Saturday, 13 February 2016

हिसाब--मराठी कविता (After Death of Braveheart Lance Naik Hanumanthappa Koppad)

            हिसाब
तो खुल्या दिलानं पहा-यात गुंतला होता
पांढ-या शुभ्र गालिच्यात
दफनून जवानांना
काळ फितूर झाला होता
अस्तित्वाच्या ढिगा-यात जीव
अजूनही खोलवर रुतला होता
तो हलकावे देत झुंज देत होता
गोठलेल्या शरीरात फक्त जाणिवा उरल्या होत्या
चंद्र सूर्यता-यांनाही मी
तुझ्यासाठी शपथा घातल्या होत्या
पण लाखो दुवाचा असर ना कामी आला
लुकलुकत्या आशेची ती किरणे ही झाकली आता
ती शुध्द फसवणूक श्रध्देची होती आमच्या
असता साथ जवानाची अश्या
तुला फिकीर रे कसली देशा
जीवावर उदार होत जपली मातृभूमि
तेवत ज्योत मनी तुझ्या बलिदानाची
प्रत्येक भारतीयांने
अमरत्वाचा हिसाब राखला होता

                       ---आशीश
 IF YOU LIKE THEN PLEASE COMMENT***************
( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before  publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online  ,must be shared in totality . )

No comments:

Post a Comment