलो फिरसे ट्रेन के अंदर…. गा….” “ट्रेन के अंदर गाना नही गाना है अब हमें…कितने दिन तक हम वही करते रहेगें” किसन पार्वती की बात को बीचमें ही रोकते हुऐ बोला। “पर यहांसे तो अच्छा ही कमा रहे थे हम” पार्वतीभीं कहा रुकनेवाली थी। “कमा रहे थे! भिखं मागते थे हम…”किसन का आवाज बड चुका था उसके चेहरे पें गुस्सा साफ दिखाई दे रहा था। अब पार्वती के आखोंसे आसूं आ रहे थे “कमसे कम उस भिख में पेट तो भर पाते थे, यहां इज्जतसे कमाने से सिर्फं मरने के लिए आसानी हो जाऐगी और कुछ नही” अब किसन को पार्वतीके आवाजसे पता चला की वो रो रही है उसने उसका हाथ धुंडते हुऐ कहा। 

“थोडासा धीरज रखो…भगवान के घर देर है अंधेर नही” आसूकों पोछते हुऐ पार्वती बोली “अंधेर तो है पर भगवान नही”। इतने में बारिश की बूंदे एकदमसी बरसने लगी, सही में काफी जोर की हवा आने लगी थी, अब उपरकी छतकी बारिश की वजहसे होने वाली आवाजोंसे ठीकसे ट्रेन की अंनाऊसमेंट सुनाई नही दे रही थी..

शायद ट्रेन आ चुकी थी….अब भीड आ रही थी..पर कोई भाग नही रहा था….आज मौसम अचानकसे बदल गया था….कई लोगो के पास छाता नही था….वो प्लॅटफॉर्म की उपरी पूल पर ही रुकते थे…और कोई चारा ही नही था….अब हर दुसरी नजर उस सामान पर पड रह थी…एक बच्चा अब अपने माँसे जिदद कर रहा था…

“हां हां वही चायनीज खिलौने…ये कितने का है घोडा है” औरत की आवाज पार्वती के कानो पर पडी।

आवाज को सुनते ही पार्वतीने कहा “तीस का एक….है घोडा”

”पच्चास का दो दे दो!” खिलौने की किमंत को लेकर बहस चल रही थी।

किसन बीचमें बोल “नही….परवडता है….फिक्स रेट है”।

पर वो खिलौना खरीदने वाली औरत बच्चे को चूप करते हुऐं किसनसे खिलौनेकी किमंत को लेकर तोलमोल की बात चल रही थी “अरे दे दो…बारिश की वजहसे रुके, नही तो….”
पार्वती बीचमें बोल पडी “ठीक है ले लो पच्चास का दो…अरे बच्चा बहोत ही रो रहा है लगता है”।

किसनके हाथमें उस औरतने पच्चास का नोट रख दिया। 

औरतने बच्चे के हाथमें खिलौना थमातें हुऐ मोबाईल पें आऐ कॉल को उठाते हुऐं कहने लगी  “अरे आ रही हूं बाबा, स्टेशनपें हू बारिश… आ गई…. अचानक, और ये चिटूं खिलौने की जिदद पकड रहा था…खरीदनेवाली नही थी……जिदद करने लगा…और वो बेचनेवाले भीं अंधे थे इसलिए….दया आ गई….वरना”

मोबाईल पर चल रही बातें सुन रहे किसन को अपने अंदर चल रही घुटन को दबा रहा था…..और पार्वती रोना बंद कर खिलखिलानेवाले बच्चे की हंसी सुनने में दंग हो गई थी।

                                 ---------------

Thursday, 4 August 2016

परीक्षा, पेपर आणि समुद्र!

                परीक्षा, पेपर आणि समुद्र!


       सकाळी साडेचार वाजता उठायचं! का तर…? सकाळी एकदम टाईमावर सात वाजता परीक्षाक्रेंदावर हजर व्हायचं… कशाला? साडेनऊ वाजताच्या पेपरसाठी…पेपर किती?…तीन…पहिले दोन पेपर झाले की साडेबाराला सुटका आणि….पुन्हा तिसरा आणि शेवटचा पेपर होणार दोन वाजता.... तो अडीच तासाचां…म्हणजे एका दिवसात तीन पेपर देवून मुक्तता होणार ती सांयकाळी साडेचार वाजता…परीक्षेला मित्र म्हणावा सोबतीला तर कोणी नाही…मग चला एकटेच… काही मोठाली उत्तरे लिहायची नाहीत की परिच्छेदांनी रकाने भरायचे नाहीत…काही नाही…निव्वळ प्रश्न त्याचें चार पर्याय…काही जास्त हाताला ताण न देता पेपर सोडवायचा…हे झालं वेळापत्रक…आणि ही काही लिपीकपदासाठीची सरकारी खात्यातील, बॅकेची किंवा रेल्वेची परीक्षा नव्हे…अभ्यास होता पण परीक्षेला नेमकं काय येईल यांचा काही नेम नाही…मागच्या प्रश्नपत्रिकाचा काही आधार नाही…मी इतके दिवस निव्वळ घोकंपटटी चालू ठेवली होती…दिमागाचा पार भुग्गा होतो अशावेळी आणि कधी एकदा परीक्षेत सगळं काही ओकून डोकं मोकळं करतों असं होतं… 
      शेवटी हॉलतिकीट आलं एकदाचं…बघू सेंटर कुठे…किमान त्यामुळे तरी अभ्यास करण्यास उत्साह येईल…उगाचचं…आपलं, मनास उभारी…वैगेरे…बघितलं हॉलतिकीट… वर्सोवा! ! !…जुहू-वर्सोवा लिकं रोडजवळचं कॉलेज…एकदा वाटलं परीक्षाकेंद्र जाऊन बघावं परीक्षेअगोदर उगाच परीक्षेदिवशी धादंल नको…यापूर्वीं तिकडें कधी जाणं झालं नव्हतं…पण मग मोबाईलकडे बघत आळस केला…म्हटलं “जाऊ देत…” गुगल मॅपवर बघू…जाऊ शोधत-शोधत… वर्सोवाला मेट्रोने जायचं अगोदरचं निश्चित केलं. शेवटी या परीक्षेच्या आदल्या रात्री अकरा वाजता झोपून एकदम अर्लामच्या साडेचारच्या ठोक्याला उठून सगळी तयारी करत पाच वाजता घरातून निघालो…वातावरण पाऊसाचं होतं खरं पण छत्री खांदयाला अडकवलेल्या बॅगतच होती…सहाच्या सुमारास घाटकोपर मेट्रो…. सकाळी सकाळी मेट्रो ब-यांपैकी मोकळी पण मुबंईपण जपण्याइतपत माणंस होती…या मेट्रोच्या प्रवासाचा फायदा हा की प्रवास अल्हादायक आणि सुखकर असतो. आणि लोकलच्या प्रवासाची सवय झालेल्या माझ्यासारख्या मुंबईकराला हा प्रवास लक्षातच राहत नाही. नाही म्हणायला, असल्फाच्या आसपासच्या टेकडीपरिसरात वसलेल्या दुर्तफा झोपडपटटीतून मार्ग काढणा-या उन्नत मेट्रों कोणताही आवाज न करत गारेगार प्रवासाची अनुभूत देत काही अंशी आपल्याला पंख फुटल्याचा भास करुन देतें….गरीबी-श्रीमंती किती कोनात आणि किती अंशात मुबंईच्या या उपनगरातून वसलीय यांची झलक बघायची असेल तर मेट्रोचा प्रवास निश्चीत करावा. आडव्या जाणा-या रस्त्यांना उभं चिरत जाणारी मेट्रो, थोडाफार इंडस्ट्रियल एरिया, मोठमोठाली हॉटेल, एअरपोर्टचं किचिंतस होणार दर्शन, वेस्टन एक्सप्रेस हायवे आणि पुन्हा थराथरानीं एकमेंकावर कुरघोडी करणारी झोपडपटटी, त्याच्यां छप्परावर कोबंडयाच्या तु-यासारखी दिसणारे डिश एन्टीना, मंदीर-मशीदीचं होणार ओझरतं दर्शन. लोकलने म्हणालं तर तिथंही असं दिसणं होतं, पण ते जमीनीवरुन, इमारतीच्या वरच्या मजल्यापाशी डोकावता येत नाही. अर्थांत थोडं तिकीट महागं वाटतं पण रस्त्यावरच्या खडडयाकडे नजर गेल्यावर यांची किमंत कळते. 
      चला शेवटचा स्टॉप आलं एकदाचं.... वर्सोवा!. परीक्षाकेद्रं शोधत गाठायला गुगलमॅपची मदत घेत बराच वेळ गेला. पोहचलो एकदाचा सातच्या अगोदर. सहा-सात मजली, काचेचं बाह्यआवरण असलेलं महाविदयालय…कॉलेजचा गेट पार केला की आतमध्ये लगेचच बरी ऐसपैस मोकळी जागा होती…कॉलेजच्या आवारात शंभरऐक मांणस बसतील इतकी गादी निघालेली एकाच लाईनीत बसता येईल अशी लोखंडी आसनव्यवस्था. पेपर साडेनऊचा…खूप सारेजण आपला खोलीनंबर समोरच्या फलकावर बघण्यात व्यस्त होती… गेटवर सिक्युरिटी गार्ड असून नसल्यासारखेचं होते…सहाशे मुलं परीक्षेला येणारं मग कुठे आणि कसलं नियंत्रण…आणि हॉलतिकीट दाखवलं की गेटच्या आतमध्ये प्रवेश. तोही ब-यापैकी वैतागला होता पहिल्या अर्धांतासातच…. काहीजणं, दुपारीचं बाहेर पडायला भेटणार म्हणून त्या कॉलेजच्या कॅटीनपाशी मिसळ, डोसा, मेदूंवडा आणि चायच्या आर्डंर देत हादडत होती…. काहीजण एक निवांत कोपरा पकडून आपल्या सोबत आणलेल्या पुस्तकात डोकावून बसलेले…काही जण अजूनही सोशलनेट्वर्किंगच्या जगात एकटेच हसत-खिदडत बसलेले…काही मोबाईलशी चाळा करत बसलेले….कोणी या आवरात कुठेतरी निवांत कोपरा शोधत उभा असलेलं…काही घोळक्याने परीक्षा दयाला आलेले…या परीक्षेसाठी मार्काची पात्रता मिळवली की मग किती ही वेळा फेल व्हा काही हरकत नाही…वयाचंसुद्धा बंधन नाही....बहुतेक हा घोळका तोच असावा... माझी ही परीक्षा देण्याची पहिलीच वेळ आहे! काय माहित मी ही या घोळक्याचा भविष्यात भाग झालो तर…. एक-एक करत गर्दी वाढत होती…. काही सुजाण पालक आपल्या मुंलाच्या भविष्याची काळजी वाहवून आली होती. बावीस-तेवीस पार केलेल्या आमच्या सारख्यांना अजूनही आई-वडील परीक्षाकेद्रांवर का लागतात…? मला सकाळी सकाळी प्रश्न पडत होते खरे…काही पालक होऊन सुदधा परीक्षा दयायला आलेले…..पण अभ्यासाची म्हणून जी काही पुस्तक आणली होती ती न काढता मी टगळमगळ करत इकडे तिकडे बघण्यात वेळ घालवत होतो. बाजूला रंगत असलेले किस्से ऐकत होतो…बहुतेक आर्टसची असणार…साहित्यकाची साहित्य लक्षात ठेवण्याची अंताक्षरी चालली होती. साधारण आत वर्गात प्रवेश साडेआठच्या सुमारास मिळणार होता. हॉलतिकीटवरच्या एका सूचनेने या चालू असलेल्या गोधंळाला शांतता प्राप्त करुन दिली. सूचना 'वरुन' आली होती, शिक्षण मंडळाकडून, कोणालाही बॅग आतमध्ये नेता येणार नाही! ! जितकीं जण आली होती परीक्षेला त्या सगळ्याकडे मोबाईल होते आणि तो मोबाईल आता बॅगतच ठेवणार….आपोआप बॅगेला किमंत प्राप्त होणार…तीचं बॅग इथे या बाहेरच्या आवारात ठेवायची म्हणजें… "अहो किमान वर्गाबाहेर तर ठेवू दया….","मंडळाने लिहून दिलं ठीकं पण आजकाल मोबाईल….","नुसता मोबाईलचं नाही अजूनही ब-याच महत्वाच्या गोष्टी असतात बॅगेत…" एक ना अनेक बोलणं कानावर येतं होतं…अनेक जणाचें मेंदूवडे अर्धवटचं होतें…अश्या बॅग्या कश्या बाहेर ठेवणार…तिथं गेटवर सिक्युरीटीवालांना कागद दाखवला तरी कोणालाही प्रवेश देतात…आणि आतमध्ये येवून बॅग घेवून गेला तर…इथं बॅग ठेवून आत जायचं कसं…साडेआठचे नऊ वाजत आले….मोबाईलमुळे अस्तित्व असलेल्या आमच्यासारख्या "सुशिक्षित" लोकांना हे असं बाहेर बॅगा सोडायचं तेही कुणाच्या जीवावर?.... तर या सुरक्षकाच्या भरोश्यावर….! जे काहीवेळापूर्वींचं आळसावलेत त्याच्यांवर…पुढारीपण करणारी लोक त्या महाविघालयाच्या सूचनाधारी मंडळीशी भांडत होतें…”असं कसं करता तुम्ही म्हण्याऱ्यांना "आम्हाला तश्या ऑर्डर आहेत” यांची उत्तर तयार….मागच्या दहा मिनिटापासून हेच चालू होतं.“…आणि हॉलतिकीटवर लिहिलं देखील होतं…काही आणू नये…”, “नेमकं अशा सूचना बनवणारे कुठल्या जगात राहून हया सूचना बनवतात त्यांनाच ठाऊक…”, “आता नाही म्हणायला ही सगळी कामाधंदयाला जाऊन परीक्षा देणारी बहुतेक तरुणमंडळी... मोबाईल तर आणारच ना…अजून काही मत… एव्हाना रांगा तयार झाल्या होत्या….हॅअ….काहीजण तयार ही झाली बॅग अशी बाहेर ठेवून आत मध्ये परीक्षा दयायला …अं…हे काय ..टाटा…ओ नो….त्या प्रवेशदवाराच्या पलीकडून बाय करणारे…अरे हे तेचं सगळें जण आहेत जे आपल्या आई-वडीलांना सोबत घेवून परीक्षा दयायला आलेले….आता मला माझी कीव येत होती….मी आता त्या पालकांकडे बघत होतो….काही पालक जरा जास्तच तरुण वाटले….नाही ही प्रियकर मंडळी… आता प्रेमात पडलेल्याचें फायदे बघत आपण कश्या कश्यात कमी पडलो याला दोष देत मग मी ही आवरातल्या एका आसनाखाली माझी बॅग ठेवली…त्यांच्या तपासणीला सामोरा गेलो.  मशीन हातात घेवून अंग आणि खिसे चेक केल्यानंतर अखेर पाचव्या मजल्यावरच्या परीक्षेच्या खोलीच्या दिशेने आगेकूच केली…तरी सव्वानऊ झाले होते…आपली बॅग कोणी घेवून तर जाणार नाही ना यांची तर भीती मला काय सगळ्यानां होती….फक्त ज्यांचे पालक आणि प्रेमिका सोबत आले होते त्यांना ही फिकीर नव्हती…त्यांत पेपर लिहायचा आहे कसलहीं टेशन न घेता... खालती ठेवलेल्या बॅगचंसुद्धा… 
      दोन पर्यवेक्षक अगोदरच प्रश्नपत्रिका-उत्तरपत्रिकेसह वर्गात हजर होते…तीस मुलांसाठी दोन पर्यवेक्षक जरा जास्तच होते…अजून दहा मिनीट बाकी….मी माझा क्रंमाक शोधत बाकापाशी आलो आणि बसलो…आणि बघतो तर काय वर्गाच्या थेट समोरच्या खिडकीतून दिसणारा अंथाग समुद्र. माझ्या सारख्या मुंबईच्या ईशान्य टोकाला राहणा-याला, खाडी आणि तलावाशी ओळख असणा-याला अश्या लाटा डोळ्यांनी बघत पेपर लिहण्याची (नाही निव्वळ गोळे करण्याची!) ही पहिलीचं वेळं. इथं बाकापाशी ओळखपञक आणि हॉलतिकीट वरचा चेहरा तपासणं चालू होतं. मागच्याबाजूला खिडकी आणि रहिवाशी इमारतीचा परिसर. वर्गात समोरचा फिकट हिरवा दिसणारा दिसणारा फळा…ब-यापैकी परीक्षार्थी गैरहजर होते….त्यामुळे वर्ग जरा जास्तच मोकळा वाटत होता…इकडे तिकडे विचारत खाणाखुणा करत एकमेकांना उत्तर विचारायचा संबधच नव्हता…. उत्तर आणि दक्षिण दिशेला दोन वेगवेगळ्या विषयावरच्यां परीक्षाबददल, दोघांनाही एकमेंकाबददलच्या विषयाबदल काही माहित नसणार…कोण सोशलवर्क, कोण इकॉनामिकस, कोणी आर्टस…कोणी आमच्या सारखं कार्मेसवालं…त्यातहीं प्रत्येकाला वेगवेगळें सेट ए,बी,सी,डी…म्हणजें खरी परीक्षा…आता मला त्या शिक्षणमंडळाच्या अधिका-यांचा बुदधीची क्षमता कळून आली होती…. पहिला पेपर सव्वातासाचा म्हणजे पावणेअकराला संपणार….आणि साठ प्रश्न त्यातलं पन्नासाची उत्तर दयायची.. फक्त उत्तरपत्रिकेतील प्रश्नक्रंमाकासमोरचा योग्य पर्यायाला उत्तरपत्रिकेत गोल रंगवायचा…काही वय, आकडेमोडे, लॉजिकवाले प्रश्न, मानवी व्यवहार, परिच्छेदावरुन उत्तर…इंग्रजीत प्रश्न नाही समजला तर हिदींतही बाजूच्या पानाकडे बघा…म्हणजे अजून डोकेदुखी… काही गोल प्रामाणिकपणे भरले….काही नुसतेचं नकळत भरले…काही प्रश्न दिमागाची हटवणारे…जागतिक प्रदुषण, संगणकाचे भाग, बायनरी कोड, दूरजवळची अंतर, आई-वडीलाच्यां वयावरुन मुलाचं वय, भारताचे संविधान, रिसर्चचे प्रकार…काहीच्या उत्तराबदल शाशंक होतो…”अजून पंधरा मिनिट आणि वीस प्रश्न बाकी”…. काहीच समजत नव्हतं कुठलचं लॉजिक कामी येत नव्हतं….बर झालं निगेटिव्ह मार्कीगं नव्हतं…नाहीतर रिझल्ट निगेटिव्हमध्येच!…आता काय करायचं…कशी दयायची उत्तर…समोरच्या समुद्रावर नजर होती…खेळ ठरला मनाचा….समोरच्या प्रश्नांपैकी सगळ्यात जवळचे वाटणारे दोन पर्याय मनात आणायचे….डोळे बंद करायचे…आणि त्या पाचव्या मजल्यावरुन दिसणा-या लाटामध्ये जो पर्याय दिसणार…तो रकाना रंगवायचा…घडाळ्याकडे नजर होती… विचार करायला वेळ नव्हता…जो दिसेल तो गोल रंगवत होतो….नेमकं तिकडें बेल वाजली आणि इकडं लाटेतं दिसलेला शेवटच्या प्रश्नक्रमांकासमोर ‘सी’चा गोल रंगवत….दिला एकदाचा पन्नास उत्तराचा खेळ नशीबावर सोपवून… 
      पहिला पेपर कसाबसा संपला…पुढचा पेपर सव्वाअकरा वाजता….म्हणजे आता अर्धांतास मोकळा… पुढच्या पेपरमध्ये प्रश्न पन्नास आणि सगळे सोडवायचे….एवढे दिवस केलेल्या अभ्यासातलं एवढसं पण आठवत नव्हतं…मनातल्या मनात रिविजन काय डोबंलाची करणार….समुद्राला संमातर दिशेने असलेल्या वीजेच्या तारावर सरळ रेषेत काही पक्ष्यांचा येण्याजाण्याचा खेळ मागच्या काही तासापासून मी पाहत होतो. मगाशी गोळे रंगवायची लगबग होती…आता थोडं निवांत होतो. कश्याचंच बंधन नंसण….हव तसं जंगण….मुक्तपणे….इतक्या उंचावरुन आजूबाजूचा रहाटगाडा पाहत बसायचं…काय मजा येतं असेलं ना. या पक्ष्यांना खंरच काही गुपित माहित असतील…त्यांना मन असेल…त्यांनाही माणसांबदल…आजूबाजूच्या जगाबददल…प्रश्न पडतं असतील... का फक्त खा, प्या आणि उडा एवढचं…काहीतरी खूणागाठाबांधून विश्वनिर्मात्याने त्यांना इथं निर्माण केलं असेल नाही का… मनात विचाराचं काहूर वाढतचं चाललं होतं…समोर लाटा खूपचं जोरजोरात किना-यावर येतं होत्या. आता मात्र जोरदार पाऊस सुरु झाला आणि त्या वीजेच्या ता-यावरुन पक्ष्यांनी एक-एक करत उडून जाऊ लागले….काहीनीं वर्गासमोरच्या खिडकीजवळ आसरा घेतला आणि पुन्हा एकदा त्याच्यां स्वातंत्र्याची कीव येत होती…आपण का परीक्षेला आलोय याची जाणीव झाली…शेवटी पैसा कमवायचायं….एक आसरा या ऊन, वारा, पाऊस याच्यांपासून बचावासाठी….या जगाच्या रहाटगाडयाच्यां चाकात आपण कसं गुरफटलोय ते कळून चुकलयं…पुन्हा दुसरा पेपर सुरु झाला….मात्र पुन्हा हा देखील पेपर कठीण जात होता….आणि पुन्हा उरलेल्या पंचवीस प्रश्नांना समोरच्या समुद्रमंथनातून येणा-या ए,बी,सी,डी मधून निवडायला तयार झालो…इकॉनामिकस, बेसिक अंकाऊटस, डिमाडं सप्लाई करव, कॅपिटल गिअरिंग रेशो कशाचाच थांगपत्ता लागत नव्हता. यावेळी मात्र लाटासोबतचा खेळ फार कमी वेळात संपला…. मात्र सकाळी त्या इतर मुलांनी का मिसळपाव, मेंदूवडे खाले याचीं प्रचिती मला आता सव्वाबारा वाजता येत होती…किमान चहा तरी प्यायला हवा होता पोटात कावळे ओरडत होतें…शेवटी बेल वाजली.

     आता तिसरा पेपर दोन वाजता म्हणजे दीड वाजतावरती यायचं… मी आता पहिल्यादां वर्गाबाहेर आलो. म्हटलं आता खिडकीसमोरुन नको…थोडयाश्या वरच्या बाजूला असलेल्या पाय-यावरुन बघितलं…ओ मॉय गॉड….आजूबाजूच्या झाडीनीं वसलेल्या त्या भागात आता समुद्रकिनारा स्पष्ट मोठाला दिसत होता….वाळू मध्ये उनाडग्या करणारी टपोरी पोरं, किना-याच्या वरच्या बाजूला असलेलीं झोपडपटटी, कुणाचंही न ऐकणा-या आपल्याच नादात असलेल्या लाटा म्हणजे वर्गातून जे बघतं होतो ती झलक होती तर….इतक्यां उंचावरुन समुद्र दररोज बघता येणा-या समोरच्या त्या झाडी पलीकडल्या इमारतीमधल्या लोकाचं मला खंरच हेवा वाटत होता सकाळी झोपतून उठल्या उठल्या समोर रिफरेश करायला समुद्र दिमतीला…वा! या कॉलेजमध्ये इजिंनीअरिगं करण्याला येथून समुद्र पाहत शिकताना किती मजा येतं असेलं….मी आता येथेच रमत बसणार…इतक्यात कुणीतरी खालती असलेल्या बॅगाची आठवण करुन दिली आणि मी भानावर आलो. 
      लिफ्टच्या जवळ आधीच खूप गर्दी होती…. मग पाच मजले उतरत धावत-धावत खाली उतरलो….बॅग सुरक्षित ठिकाणी होती…या शिपाई लोकांनी खूप मोठं काम केलं होतं…लोकांची अस्तित्व सुरक्षित ठेवण्याचं….सोबत बॅगेतून आणलेली बिस्किट खातं मी माझ्या प्रश्नप्रत्रिका बघत चुकींच्या उत्तराची चहलपहल करत होतो. इकडे त्या कॅटीनपाशी भलीमोठी दोनशे लोकांची रांग सुरु होती. कॅटीनवाले सुदधा पूर्ण तयारीनिशी होते. या दुस-या पेपरशी निगडीत थोडीफार फारकत जरी असली तरी मिळता-जुळता असलेल्या अभ्यासक्रमाशीं तिसरा पेपर….अजून काही डोक्यात साठवायला मन तयार नव्हतं…तरीदेखील जेवढं वाचता येईल तेवढं वाचतं होतो…इकडे लग्नसंभारभाप्रमाणे त्या सगळ्या आवरात लोकांची खाण्याच्या त्या ताटासकट जागा मिळवण्याची भूपाळी जेवणावेळेची तगमग ईथेही होतीच. माझ्या शेजारी बसलेल्या एकाचं बॅगेतून डबा काढत घास खातं-खांतच फोनवर बोलणं चालू होतं “अरे पहिला पेपर नीट गेला ….दुस-यातलं काहीचं येत नव्हतं…जो मागच्या वर्षी पास झाला असेल त्याला देखील यंदाचा पेपर सोडवता येणार नाही” आजूबाजूला सा-याचीं माझ्यासारखीच अवस्था आहे…मनाला धीर येणं म्हणजें काय तर हे….आपल्यासारखीच दुस-याची अवस्था असेल तर आपलं आता काय होणार याची काळजी वाटून राहत नाही…काहीजणांनी कित्येक वर्षापासूनची सहभोजनाची हौस या निमित्ताने भागवून घेत जमिनीवर बैठक मारली. “अरे बॅगा किमान वर्गासमोर ठेवायला दिली पाहिजे होती”…सकाळचं पालुपदं आताही चालूं होतं. काहीजण आता तेथल्या सिक्युरिटीशी वाद करत होते आणि तो देखील तितक्याच आत्मविश्वासाने “काही होणार नाही, इथं कोण येणार नाही…” आपली बाजू लावून धरण्याचे काम करत होते. “इथे सीसीटीव्ही सुदधा नाही आहेत, उदया काय चोरीला गेलं म्हणजे?”तेचं मगाचे पालक व प्रेमियुगुलाचां समुदाय भुकेलेल्या परीक्षार्थीनां बघुन त्यांच्या प्लेटीतला मेंदूवडा उचलत “वरुनचं तशी नोटीस आलीय…वरुन ऑर्डर आली म्हणून काय झालं….थोडातरी कॉमनसेन्स राखा…” आता सकाळपासूनच्या बाता आता भरपेट करत होते इतकेच….मॅनेजमॅटकडे यांची उत्तर नव्हती. आता पोट भरली होती…प्रेमीयुगुल अजूनही पेपर मधली उत्तर तपासण्यात मश्गूल होती…त्यांनाच खरी आपल्या जोडीदाराच्या भविष्याबदल चितां होती. आणि पुन्हा एकदा आपल्या बॅगा ठेवत खिसे आणि इतर तपासणी करत आतमध्यें सोडण्याचें काम सुरु झाले. आता पुन्हा काय चेक करायचं पण मॅनेजमेंटला कोणताही धोका पत्करायचा नव्हता. एखादा महाभाग मागच्या पेपरचा अनुमान घेत येणा-या तिस-या पेपरसंबधी नोटस घेवून गेला तर…. त्या गर्दीत काही जण आपला रोष “मागच्या दहा वर्षांपासून ही परीक्षा देतोय पण असा गोधंळ बघितला नव्हता असं म्हणून व्यक्त करत होते…” अजून दोन-तीन आवाजांनी तर अकरा, बाराचा आकडा सांगितला…आणि आपल पण असंच होणार की काय असं वाटू लागलं. दीड वाजायला अवकाश होता…मी पाचव्या मजल्यावर येवून पुन्हा समुद्र पाहत होतो…किना-यावर त्या दुपारच्या उन्हात कोणीही नव्हतं….इथे माझ्या शेजारी आणखी काहीजण हा नजारा पाहत होती…मला क्षितीज हा प्रकार फार भयानक वाटतो…जे खरचं कधी होणार नाही…जे दोघ कधीच एकमेकांना भेटणार नाहीत ते भेटल्यासारखं वाटणं…डोळ्याना सुखावणार, दिसणारं…असत्य….. एका ठराविक ठिकाणावर संपून गेला असावा वाटणारा हा समुद्र स्वत:सोबत किती-किती अनादी वर्षांपासून इथे पृथ्वीवर होण्या-या स्थित्यांतराचा साक्षी असेल ना…..आपणही एक दिवस नष्ट होऊ…जाऊ यांच्यातच मिसळून तरीदेखील हा इथेच असेल… लाटामागून येणा-या लाटा…यांला माहिती असेल का यांच्या अस्तित्वाचा सुरवातीचा काळ…त्यांने राखून ठेवलेली अनेक गुपित….लाखों किलोमीटरवरच्या चंद्राबरोबरचं त्याचं नातं…पुढेही टिकून राहिल का हे आकर्षण….
      पावणेदोन वाजले…. आतमध्ये वर्गात येऊन बाकावर बसलो पण अजूनही लाटा दिसत होत्या….इकडे कूजबूज सुरु झाली की हा पेपर सोडवायला केवळ एक-दीड तास पुरेसा आहे…सगळे अनुभवी परीक्षार्थी….मला आश्चर्य वाटलं कसं शक्य आहे… यावेळी पंच्याहत्तर प्रश्न…. सगळे सोडवायचे आणि अडीच तास….…पेपर सुरु झाला. पहिल्या एक तासा नंतर तीन दहाच्या सुमारास काही जणानीं आपली गोळे करुन झालेली उत्तरपत्रिका पर्यवेक्षकांकडे जमा करत बाहेर निघालेसुदधा मात्र त्यांना प्रश्नपत्रिका बाहेर नेण्यास मनाई होती ती ईथेच पर्यवेक्षकांकडे जमा करावी लागणार होती जर साडेचार वाजेपर्यंत थांबल्यात तरच प्रश्नपत्रिका नेता येणार होती (शिक्षणमंडळाचे वरुन आलेले आदेश काय करणार!), काहीजणं साडेतीन, पावणेचार वाजता जायला तयार झाले…पणं प्रश्नपत्रिका पुढच्या परीक्षेच्यावेळी अभ्यास करायला उपयोगी पडेल म्हणून साडेचारपर्यंत बसून राहणार होते….मला शिक्षणमंडळाच्या आदेशापासून…पुढच्या परीक्षेवर अवलंबून राहणा-या माझ्यासारख्या सगळ्याबदल हसूं येत होतं… सुटण्याअगोदर दिली असती प्रश्नपत्रिका घेवून जाऊ तर कोणता मोठा प्रश्न उभा राहणार होता…नेमक्या कुणाला त्यामुळे कॉपी करायला मदत होणार होती… हया प्रश्नपत्रिका ठेवून निघून गेल्यावर काही दिवसातं नेटवर उपलब्ध झाल्या असत्या, हा आमचा मूर्खपणा, जे आम्हाला त्याचं आपण सोडवलेल्या प्रश्नपत्रिका हव्या होत्या….चार वाजले…मी पुन्हा एकदा शाशंक होतो…पंच्याहत्तर मधले अजून बरेच प्रश्न मी मनाच्या आणि समुद्रमंथनातून लाटेवर येणा-या उत्तरावर सोडून दिल्या. मनी आणि कॅश मार्केट ते मोड मिडयन, बॅका, त्यांची स्थापनासाल, आंतराष्ट्रीय नाणेनिधी, पुन्हा डिमाडं स्पलाय, इलास्टीसीटी संगळ... संगळ…काय बरोबर?....काय चूक?…चारीहीच्या चारी पर्यायबरोबर….कोणतेतरी दोन निवडा…आणि.…. खेळ सुरु. इकडे माझ्या उजव्या बाजूकडील दोन महिलामंडळीनी सगळे गोळे रंगवून झाल्यावर आपआपसात चर्चासत्र सुरु केलं आणि आता यांत कोणत्याही गनिमी कावा नसल्याचं पर्यवेक्षक मंडळीना लक्षात आल्यानं त्यांनीही दुर्लक्ष करत त्यांना मूकसंमती देऊन टाकली….बरं चालं होत त्यांच…बाता पेपरावरुन महागाईवर आल्या होत्या…दोघीही सगळी उत्तर अंदाजे लिहिल्याचं बोलत होत्या…सव्वाचार वाजले…मी ही आता वैतागलो होतो…परीक्षा मनासारखी गेली नव्हती…आता पुन्हा एकदा पहिल्यापासून अभ्यास करावा लागणार असचं वाटतं होतं…पाऊस वाढतच होता….आणि खिडकीच्या बाजूच्या तावदानावर येवून बसणा-या पक्ष्याची संख्या वाढत होती….इतक्या उंचीवरुन समुद्राच्या लाटा आणि परीक्षा असा माहौल पुन्हा येईल का माहित नाही…
     शेवटची बेल झाली…आणि तीन पेपरसह मी ही मागच्या अनेक महिन्यापासूनचा डोक्यात साठवलेल्या अभ्यासचां भार हलका करत इमारतीचे मजले उतरत खाली बॅग शोधू लागलो…मागच्या अडीच तासामुळे…डोक जरा भ्रमिष्ट झाल्यासारखं वाटतं होतं…कोठे ठेवली…इथे..नाही….हा…सापडली… बॅग सापडली…मोबाईलही होता…बॅगा अडकवतं खूप जणं पेपर सोपा-कठीण असल्याचं एकमेकांना सांगत रस्त्यावरुन चालत होती…आता पुन्हा समुद्र उंचावरुन पाहत वेळेशी बांधील राहत…लाटाच्या मदतीने सोडवलेली उत्तर….पुन्हा कधी माहित नाही? बाहेर पाऊस नव्हता. ओलसर रस्तावरुन चालत, यावेळी गुगलमॅपची मदत न घेता मेट्रो गाठली…. “पेपर कसा गेला?” या घरच्यांच्या प्रश्नाला काय उत्तर दयावं यांचा विचार सुरु झाला…

-आशिष अशोक  गुरव .
********************** कथा आवडल्यास अभिप्राय (कॉमेंट मारा) नक्की कळवा ***************
       ******************* Please comment if you like the story ***************
( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before  publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online  ,must be shared in totality . ) 

Sunday, 31 July 2016

माझं मन- कविता

                                          माझं मन

 स्वतःच्या शोधात
   मनाच्या डोहात
    खोलवर जात
      तळ गाठत
        ओजंळीत सापडेल
          तेवढं घेऊन 
             काठावरती….
               गुदमरलेला श्वास घेत
                  सापडलेली पुंजी
                     एक एक करत उलगडत…
                  चिकटलेली जळमट
                दोन-चार रुसवे-फुगवे
             थोपवलेल्या आणा-भाका
          पश्चातापाच्या फुगीर खुणा
        फुशारकीच्या फाजील बाता
  वर्चस्वाची छुपी लढाई
आणि गलितगात्र झालेला स्वाभिमान
  या सगळ्याचा…
     काठावरती हिशोब मांडत
          काय खर अन किती खरं
               विवेकवादाशी फारकत घेत
                   जुना मामला झाकत
                        नवा मुलामा लावत
                           पुन्हा एकदा तयार केलं मन
                             रस्त्यावरच्या खडडयापासून
                                खटकणा-या स्पर्शापासून
                            पदोपदी होणा-या अपमानासाठी
                         जातीपातीच्या राजकारणासाठी
                      आरक्षणाच्या टक्कयासाठी
                   सगळ्यासाठी तयार केलं मन
               सोशलसाईटवरच्या हॅशटॅगसाठी
           सरकारला निव्वळ दोष देण्यासाठी,
           माणुसकीला कॅमेरात कैद करण्यासाठी
           गरीबीचे फोटो घेण्यासाठी
           अपघाताचे विडिओ अपलोड करण्यासाठी
           सगळ्यासाठी तयार केलं मन
        दुभंगलेलं माझं मन पुन्हा एकदा
      थकत आणि स्वतःच्या शोधात
    मनाच्या डोहात
  खोलवर जात
तळ गाठत……
                                                          -आशिष अशोक गुरव 

********************** कविता आवडल्यास अभिप्राय (कॉमेंट मारा) नक्की कळवा ***************
       ******************* Please comment if you like the poem  ***************
( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before  publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online  ,must be shared in totality . ) 

Tuesday, 7 June 2016

पलीकडलं जगणं

                           
             

    झोपडपटटीच्या त्या शेवटच्या कोप-यातल्या गल्लीतील चाळीत माझ्या घराला लागून सातवी खोली… सुमार आणि मोडकळीस आलेल ते घर, सताड उघडा दरवाजा, एक झाप बंद असलेल्या खिडकीपाशी एकटक समोरच्या रहदारीच्या रस्त्याकडे त्या अशाच आशाळभूत नजरेने एकटयाच वाट पाहत बसायच्या. मी हल्लीच त्यानां पलीकडून बघायला लागलो होतो. पूर्वी वेळ नसायचा आता मी निवांत होतो. वयाच्या सत्तरी उलटलेल्या…सुरकतलेल्या चेह-यावरचे निस्तेज भाव, वाढलेली साधेंदुखीमुळे नीटसं चालता न येणं….खोकलां होताच दिमतीला…. सार काहीं आता मरणाच्यां दाराशी नेण्यास भर घालणार…आणि त्यात आजूबाजूचं भकास एकलंकोडं वातावरण….अजूनच मन खायला उठायचं आजीचं… मायेची म्हणावी अशी माणसं, नातेवाईक कोणी नव्हतं या म्हातारपणात विचारपूस करायला…संभाळ करायला... आपल्या तब्येतच्या पाऊलखुणा जपत जीव जगवणं तेवढं चाललं होतं…नाही म्हणायला चाळीतल्या लोकांची मदत होती पण ते तरी किती आपुलकी दाखवणार?... लोकांना आपली काम असतात… खिडकीसमोरच्या रस्त्यापाशी मागची अनेक वर्ष त्यांच्या अहोच्या येण्याच्या आशेवर काढली होती…. न सांगता कधी ऐके काळी जो नवरा कामावर गेला तो परत आलाच नाही…. पण तीला विश्वास होता तो परत येईल….लोकांनी तीला हजारदा समजावलं पण नाही !…. अर्थात इतक्या वर्षात खरचं त्यांच्या अहोचा सुदधा खरंच मागमूस नव्हता… पण तीला आशा होती नव्हे श्रध्दा होती तो परत येईल….आजही अशीच खोकल्याची उबळ तीलां एका जागी स्वस्थ बसू देत नव्हती….पण मनही आतून बैचेन होतं…काही तरी हरवलं होतं…जे अजून तरी इथेच कुठेतरी गवसेल…अशी आशा होती… पण आता कुठेतरी खोलवर मनाच्या तळात काहीतरी समजण्या-उमजण्याच्या पलीकडे होत होतं….काहीतरी निसटून गेल्यासारखं वाटत होतं…. खोकल्याची उबळ वाढतचं होती…तिच्या खाकरण्याचा आवाज आता अख्या चाळीभर ऎकू येत होता. आजूबाजूच्या इतर शेजा-यांना तीची काळजी होतीच…. म्हाता-या लोकानं बदलचीं सहानूभूती, पुण्य कर्म वैगरे सारं काही… “एकदा का आजीबाईनी डोळे मिटलें की बरं होईल…! हे हाल आता बघवतं नाहीत…नरकापेक्षा हाल कमी आहेत का इथ म्हातारीचें…, दोन हार्ट-अटैक येऊन गेलेत…कायं करते म्हातारी देवाला ठाऊक…बाईचं नशीबचं फुटकं लग्न झाल्यावर आई होण्याचं सुख नाही की म्हातारपणात सुखा-समाधाननं मरण नाही” लोकं पाठून काही-बाही बडबडायाची… मी तरुण जरी असलो तरी आता माझ्या हाती काही राहिल नव्हतं….त्या दिवशी दुपारी मी त्याच वाटेने चाललो होतो… त्यांच्या रुमपाशी…दरवाज्याजवळच उभा होतो जाता-जाता म्हटलं एक हाक मारावीच आजीबाईला….म्हटलं चौकशी करु सहजचं….“आहेत का बाई घरातं…..” सगळे बाईचं म्हणायचे तिला… “अरे… ये… आत मध्ये…तुला तर सकाळी दवाखान्यात नेला होता ना रे….काय वाटतं होतं…तुला?….” विसकटलेल्या केसाचां झुबका सावरतं एक-एक पाऊल सावकाश टाकत बाहेर आली….नाहीतरी तिला कोणतरी हवचं होत सांगायला….काहीतरी सागंण्याची तलब तिच्या हातवा-यावरुनचं दिसत होती….“औषधपाणी संगळ घेतायना वेळेवर…”मी आपलं दारावरती उभं राहून विचारलं….“अरे आत ये…नाव पण विसरले बघ.” ती आपला घसा साफ करत म्हणाली….मी अजूनही उंब-याबाहेरच होतो… “घेताय ना औषधं…" पुन्हा एकदां विचारलं…. "घेतेयं….औषध….! अरे मला की नाही आज सकाळी आमचे हे दिसले बिल्डींगबाहेरच्या रस्त्यावरं….” ती सांगत सुटली…. घसा काही खवखवणं बंद होतं नव्हतं….मी आपली एकनजर समोरच्या खिडकीच्या दिशेने वळवली खरी… तीचं हे नेहमीचचं पालपुदं होतं…संगळ्या लोकांना अशीच सांगायची…लोकहीं मग बाईचं डोकं काही ठिकाणावर नाही हे समजून तिथून निघनूचं जाणं पंसत करायची. “मला पणं दिसलं तसलंच कोणतरी…. तिथं रस्त्यापलीकडें, पण काही ओळख पटली नाही नीट…. मी स्वतः जावून आलो…” मी म्हंटल. म्हातारीला वाटलं मी चेष्टा करतोय. मी तिथूनं निघून जाणचं पंसत केलं…..बिचारी म्हातारी वयं झालं होतं ना….

   आता मात्र रात्रीपर्यंत  त्या भागात जास्तच गर्दी जमली होती… बाईच्या खोलीपासून सहावी का सातवी खोली….मयत आणार होते बहुतेक रुग्णवाहिकेतून.. जाणा-या-येणा-या प्रत्येकालां येऊन ती हेच सांगत फिरायची "….आमचे अहो रस्त्यापलीकडे उभे आहेत…..मला जाणं शक्य नाही होणारं…तब्येतमुळे …तुम्ही जाऊन घेऊन येता का…?" लोकांना कळकळीने विनंती करायची…काही लोकं तुच्छतुने बघायची… काही आपली चेष्टेवर नायची…काहीनां तीच्या अश्या बोलण्यामुळे तिची दया यायची….लोकांनी त्या मयताची खबर अद्याप आजीला कळवली नव्हती… आधीचं हार्ट पशेंट ती… रात्री बाराच्या सुमारासं आजीच्या खोलीतून जोरात किचाळण्यांच्या आवाज येतं होता…लोक तर जागे होतेच…तब्येत खूप नाजूक झाली होती बाईचीं….शेजा-यांनी बाईला हॉस्पीटलमध्ये एडमिट केलं. सर्वचं शेजा-यांनी आशा सोडली होती…. मी मन मोठं करुन त्याच्या सलाईनसह निपचित पडलेल्या देहाकडे एकदाच डोकावून पाहिलं…हिमंतच नाही झाली… डॉक्टरनेही आशा सोडली होती…हॉस्पीटलच्या व्हरांडयात चाळीतली खूप सारी लोक जमा झाली होती…”काय बाई अक्रित एका दिवशी आधीच दुपारी एक मयतं झालं चाळीत, ही तर म्हणायाला…म्हातारी हायं…पण त्या रवीचं तर वीस वय होत ना…बिचारा किती मेहनती होता मुलगा…कधी घरी नसायचा..  कामाला जावून रात्रीच्या कॉलेजला जायचा, कोणा मेल्याची नजर लागली कोण जाणे ?…. त्या रवीच्या आईने दुर्लक्ष केलं… बाईच्या मरणानंतर रुम चाळीच्या नावावर कशी करायची….नवरा एवढया वर्षात कधीच कसा आला नाय…?आणि उदया आला तर?” यां एकनाअनेक चर्चांना उधाण आलं होत.
     बाई परतल्या. दिसत तर अगदी पहिल्यासारख्याच होत्या अंगाने… पण चालत होत्या…  खोकलाही नव्हता…. आणि चेह-यावर आंनद होत्या खरंच इतक्या दिवसानंतर आज पहिल्यादां खूश होत्या….अगदी मनापासून….कारण ही तसचं होतं…त्यांचे अहो त्यांच्यासोबत होते…आपला हात त्यांच्या हातात टाकत…खरोखर आज तहान भागली म्हणायला हरकत नव्हती चातकाची….शेवटी तारु लागलं एकदा किना-याला…बाई आपल्या नव-यासोबत समोरच्या बिल्डींग पार करुन चाळीपाशी येऊन थांबल्या माझ्या घरापासून सातवी रुम… खोली खुलीच होती…येणारा-जाणारा खुशीत होता…पण त्यां दोघांच्या येण्याचं कौडकौतुक कुणालाच नव्हतं. दोघांना कोणीही ढुकूनंदेखील पाहत नव्हतं… घराच्या आतल्या भितीचां रंग बदलला होता…सगळं घर सजवलं होत…आजींचा नव-याच्या हातातला आपला हात सुटतच नव्हता… त्यांना फार भरुन आलं होत….प्रतिक्षा संपली होती… पण हे कायं घरात वास्तूशांती !… कोणीतरी जोडपं बसलं होत… “माझ्या घरात काय चालय हे… अहो तुम्ही बोला काय तरी यांना…थांबवा…यांना…“ तीं जोरजोरात ओरडतं होती… थांबवू पाहत होती सार काही…. पण नाही… कोणी ही थांबायला तयार नव्हतं… शेवटी बाईच्या अहोनी त्यांना रोखलं "….सावरा स्वतःला…. भानावर या, तुम्ही आता या जगाचे भाग नाही आहात…इथल्या आपल्या खाणाखूणांना केव्हाच पुसल्या गेल्यात…आता आपण पलीकडच्या जगाचा भाग नाही राहिलो…" त्यांनी आपलं एक बोट समोरच्या आरशाकडे नेत….बाईना बघायला सांगितलं…बाई दिसतचं नव्हत्या आरश्यात. त्यांनी बाईच्या कानात हलक्या आवाजात काही तरी पुटपुटल्या… लोक आपल्याला आता "भूत" म्हणतात… इतक्यात त्यांनी खिडकीपलीकडे माझ्या दिशेने हात करत हयाचं जंगण माझ्या नंतर काही तासानीं सुरु झालयं असं म्हटलं. एकाकी बाईना जाणीव झाली या अलीकडच्या जगाची. आणि काय आश्चर्य शेवटी बाईनी मला नावासकट ओळखलंच "…..अरे रवी तू….! ! !".

-आशिष गुरव .
********************** कथा आवडल्यास अभिप्राय (कॉमेंट मारा) नक्की कळवा ***************
       ******************* Please comment if you like the story ***************
( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before  publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online  ,must be shared in totality . ) 

Tuesday, 5 April 2016

आझादी (Hindi Short Story)

                                  आझादी (Without Dialogue)

   ज्योत्सना खाना बनाकर सो गयी थी की  दरवाजें की बेल ने उसे जगा दिया। कुरियर पार्सल लेकर दरवाजा बंद किया। अपने आप को आईने में देख ते हुऐ, पेट की तरफ जाती नजरे उसकी आँसूवो को रोक न पाई। बिना रिश्तेदारों की अनाथ लडकी से शादी करने का पुष्कर का इरादा शायद उसे शादी की तीन साल के बाद समज आ गया था। सातजन्मों की कसम खानेवाले अपने पती की  धोखा धड़ी ने उस आठ महिने की गर्भवती को औरही खोखकला बना दिया था। हर पल सहारे की जरुरत को जानते हुऐ भी पुष्कर आज भी कामसे देरीसे आया। एक हाथ मे फलों से भरा हुआ थेला और दुसरे हाथ में पिजंरे में तोते को लेकर आया था। पुष्कर के दोस्त धमैश के अचानक गाव जानेसे तोते को घर पे लाने की ये दुसरी बारी थी। सात दिनो से चलते आ रहे झगडे का पुष्कर के रोज के दिनचर्या पर कोई असर नही पडा था।

      ज्योत्सना की देर रात जागने की वजह से पेट में पल रहे बच्चे पें होनेवाली असर की बातसे पुष्कर को और गुस्सा आ रहा था। ज्योत्सना के कंधे को जोर से पकडकर ब्लडप्रेशर चेक करने लगा। ज्योत्सना ने अपना हाथ को पटकते हुए उसे दूर होना चाहा। दोनो के ताना-सुनी का ये अब रोज का मजंर ज्योत्सना के  हद्द से बाहर था। पुष्कर को स्केचपेन से कॅलेडर पे  सर्कल करते देख होम लोन का और एक किस्त भर देने की बात ज्योत्सना समज गई। पुष्करने तोते के लिए काटें हुऐ अमरुद के तुकडो से भरी प्लेट ज्योत्सना की तरफ बढाई ही थी की उसने प्लेट को जमिन पे फेंक दिया।

पहिली बार सिर्फं पुष्कर के कहने पे, ज्योत्सना सरोगेट मदर बने के लिए राजी हो गई थी। सरोगसी से मिलनेवाले पैसे में पुष्कर को होम लोन के किस्ते नजर आते थे। पर पुरे नौ महिनो सें बच्चो को पेट में महसूस करने, सारे दर्द सहने के बाद आनेवाली खामोशी उसे खुदकुशी सी लगती थी। पुष्कर की वंध्यत्व की  बात उसे दस महिने पहलें अलमारी में छिपे कुछ रिपोर्ट से समज में आ गई थी और पुष्कर ने इस बात के लिए माफी भी मांग लिए थी। पुष्करने बच्चे को दत्तक लेने एवं अन्य पैतरो के नामजुंर करते हुऐ फिरसे सरोगेट मदर बन कर होनेवाला बच्चा खुदद लेने की बात कह कर ज्योत्सना को राजी किया था। पर अब दस दिन पहेले ही ज्योत्सना को ये खबर लग गई की होम लोन के किस्तों से पुरी तरह से छुटकारा पाने के लिऐ उसे दुसरी बार सरोगेट मदर बनाया गया था।

       पुष्कर सोफे पे लॅपटॉप लेकर बैठा ही था की दस मिनीट बाद ज्योत्सना खाना रखकर बाहरी कमरे मे रखे तोते के पिजंरे को खोल देती है। आठवा महिना होकर भी, कुछ दिनो से चलते झगडे के बावजूद ज्योत्सना ने आज फिरसे खाना कैसे बनाया इस बात से पुष्कर काफीं अचंबित था। खाना खाते-खाते ही एकदम से पुष्कर को न जाने क्या हुआ और कुछ समजनेसे पहेले ही वो मौत के आधीन हो गया। ज्योत्सना ने कुरीयर पार्सलसे आऐ सायनाईट(cyanide) के असर से अंचबित थी।

                                    *************


                                    *************

                     आझादी (With Dialogue)


ज्योत्सना:(दरवाजे पें)
शुकिया इतनी रात को कुरीअर पार्सल लाने के लिए।

ज्योत्सना:(दरवाजा बंद कर आइने की तरफ देखते हुऐ)
आईने में चहरे वही दिखते है पर रोजमरा की कश्मकश् उस के माइने बदल देती है। काश में पहले ही समज जाती।

पुष्कर:(घर में पिजंरे मे तोते और फल लेकें दाखिल होकर फोन पर दोस्तसे)
दोस्त के लिए इतना भी नही कर सकता क्या? हा मेंने अमरुद और मिरचीया भी लेली है। अब तोते की जरुरते भीं तुझसे ही पुछगा क्या? हा हा हा…

पुष्कर:(फोन रखकर)
तूम अभी तक सोयी नही….. इसका बच्चे पें सिधा बुरा असर होता है पिछली बार कम वजन की बातसे मुझे ताने सुने पडे थे।

ज्योत्सना:
शायद मुझे पहेले ही जागं जाना चाहिए था। अगर पहिली बार सरोगेट मदर बनसे इन्कार कर देती तो आज ये सहना ना पडता।

पुष्कर:
बेबी…. बात को समझो ये हम दोनो का घरसंसार है ना…… तो थोडा तुम सहलो….. थोडा मैं सहेलाता हू … मै आजभी डबल डयूटी करके आए हू.. ये घर देखो …2BHK FLAT… . मुबंई मे खुद का घर होना हर किसी के नसीब मे नही होता और पहिली बार सरोगेट मदर बने के बाद आया पैसा मेंने अकलेने थोडी खाया छह के छह के लाख होम लोन के किस्तों मे चले गए…. मैंने भी बच्चे के लिए सिगेरेट तक बन्द कर दिई है।

ज्योत्सना:
घर की दिवारे सिर्फं अच्छे रंगो से सजाने के लिए नही होती ब्लकी वहा परिवार की सुखी तस्वीरे सजाई जाती है। तुमें तो हर वक्त पैसा नजर आता है। कुछ प्रेम, आस्था नाम की चीज रही ही नही तुम में…..!!!

पुष्कर:
अब मुझे बाबा लोग का प्रवचन मत सुना………. देखो बात को फिरसे उगालो मत!.... तुम सरोगेट मदर बन रही हो ये फैसला हो चुका है……… और जो कुछ दिन से शांती है वैसा ही माहौल रहे तो अच्छा है। रोना बंद करो तुम………. बच्चे की सेहत पे असर पडेगा।

ज्योत्सना:
तुमने कानून को धाबे पे बिठाकर मुझे दोनो बार सरोगेट मदर बना या है….. में चाहे तो आज ही पुलिस को जाकर सबकुछ बता दूंगी।

पुष्कर:
मेरे गिरफतार होने के बाद खाएगी क्या और जितना बडा व्हाईट कॉलर समाज उतना वेल-मॅनेज करपशन। ज्योत्सना डॉक्टर से लेके पुलिस तक सबको पैसा बाटा जाता है ……..और तुम्हे तो नजदीकीं रेल्वे स्टेशन भी नही पता पोलीस स्टेशन तो बहोत दूर की बात है………. सब चीज का बाजार लग चुका है यहा तुमें बस खरीद और बेचने की जरुरत होनी चाहिए।

ज्योत्सना:
बिना रिश्तोदारो की अनाथ लडकी से शादी करने का इरादा मुझे आज पता चला…… कमसे कम समाज के सामने लिए हुऐ सात फिरो का तो ख्याल रखते…..क्या क्या सपने नही देखे थे इस बच्चे को लेकर मेंने। दस दिन पहिले मुझे पता चला की तुमने सिर्फं पैसा कमाने के लिए मुझे दुसरी बार सरोगेट मदर बनाया है।….उडाने भरके आंसमा को छूनेही चली थी की तुमने आसमान गिरा कर मेरी जमिन ही छिनली।

पुष्कर:
तुम बात को नही समज रही हो ज्योत्सना…… इस बार का क्लाईट बहुत रहीस है और ये पिछली बार से तीन गुना ज्यादा पैसे देने वाला है एक बार ये होम लोन की कटकट खत्म हो जाए तो बाकी चीजें आसान हो जाऐगी। वेसी भी एक ई.एम.आय भर दिई आज …मेरी सॅलेरी आंधी तो इसी में चली गई। तुम्हारी इस सरोगसी के बाद बहुत बडा बोझ उतर जाएगा और इसी समाज में मेरा फॅल्ट! मेरा फॅल्ट! कहके चिल्लाओगी।

पुष्कर(ब्लडप्रेशर चेक करने के लिए हाथ पकडते ही):
ब्लड प्रेशर तो चेक करने दो कही कुछ-कम ज्यादा हो गया तो मेरे सारे सपने उज्ड जायेगे
ज्योत्सना:
छोडो मेरा हाथ…. सिर्फं तुम ही नही पुरे समाज पें से विश्वास उड चुका है …. शरीर हे मेरा…. मशीन नही…. क्या पुरा समाज ही अब शरीर से जुडना चाहता है उसकी साथ आने वाली कुदरत से नही। दस महिने पहिले अलमारी में छिपाऐ रिपोर्ट से मुझे पता चला था की तुम शरीर से नपुसंक हो पर आज मुझे समजमें आ गया की तुम दिलसे भी नपुसंक हो….कायर हो तुम कायर…क्या कहा था उस वक्त तुमने…. कहा था ना हम ना कोई बच्चा दत्तक लेगें ना कोई और पैतरा …..फिरसे सरोगेट मदर बन जाना बच्चा इस बार हमारा होगा…..

पुष्कर(तोते को फल खिलाते हुऐ):
तो मेरे पास और कोई और रास्ता नही ही बचा था….और नपुसंकवाली बात में बहुत बार माफी मागं चुका हूं। तोते का अच्छा है उसे तो बस खाने से मतलब है मालिक कोन है इसे कोई फरक नही पडता। तुम भी ले लो अमरुद सेहत के लिए अच्छा होता है….बल्ड प्रेशर काबू में रहेगा… तुम्हारे लिए नही बच्चे के लिए तो ले लो….माँ हो ना उसकी… तुम ये मत समजना जो खुद बाप नही बन सकेगा वो परवरिश को नही समजता


ज्योत्सना:
तुम क्या जानो परवरिश, माँ होने का सुख……… पेंट में होकर भी बच्चे को महसूस करने भरसे ही अन्दूरनी लगाव सा हो जाता है और अगले ही पल उसे बाहरी दुनिया पैसे की व्हवहार से छिन लेती है। इस गम को भुलाते भुलाते में थक चुकी हू पुष्कर।

पुष्कर(फोन पर बॉस से):
हा सर मै मेल चेक करता हूं काम है तो करना ही पडेगा ना सर…. नो प्रोब्लम….सर…

पुष्कर:
देखो ज्योत्सना मुझे ऑल-रेडी बहुत सारा काम है सो प्लीज डोन्ट डिर्स्ट्ब मी… अब फिरसे महाभारत मत शुरु करो……… आसूवांको पूछ लो…….. और पानी लाना प्लीज…

ज्योत्सना:
पानी सर से उपर बह चुका है। मेरी बातों को…महाभारत कहते हो.. हरबार में देवकी का गम लेकर …यशोदा का आंगन नही सजा सकती… मै अब और बरदाश नही कर सकती।

पुष्कर(ज्योत्सना खाना रख कर चली गई):
आठवा महिना होकर भी खाना कैसे बना लिए आज…. और उपरसे सात दिन की अनबन और खटटास के बाद… पागल ही होती है बिबीयां….

पुष्कर(खाना खाते-खाते):
ज्योज्योत्सात्साननननानानाना….

ज्योत्सना(मरे हुऐं पुष्कर को देखते):
तुम सही कहते थे बाजार हर चीज का लग चुका है बस खरीद और बेचने की जरुरत होनी चाहिए… कुरीअर से आया सायनाईट(cyanide) इतना असर करेगा सोचा ना था।

ज्योत्सना(तोते का पिजंरा खोलते हुऐ):
बगावत की शाम के इंतजार मै रह जाऐगे तो आजादी को तोड ना पाऐगे….. अब तुमे मालिक के हात के अमरुद खाने की जरुरत ना पडेगी। जहर चखता कोई और… सुकून किसी और को… जरुर जहर मीठा होगा।


-आशिष गुरव .
********************** कथा आवडल्यास अभिप्राय (कॉमेंट मारा) नक्की कळवा ***************
       ******************* Please comment if you like the story ***************
( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before  publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online  ,must be shared in totality . )