Sunday, 11 February 2018

आले ‘बोक्या’च्या मनी

                             आले ‘बोक्या’च्या मनी 


        पुढयात पडलेल्या मादेली, पापलेटच्या घरी तळलेल्या या खंडक्या पुढचे काही दिवस ताटात पडणार नव्हत्या, देवदर्शनासाठी बाहेरगावी रेल्वेने जाणारं होते बहुतेक सगळे… त्याच लगबगीत होते… सामानाची बांधाबाध सुरु झाली…. आणि अखेरीस तो दिवस उजाडला…. तयारी झाली एकदाची, एक-एक करत सगळ्या बॅगा घराबाहेर आल्या, कुलूप लावण्याअगोदर, लाईटचा मेन स्वीच बंद केल्याचं पुन्हा बघितलं, गॅसचा रेग्युलेटर दोनदा चेक करुन झाला… हो संपला एकदा सोपस्कार…कढी लावली, कुलूप देखील लागला… चावी लावली… पुन्हा चावी लावली… पुन्हा एकदा कुलूप काढलं मी आतमध्ये रुसून बसलो होतो…. मला माहित होतं…हे मला नेत नाहीत…मला अलगद उचलत बाहेर आणलं.. परत एकदा कुलूप कढी लावून झाली. मी दाराजवळच्या उंबरठावर तसाच शेपटी पसरवून उभा… सगळ्यानीं आपला उगाचच टाटा, बाय वैगरेच्या खोटा रीतीरिवाज पार पाडला… गावी निघताना माझ्या जेवण्याखाण्याची व्यवस्था म्हणून खास सुका जवळा, बोबील यांनी भरलेला डबा शेजाराच्याकडे देत “सकाळं सध्याकाळ घाला त्याला थोडंथोडसं यातला आणि घराकडे लक्ष असू दया” म्हणत कुलूप लागल्याचं पुन्हा एकदा खात्री करुन घेतलं आणि सगळे निघून गेले. माझं मन हुरमुसल्यासारखं झालं, आता मी त्या शेजाराच्यांच्या घरातल्या उंबरठयावर येऊन थांबलो. चहाचा कप खाली ठेवत शेजारीणबाईनी आमच्या घरच्या चाव्या आपल्या घरातल्या समोरच्या भिंतीवरल्या खिळ्याला अडकवल्या. “मला सोबत नेलं असतं तर काय झालं असतं…” माझी मनातल्या मनात बडबड सुरु झाली. माझी काळजी वाटतयं दाखवण्यासाठी डबा देत हा सगळा शेजारधर्माचा खटाटोप का म्हणून करायचा ?… मी आता उंबरठयावरुन शेजारीणबाईच्या घरात प्रवेश केला. मघाचा कपातला अर्धां चहा संपवत दरवाज्यापाशी कोणी नसल्याची खात्री करुन मग शेजारीणबाई सुरु झाल्या “आता काय आम्हाला हीच काम राहिली हायत का यांच्या माजंराकडं अनं घरादाराकडं लक्ष ठेवायला….आम्हाला काय, वाटत नाय..जनावरं पाळावाशी …पण दुस-याच्यां डोक्यावर ओझ का म्हणून दयायचं, एवढं बोके-माजंरी पाळायचे शौक तर घेवून जायचं आपल्यासोबत” शेजारीणबाई तावातावानं बोलत सुटल्या. थोडं का होईना माझ्या मनातलचं बोलल्या, मला थोडं हायसं वाटलं. 

         थोडयावेळानं त्यांनी तो जवळयाचा डबा उघडला, डब्यातला सगळा जवळा माझ्या पुढं केला, माझा राग अजूनही गेला नव्हता… मी कशाला खातोय जवळा….. एवढयात त्याचें यजमान आतल्या खोलीतून बाहेर येऊन तिथे सोफयावर बसले. या शेजारीणबाईनीं मात्र माझ्या न खाण्याचा, घ्यायचा तो अर्थ घेतला आणि डबा बंद करत यजमानांकडे बघत “मी म्हटलं नव्हतं… हे आजकलचे बोके…मिजासी खाणं यांच…ताटात पडलेलं खायचें दिवस नाय राहिले आता…बाहेर चमचमीत खाल्यावर कुठे लागतेय घरच्या चपाती, भाजीची चव… ही या बोक्याची त-हा तर माणसं का नाय चकाळणार….” रात्री कारल्याची भाजी न खाता ताटात तशीच ठेवलेल्या आपल्या नव-याला शेलक्या शब्दात टोमणा देण्यासाठी शेजारीणबाईचं हे बोलणं सुरु आहे, हे न समजण्याइतका मी काही दूधखुळा नव्हतो (शब्दश: घेवू नये…मी प्रत्यक्षात ….ठार दूध नादखुळा आहे….असो…असणारच…तो आमचा जन्मसिदध अधिकार आहे)… आणि कोण या बाईसाहेबाचं बोलणं मनावर घेईल (तेवढं तरी निर्ल्लज असावं… (निवस्त्र असलेल्याना कुठे असते लाज)...(कंस तरी का टाकायचे? (आतलं लिहण्यासाठी))). माझ्या त्या डब्याकडे ढुंकूनही न बघण्याचा या शेजारीणबाईनी येणा-या बुधवार, शुक्रवारच्या यजमानासाठी करायच्या डब्याचा मेनू सुटल्याचा मतितार्थ घेतला आणि आपलं आपलं ठरवतं स्वतःच्या “मार्गशीषात नेहमी नेहमी काय-काय म्हणून कडधान्य करायचं” या अस्टरच्या फुलांची बाग डोक्यात भरवण्याचा प्रघात चालू ठेवणा-या प्रपंचिक संमेलनातल्या समाप्तीच्या घोळक्यात चोथा होत आलेल्या “अजून एक मार्गशीषचा गुरुवार बाकी आहे हो” वाक्याचं शेवटचं रवथं होणं थांबत “संपला एकदाचा मार्गशीष्” म्हणत सुक्या जवळ्या बरोबर वांगी घालू की बटाटी या यक्षप्रश्नास पर्याय म्हणून आपल्या यजमानाच्या समोर सुरी आणि टॉमेटे पुढे केले, दुस-या घटकेस आज्ञा शिरसांवदय मानत एकेकाळच्या वाघ असण्याच्या आपल्या आठवणीनां धूसर करत ताटाखालचं मांजर होण्याच्या दुर्मिळ प्रंसगास साक्षी बनवत मनुष्य उत्क्रांतीच्या टप्प्यात मांजर जमातीचा अंश नक्की असल्याचा संशय बाळगत त्यांच्या यजमानांनी “इतके तुकडे बारीक बस का? की अजून कापू” म्हणत सुरीच्या धारेशी होत चालेले वाद आता सुरळीत करत एकजात केलेले टॉमेटेचे तुकडे पेश सुदधा करुन टाकले.

         माझं मन काय तिथं रमेना…शेपटीचे हेलकावे तरी कितीवेळ देत बसणार….तरी देखील मी उगाचच येरझा-या घालत होतो शेवटी वैतागून निघणार इतक्यात, या बाईनी खुळखुळासारखा वाजणारा पिजंरा माझ्यासमोर आणून ठेवला, हो… तोच तो उंदीर पकडण्याचा चापासकटचा लोखंडी पिजंरा… हो आत उंदीरसुदधा होता (नाहीतर काय देखाव्यासाठी माझ्या समोर ठेवतील…) .उंदीर नाही हो… उंदराचं छोटसं पिल्लू (पिल्लू छोटसंच असणार ना)… असून नसल्यासारखं… मला जरासुदधा एक्साइटमेटं वाटली नाही… पहिल्यादा प्राणीसंग्रहालय बघायल्या गेलेल्या लहान पोरासारखीं ती नवरा-बायको पिजंराकडे आणि त्यानंतर “याला तुला खायचंय हा!” या डोळ्याच्या खूणा करत माझ्याकडे बघत होते… ”काय हा ढिम्मपणा या बोक्याचा…थोंड थोडं म्याँव म्याँव तरी कर…” या शेजारीणबाई अजून पिजंरा पुढे करुन म्हटल्या. “कुठून येतात उंदीर काय माहिती…” याचं आता हे मूषकशोधपुराण सुरु होणार मला ठाऊकचं होतं, यांच्या यजमानांनी देखील आमच्या घरच्यासारखंच उत्तरादाखल बोलले ”शेजाराच्या घरातून येत असणार बहुतेक” फरक इतकाच एकमेकांच्या बाजूला असलेल्या भितींकडे दाखवणारं याचं बोट डावीकडं होतं आणि आमच्याचं उजवीकडं…समान भिंतीतला छोटासा पोखरुन ठेवलेला होल…उंदराच्या येण्या-जाण्याचा खुष्कीचा मार्गं…कोण बुझवणार…दोन्ही घरातूनं कडाडून एकमेंकाकडे बोट दाखवणं चालू असतं (महापुरुषाच्या पुतळ्याकडून घेतलेला गुण)… इकडे तो इवलासा उंदीर मात्र त्या पिंजरात परिक्रमा मागून परिक्रमा घालत होता. बहुतेक त्याला आमचं नातं ठाऊक नसावं… मी वचक म्हणून एक पंजा त्या पिजं-यावर ठेवला. त्या शेजारीणबाईच्या यजमानानां आता हायसं वाटलं. त्यांना (आपली) / माझी शिकार माझ्या तोंडात सुपुर्द करुन स्वतःच्या घरातली ब्याद संपावयची होती, पण मला यांच्यात काडीचाही रस नव्हता. माझा एक पंजा पिजंराजवळ ठेवताच तो इवलासा जीव पिजं-यातल्या एका कोप-यात निवांत मटकन बसला. मी पंजा काढला आणि त्याची वळवळ पुन्हा सुरु “अहो पिजंरा बाहेर न्या… नाल्याजवळ… तिकडचं खाऊ देत या बोक्याला…” आणि… पुढच्या योजनाबदध कार्यक्रमचं शेजारीणबाई विधी सांगण्याअगोदरचं… त्यांच्या यजमानांनी “पण…पंरतु…” या शब्दाची आळवणी सुरु करत आळशीपणाशी बांधील राहण्याचा प्रयत्न केला. “न्यायलाच हवा काय? हा बोका नेल ना तोडांत घालून…” चालू होतं दोघा नवरा बायकोचं संसारमंथन… मला या उंदाराच्या पिल्लाला खाण्यात अजिबात रस नव्हता… मी मुळीच पकडणार नव्हतो…पण त्यानां विश्वास होता…नव्हे त्यांना खात्री होती आमच्या वै-याबदल…त्यांनी चाप हलका सोडायचा.. त्यामुळे लोंखडी पिंज-याच दार हळूच उघडणार… उंदीर नाईलाजाने टूणकण ऊडी मारुन बाहेर येणार… मी एका पंजात पकडत दुस-या क्षणाला तोंडात घेत.. घराबाहेर त्यांचा फडश्या पाडणार… पण नाही … तसं काहीच घडणार नव्हतं.. एव्हाना घडलं ही नाही… यजमानानीं आळशीपणावर आरुढ होतं नाल्यावर पिजंरा न नेता इथचं पिजंरा उघडण्याचं ठरवलं….. त्यांनी चाप ओढला…मी आपलं बघितल्या न बघितल्या सारखं केलं…आणि काय होणार…हे छोटे राजे पसार…जगप्रवास करायला मोकळे… लॉटरी एका अंकाने चुकाल्यासारखा चेहरा झाला होता यजमानाचा.. आणि यामुळे शेजारीणबाईचा पारा चढला. त्यांची ती नेहमीची शिव्याची कॅसेट सुरु करणारच होत्या… ”शिरा पडली…. सांगितलय होतयं… बाहेर जाऊन पिजंरो उघडा… या बोकाच्यो चवी लय हत… तो असला काय खावचो नाय रांडेचो …आता अख्ख्या घरभर फिरीत बसात यो पाजिवलो…. अक्करमाशी…उंदीराची जात” जरा काही मनासारखा झालं नाही की मग सरळ मालवणीत सुरु होतं शेजारीणबाई…हे सगळ निमूटपणे ऐकून घेत यजमानांनी हार न मानता आपल्या खात्यातलं अजून एक ब्रम्हास्त्र वापरलं, आणि ते कामी सुदधा आलं…ते ब्रम्हास्त्र तो लोखंडी पिंजरा नव्हता हे विशेष…. काही मिनिटातचं बिचारं नुसत उंदीराचं एकच पिल्लू…नाही आणि त्यांच्या सोबत अजून एक उंदीर माझ्यासमोर !… एका दगडात दोन पक्षी मारल्याचा अनुभव किमान उंदीरांबाबत सांगण्यास मिळाल्याचा आनंद यजमानाच्या चेह-यावर दिसत होता. 

         आजकालचं नवं फॅड… एका पुठयावर चिकट गम काय लावतात… त्यावर तो बिचारा इवलासा जीव चिकटला की देतात माझ्या पुढं सोडून… यांच्या ताटाखालचं माजंर व्हायचे दिवस नाय राहले आता… दोन घटका त्यांनी पुठठा माझ्यासमोर ठेवला… मी जागेवरुनसुदधा हललो नाही. माझं मौन व्रत बघत त्यांनी उंदीराच्या पुठठयासकट नाल्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली. नाही म्हणायला माझीही काही उपासमारी होण्यासारखी परिस्थिती नव्हती तशी…. देवाच्या कृपेने दोन वेळचं पोट भरण्याइतकं तरी घराबाहेर नक्की मिळेल अशी आशा होती (घराच्या बाजूलाचं रेशनिंगचं नीळं आणि सफेद केरोसीन ब्लॅकने (काळ्या बाझारने बोलणं आऊटडेटेड झालयं…परिस्थिती तिचं असूनसुदधा….), खडीमिश्रित धान्य इत्यादी ध्यान देऊन विकणा-या, जास्तीचा एरीया वाढवतं किराणामालाचं दुकान थाटलेल्यांचं गोदाम असल्यावर मूषकाचा वावर तर कोळ्या भोवतल्याच्या जाळयाइतकं साहजिकचं आहे….(केवढा मोठा कंस…..संपला एकदाचा)), आता तुम्हाला म्हणून सांगतो, इतक्या मोठया धान्याच्या कोठार असतानाही आमच्या घरच्या देव्हाऱ्यातल्या पणतीतली वात चोरुन नेणा-या उंदीरबददल मला प्रचंड दया येते (…वात पळवण्याचा असतो एकएका उंदाराचा छंद…आणि त्यांना गटटम करणं हा माझा छंद….). पण यांना पकडताना मात्र काही वेळा माझी फसगत होते… भाद्रपद-माघी गणेशोत्सवाचा काळ असतो बहुतेक…आणि गणेशमूर्तीला नाईलाजाने नतमस्तक व्हावं लागत… (मूर्तीकारानं जिवंतपण आण्याचा प्रयत्न केल्यावर होतं असं…कधी…कधी…कोणं उंदारानां श्रेय देणार…छे…मी तरी नाही देणार)….जाऊ दया किमान त्या निमित्ताने तरी गणपतीच्या मूर्तीला लीन होता येत नाहीतर आमच्यासारखचं सार लक्षं त्या पळीभर तीर्थतून पडणा-या एक दोन थेंबाकडच्या प्रसादाकडे जास्त असतं. पण उंदीर पकडण्याचा माझा सोस आजकाल कमी झाल्यायं, कोणती गनिमीकावावाली कसरत करत बसणार? 



         एक घबाड हाताला लागलं होतं, हल्ली उंदीर खायचा मूडच नाही होतं, मच्छी आयती मिळतं चालली होती… ताज्या ताज्या सुरमई पापलेट… त्यामुळे घरी ही फार कमी जेवण होत होतं..…हो आज पुन्हा तिथंच चाललोयं… मासळी बाजरातल्या शेवटच्या रांगेत बसणा-या त्या मच्छीवाल्या बाईपाशी येऊन थांबलो, आज गर्दी नव्हती गुरुवारना… माझा नित्याचा ठरलेला कार्यक्रम…मागच्या बाजूला सारलेल्या टोपलीतले मासे हळूच तोडांत घालत मुकाटपणे एखादा सुनसान कोपरा पकडायचा….…हे मी संगळ माजंरी पावलाची जोड देत करायचो (तुम्हाला काय कॅट वॉक अपेक्षित आहे की काय)… तिला देखील टोपलीतली मासळी जरा जास्तच खपत असल्याचा अंत्यातिक आंनद व्हायचा….बिचारी कुठली (संवेदना..हो संवेदना (कळेल पुढे))….. हल्ली ईथे कावळयाचा वावर वाढला आणि त्या तिथे पलीकडे स्माशनभूमीजवळ पिंड न घेणा-या आत्म्याची संख्या वाढू लागली…. तर असो… माझी भूक चवताळली होती, मी नेहमीप्रमाणे पोहचलो, मच्छीवाली सुरमई कापण्यात व्यस्त….मी तिच्या मागच्या टोपलीकडे बघितलं… टोपलीवरच्या आवरणाला छेद देत आत डोकावलं… माझ्या मिशानां थंडपणा जाणवतं होता… बर्फात शहीद झालेल्या…. सुरमई.. पापलेट.. वा एकदम ताज्या ताज्या. मी पुन्हा टोपली बाहेर माझं डोकं काढलं… सगळीकडें निरखून बघितलं… सुरमईचे तुकडे करण्यात मच्छीवाली गुंतली होती… मी पुन्हा टोपलीत डोकं घुसवलं… आणि तोडांत सुरमई घेणार इतक्यात थंडपणाची सगळी झालर दूर सारत काहीतरी जोरदार आदळण्यासाठी येत असल्याची हलकी चाहूल झाली पण शे उशीर झाला...घात झाला... घोर अनर्थ झाला... इतक्या दिवस सुरु असलेल्या आभासी व्यवहाराचा पडदा पाश करत भम्रनिराशेचा जमा झालेला एक मोठा ढग तिनें म्हणजे मच्छीवालीने बाजूला ठेवलेला मोठा धोपाटणा माझ्या पार्श्वभागावर मारत पुसून टाकला “तरी म्हणतें इतके दिवस मोठमोठाली पापलेटं सुरमई गायब व्हातातचं कशी….” ती बोलतच सुटली. तिच्या चेह-यावर क्राइम मालिकेतल्या पोलिसाने चो-याला पकडल्याचं (आणि बदडल्याचं) सुख दिसत होतं… खाताना डोळे मिटण्याची जन्मजात सवय असल्यामुळे दिवसा तारे दिसण्याचे प्रंसग येणं साहजिक होतं (तुम्हाला देहाची तिजोरी गाणं आठवण्याची काही गरज नाही). 

        “कोणता बरे माणूस आज समोरुन रस्त्यावरुन आडवा गेला असेल, या इथे धोपाटणा कसा बरे आला” या आणि अनेक घडलेल्या घटनांचा मागोवा डोळे मिटत (अंध) श्रध्देने करण्यात गुंतून घेत आपली अशी इज्जतीची शक्कल बाहेर आल्यावर मी म्यावं म्यावंच्या पलीकडे काही न बोलताच तिथूंन निघालो (अजून दुसरं काही बोलू शकतो का आपणं… तुम्हीदेखील काही ही कल्पना करता राव!). पण शेवटी भावनेचा बांध सुटत बोललो त्या मच्छीवालींला “भिकारी कुठली” (वेदना..हो वेदना)… मनातल्या मनात…. 
        
        जखमा नसल्या तरी मुका मार होता.. सहनशक्तीची परीक्षा होती…आता मला काही राहावतं नव्हतं. भूकेमुळे पोटात कसकसंच व्हायला लागलं होतं. चालत चालत हमरस्तयावर आलो, मासळी बाजराच्या रस्त्याकडुन आलेले लोकाच्या हाताकडे बघत होतो, काळी पिशवी घेऊन काहीजण येत होते. समोरच्या बाजूला प्लस्टिक बंदीचा फलक चिकटवलेला. म्हटलं आता हीच वेळ आहे सामाजिक बांधिलकी दाखवत पोटापाण्याचा प्रश्न मिटवण्याचा, अनुभव होता गाठीशी थोडा. येताना कुणी दिसलं रे दिसलं की झडप घालायची. यांच्या हातात कुठे तो मघासारखां धोपाटणा तर नाही ना यांची खात्री करुन घेतली…. झडप घातली पण…. मी नुसत्या काळ्या पिशवीकडे लक्ष दिल्यामुळे अंदाज चुकला, तो तर मदयाचे प्याले वाहणारे साधन (दारुच्या बाटल्या) निघाल्या.. माझा पुरता हिरमोड झाला….माझ्या या कारनाम्यामुळें मागचे मात्र मासळीवाहक सावध झाले, माझी अवस्था ना घर का ना घाटका अशी झाली… मी आता जवळ्याच्या डब्याची आठवण काढत आवढें गिळत होतो… आता मला त्या रेशनिगंवाल्याच्या गोदामात शिरणे क्रमप्राप्त होतं तिथं मला मुक्तकंठाने प्रवेश होता पण आज तेचं नेमकं रेशनिगंच दुकान बंद… गुरुवार होता….मला निमूटपणानं पुन्हा शेजारीणबाईकडे जाणारा रस्ता पकडावा लागला… 

        आताच रस्त्यावर केलेल्या झडपशाहीच्या कारनाम्याचा धसका मला लोकाच्यां हातातल्या कापडी पिशव्यातून दिसू लागला. काही महाभाग आमच्या झडपकार्याचे स्वतच्या प्लॅस्टिकबंदीच्या राबवलेल्या मोहिमेच्या यशस्वीपणाशी सांगड घालतात तेव्हा वाईट न वाटता कीव येते बाकी काही नाही, पण ते जाऊदे विषय भरकटत चालायायं…. माझी भुक वाढतच चालली होती..मला तर चालून चालून वैताग आला होता… एखादा बगळा नाहीतर कावळा डोक्यावरुन जावा… नकळत त्यांच्या तोंडातून माश्याचां तुकडा पडावा… (मी तरी काय इच्छा करुन बसलोय, माझ्या पोटातले कावळे शमवण्यासाठी डोक्यावरुन कावळे, बगळे मासे पुरवण्याची… असो)… पण तसं काही होणं नाही….इथे आमच्या आयुष्यात पण स्वप्न कधी सत्यात उतरणार नाही यांची मनुष्याप्रमाणे शाश्वती होऊन बसली होती…

         मी आता एका मोठया सकारात्मक विचाराने नाल्यापाशी आलो पण निराशा हाती आली…ना चिकटगमाचा पुठठा होता… ना ती चिकटलेली उंदीरं…. सरकारला आजच स्वच्छतेचा पुळका आलेला दिसला… मला नाल्याच्या ठिकाणाहून माघार घ्यावी लागली…. मला माझ्या घरच्यांचा प्रंचड राग येत होता… मी घराजवळ आलो…मला समोर दुचाकी दिसली…जाऊन बसलो…घरचीचं होती…किती माया लावते घरच्या सगळ्यांना…काहीच कसं वाटत नाही यांना…मी आतून पेटून उठलो होतो…ज्या सीटवर शेपटी सावरुन बसलो होतो तीच मी नखाने टराटरा फाडू लागलो. त्या काळ्या रंगाच्या सीटचा वरचा आवरण फाटत आतला पिवळ्या रंगाची मऊ स्पजं बाहेर येऊ लागला. भूक तर जोरदार लागली होती, वाटत होतं घरचे यावे…. पण बघतो तर काय घरची सगळी मंडळी समोरुन येताना दिसत होती…. मी माझे मोठाले डोळे पायाने साफ करुन बघितले… हो खरचं येत होते…. मला स्वत:ला इच्छाधारी माजंर बनत असल्यासारखं वाटत होतं. सगळ्यात पहिलं आधी त्या दुचाकीवरुन पसार झालो…हळूच दुसरीकडून बाहेर आलो.. 

         शेजारीणबाईकडुन चावी घेत दरवाजा उघडला… बाकी घरच्या मंडळीनी बॅगा खांदयावरुन काढल्या. नेमकं झालं तरी काय, परत का आले सगळे, मी बोलणं निवातंपणे एकत होतो “तरी तुला म्हणत होतो रेल्वेची टिकीट तपासून घे एकदा पण नाही ऐकलं नाहीस” दुपारी तीनची म्हणून तो-यात गेलेल्या या मंडळीची गाडी रात्री तीनची होती जी कालच गेली होती. आता तिकीटाचे पैसे ही परत भेटणार नव्हते… दिवस आपलाच वाईट गेला नाही हे बघून बंर वाटलं. तरी बरं अजून मी केलेली सीटची चिरफाड यांच्या पाहण्यात नाही आलीय. वातावरण अजूनही तापलेलं होतं. जेवणाची लगबग सुरु झाली…मला तेच हवं होत… घरात घमघमाट पसरला, माझ्या पोटात दोन मांदेल्या गेल्यावर माझा जीव शांत झाला.

         अजूनही मंडळी एकमेकांवर राग काढतच होती, एकानं वैतागून टी.व्ही लावला.... न्यूज चॅनल सुरु होता, शेजारीणबाई आमच्या घरीची मंडळी परत येण्याचं कारण भितींआडून कळून सुदधा मुददामहून जवळ्याचा डबा परत करण्यासाठी आल्या तरीदेखील त्यांच्या चेह-यांवर, आता नेमका कोणता नवा मेनू यजमानाच्या डब्यासाठी करायचा यांची काळजी दिसत होती. “का हो आलात परत” शेजारीणबाईनी ठिणगी टाकली. थोडं निव्वळलेलं वातावरण आता अजून तापणार बहुतेक, “सगळी चुकी त्या कुमारचीच आहे, तिकीटीवरचा टाईम कन्फर्म करायला नको होता का ?”, जाऊ दे आता… होतात चुका सगळ्याकडनं…” ”आता दुसरी रेल्वे उदयाची आहे तिचा तरी टायमिंग नीट बघा” मघासपासून थांबलेलं रिपीट संभाषण शेजारीणबाईच्या येण्यानं पुन्हा सुरु झालं. इतक्यात टी. व्हीवर ब्रेकिंग न्यूज सुरु झाली… रेल्वे अपघाताचीच…गाडी रुळावरुन घसरण्याचीच..तीच एक्सप्रेस होती…माझ्या जवळा न खाण्याची बात शेजारीणबाई घरातल्यांना सागत होत्या, त्या ही अचानक टी. व्ही कडे बघू लागल्या, घरातल्याचं टिकीटावरचा डबा क्रंमाक बघणं सुरु होतं….नेमके तेच डबे घसरले होते… डब्यातल्या सगळयाच्या मूत्यूमुखी असण्याची खबर होती. सगळं आता... जर तर वर येऊन ठेपलं होतं…सगळे जर तिकीटावरील योग्य वेळी गेले असते तर काळाचा घाला नक्की होता… सगळं वातावरण शांत होतं… ”आणि मी यांच्या सोबत जाण्याचा हटट धरत होतो” मी एकाटाच स्वत:शी पुटपुटत होतो. मघासपासून एकमेकांवर आगपाखड करणारे सगळेजण, कसं त्यांच्या टाईमिगंकडे नकळत दुर्लक्षित करण्यामुळे चुकीच्या वेळी पोचले यांचे दाखले एकमेंकाना देत होते….इकडे मी आता यांच्या सोबत न जाण्याचा निर्णय घेत होतो आणि बाकी सगळे “या टाईमाला बोक्याला पण सोबत न्यायचं” म्हणत होते…..ते जायचं काय नंतरच नंतर बघू पण सध्या डब्यातल्या जवळ्यावर ताव मारणं सुरु होतं…


         

------------------

``````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````
-आशिष गुरव .
( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before  publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online, must be shared in totality . ) 



Wednesday, 9 August 2017

दुपारची झोप

                            दुपारची झोप

         सणवाराला सकाळपासून चालेली जेवणाची लगबग पोटात कावळे जमा करतं…मिनिटामिनटाला आवंढे गिळणं चालू होतं…पण अजूनही तुम्ही भूकेच्या तटावर उभे राहत निमूटपणे सहनशक्तीशीं निकराची लढाई करत असता….कधी एकदा नैवदयाचं ताट देवापुढं ठेवलं जातयं, आणि तुम्ही जेवताय असं होऊन जातं…जीभेचं तातकळणं सुरु व्हायला लागतं…पण अजून अवकाश असतो…जेवणाच्या तयारीची लगबग सुरु होते एकदाची…तुम्ही स्वयंपाकघराच्या बाहेर उभे राहत नुसताच कानोसा घेत असता….जसाजसा एकएक जिन्नस एकमेकांत घुसळत जातो, आगीचा धग अजून एकातएक मसाल्यांच्या चाललेल्या सरमिसळीला आपला-आपला रंग चढवत चाललेला असतो…आपल लक्ष कुठं दुसरीकडे लागतचं नसतं…. अजूनही कितीतरी वेळ आपलं आंवढ गिळणं चालू असतं… एकाएक वाफेला वाट मोकळी होते… आगीचे धग कमी होतात... अख्ख्या घरभर घमघमाट पसरतो…. अवकाशीचा एक एक क्षण आता ओसरायला लागतो… तुम्ही पहिल्याच पंगतीत बसण्याचा इरादा राखत जागेचा अंदाज घेत भिंतीलगतचा कोपरा पकडता…...शेवटी एकदाची केळ्याची मोठामोठाली पान जेवण्यासाठी म्हणून माडलीं जातात… तुम्ही आपल कसंबसं माडी घालत जमिनीवर थपकान मारता… जेवणाची पातेली एक-एक करत बाहेर जेवणावळीत यायला सुरवात होते. केळ्याच्या पानात एका मागोमाग एक जिन्नस आखीव-रेखीव मांडायला सुरवात होते….नैवदयाचं ताट मग देवापुढचा प्रवास आटपून शेवटी तुमच्याच पुढे येऊन थबकत… तुम्ही तुमच्या संयमाच्या सीमाचा कस लागण्याअगोदर गलितगात्र झालेल्या जीभेवरच्या आंकाक्षाच हेलकावणं थांबवता…. ती प्रत्येक दरवळ आता नाकापर्यतचा आभास न बनता अनुभव होण्यास सज्ज असते…. तुम्ही केळीच्या पानाभोवती पाणी शिपंडता… आजूबाजूचे चेहरे, ही एव्हाना तुमच्याकडे घुटमळत न राहता आपल्याआपल्या पानाभोवती पाहू लागतात… उपासाची धरणं तुटून पडतात… अहाहा जीभेचे चोचले पुरवणं चालू असतं…. वरण, भाज्या यांच्या वाटया खाली होणं, त्या भरणं…. पुन्हा संपण…. चालू असंत….उदरशांतीचा परमोच्चबिंदू गाठण्याचा यज्ञ अगदी जोरात चालू असतो.. एकाक्षणी पोटातली जागा संपते पण जीभेचा मोह काही संपत नाही…. आता तुम्हाला तुमचं स्वतःच जेवण संपवून उठणं कठीण होऊन बसतं… तुम्ही मांडयाची घडी मोडून उभे राहण्यासाठी आधार शोधता… पावलानां वाट करीत तुम्ही कसेबसे मोरीजवळ येता… हात धुताणाचं तुम्हासं जेवण्याच्या पंसतीचा ढेकर शरीर देऊन जातं, तुम्ही तोंड आणि हात पुसायला फडकं शोधता… तेही, नेहमीप्रमाणे आजही सापडत नाही…. तुम्ही निमूटपणे हात आपल्याच अंगावरच्या कपडयांना पुसून टाकता…दुसरी पंगत बसते….तुम्ही मात्र पंख्याखालची हवेशीर गारेगार जागा शोधत असता…आता घरभर पसरलेल्या घमघमाटात तुम्हाला काडीचंही स्वारस्य उरलेलं नसतं… जवळच दुमडलेंल्या चटईला पायानेच एकसंध करत तुम्ही तुमचं अन्नपूर्णाने भरलेलं धड जमिनीवर टाकायला मोकळे होता…. तिथंल्यातिथ जागेवर उशी शोधायला लागता… नाही सापडत… जास्त आळसावलेल्यामुळे आता परत उठून शोधायला तुमच्या अंगात त्राण उरलेला नसतो… जमिनाच्या एखादया उंचवटयाचा टेकू शोधणं चालू असतं…. तोही काही सापडत नाही…त्याचं न सापडणं रुखरुख वाढवत.. दोन-तीनदा कोपरा दुमडून पाहता…. पण नाही… ठरल्यासारखं काही होत नसतं… डोक काही मनासारखं टेकू करु देत नसतं… जमिनीला टेकलेलं अंग आता काही उठायला तयार नसतं..… तुम्ही जवळच ठेवलेला जेवणाच्या वेळचा बसायला घेतलेला पाट उशी म्हणून डोक्याखाली ठेवता… डोळे आता छपराकडे वळतात….

           जोरदार एकजात अडखळण्याचा न थांबता आवाज करणारा पंखा… सुशेगादीपणाची एक हलकी लहर… मनासारख्या जेवण्यामुळे दोन घास जास्ती पोटात गेल्यावर आलेली सुस्ती… उघडया जमिनीवर झोपल्यामुळे आपोआप आलेला मोकळेपणा… भिंतीजवळच्या कोप-यात दात कोरायला भेटलेली नेहमीपेक्षा जास्त निमूळती अगरबत्तीची काडी… अहाहा… आणि भरपेट जेवल्यामुळे लकत आलेले तुमचे डोळे… निवांतपणात एकरुप झालेला डोक्यावरच्या पंख्याचा कानात लय तयार करणारा आवाज… आणि त्यातच एकाएकी तुमची लागलेली तंद्री… असा संगम जूळून आल्यावर पुहडणं गाढ झोपेत बदलायला कितीसा वेळ लागणार.… फिरणा-या त्या पंख्याकडे एक टक पाहता पाहता मस्त पेंगण होतं खरं…. पण अजून झोपेचा अमंल पूर्णपणे सुरु झालेला नसतो…. मनासारखं जेवण असल्यामुळे दोन घास जास्तीचे खाल्यावर आपसूकच एक सुस्ती येते आणि एक मंद असा आळस तुम्हाला झोपच्या कवेत घेवून जाण्यास भाग पाडतो, उदयाची कोणतीही चिंता नसल्यावर सुखासीन होण्याच्या अवस्थतेला सगळयात सुदंर प्रंसग काय असेल तर ती म्हणजे दुपारची झोप.



       

  बाकीच्यांची पण आवराआवरा संपलेली असते….प्रत्येकजण जमिनला पाठ लावायला सुरवात करतो …वारादेखील आता मोकळ्या झोपाळ्याला झोका दयायला लागतो… त्यांच्या जीर्ण होत चालेल्या बिजागरांना गंज चढल्यामुळे एकजात झोकात किरकिर होणारा आवाज निवांतपणाला त्यांची स्तब्धता मोडायला भाग पाडतो. तुमच्या झोपेला खोलवर मुरायला अश्याच एकसुरी आवाजाची गरज असते. दुपारच्या शांततेत एक आस पकडून निर्विवाद चाललेल्या पंखाची एकटक साद मनाशी एकरुप करत हळूहळू डोळ्यांची होणारी लगबग आपोआप मिटवत क्षणार्धात त्या काळोखी डोहात खूप खोलवर घेवून जाते… क्षुल्लकश्या वा-याच्यां झुळकी सरशी हलणा-या नारळयाच्या झावळ्याचा आवाज, इतर आजूबाजूच्या झाडाच्या पानाची होणारी सळसळ….सगळं काही झोपेला पूरक….तुमच्या झोपचं सांग्रसंगीत गायन सुरु झालेलं असंत…. झोपेच्या अगदी खालच्या डोहात भ्रमच्या तळापाशी तुम्ही येउन ठेपता…. आजूबाजूच्या जगाचा गंध तुम्हाला आता राहत नाही… तुम्ही हळूहळू तिथल्या वातावरणात रममाण व्हायला लागता, नव्हे जुळवून घेवू पाहता… नाही… तुम्ही तिथे नकळतपणे ओढलें जाता…. तुमच्याच भासाने तयार झालेली एक अनभिज्ञ दुनिया… तुम्ही येणा-या प्रत्येक क्षणाला नव्याने पहात असता… काहीतरी गवसत असतं … काहीतरी निसटत असतं… इतक्या झपाटयाने हे सगळ होतं असतं की तुम्हाला हे सगळं साठवून ठेवायला अवकाशचं भेटतच नाही. जाग आल्यावर सर्व काही लक्षात राहावं अशी इच्छा असते म्हणून झोपेतच काही लक्षात ठेवू पाहता… पण नाही तुमची झोप तुम्हाला या भ्रमाची सावली गडद करुच देत नाही… नकळत डोळा उघडतो… तुमच्या पापण्या फक्त चाहूल घेतात… त्या उघडतात ख-या पण, झोप आपला अंमल दाखवयला सुरवात करतें… त्या पापण्या पुन्हा मिटल्या जातात.. तुम्ही झोप घेत आहात हे देखील तुम्ही विसरुन जाता… तुम्ही पुन्हा भम्रनगरीत शिरता… तुमचं शरीर आता नियंत्रण सोडतं… एखादा ढेकर जेवण तृप्तीचा इशारा देऊन जातं… पण इथं त्याचा मागमूसही नसतो… तसं होणं साहजिकच असतं… अहोहो… काहीतरी अस्पष्ट, काही कळ्ण्यापलीकडचं अनेक विचारांनी भरलेलं गलबतं इथं येवून थबकत… कुठला विचार घ्यायचा कुठला नाय घ्यायचा… तुमचं तूमीच ठरवता… खरोखरं कन्ट्रोल नसतो.. हळूहळू इथल्या नवीन स्टो-या सुरु होतात…आजची काय असेल?…

            तुम्ही एका जंगलाच्या सुरवातीला आहात…हे असंच काहीतरी सुरु होतं…कधीही न अनुभवलेलं…विचाराचा कोणता कोपरा मन कधी पकडेल सांगता येत नाही…तुम्ही यात गुरफटत जाता…कधी काळी डोळ्यात साठवलेलं, कुठे विचार केललं…कुठून कुठून काय काय गोळा करेल सांगता यायचं नाय… तुम्हाला पुढे काय असेल याचीचं उत्सुकता लागून राहीलेली असते…तुम्ही मागे वळून सुध्दा बघत नाही… समोर तुम्हाला फक्त मोठमोठाली झाडं दिसतात…एकमेकांत पार गुरफटलेली… फांदीला फांदी बिलगलेली… चालायला वाट सुचेल तसं चालत सुटायचं… सतत घोंघावणारा वारा अचानक सुरु होतो… डोक्यावरती बघितलं तर नुसतीचं झाडं… मोकळं आकाश कुठे दिसतचं नाय… तुम्ही वाट काढत सुटता… स्वप्नाचं हे एक बरं असतं… तुम्ही स्वतःलाच स्वतः बघू शकत असता… तुम्ही जास्त विचार न करता, हा झाडाझाडातून चालेला प्रवास संपावयाच्या मागे असता… तुम्हाला जंगलात जोराजोरात वारा जाणवायला लागतो. प्रकाश मागच्या पेक्षा अधिक वाटू लागतो…इकडे तुम्ही एका कुशीवरुन दुस-या कुशीवर सरकता…कुणीतरी पंख्याचा स्पीड तीनवरुन पाचवर करत आणि खिडक्या उघडल्या जातात. कानावर जितकं काही आदळतं त्यावरुन तुम्ही केलेला तो निव्वळ अंदाज असतो…पण तो खरा असतो…पण अजूनही तुम्ही स्वप्नातच असता. हळूहळू फांदया एकमेकाला जोरजोरात आदळायला लागतात…तुमच्या आसपासची सगळी झाड आवाज करायला लागता…तुम्ही चालणं सोडलेलं नसतं…तुम्ही चालत असता…जंगल काही संपत नाही…तुम्ही कुठेतरी मनाशी ठरवलेलं असतं, जंगल संपणार… शेवटी तो तुमचाच भास… पण त्या दोन फांदयाचं वेगळचं चालू असतं… त्याचं गुरफटणं काही नेहमीचं नसतं… त्या सोसाटयाच्या वा-यात त्याचं एकमेकावंर आदळणं अजूनच वेगाने सुरु होतं… तुम्ही एक-दोनदा निरुखून पाहायचा प्रयत्न करता… दर क्षणाला असचं होत असतं… तुम्ही पुन्हा मागे वळून पाहता… खूप दूर आल्याचं कळत… सरळ वाट असल्यामुळे काही वाटत नाही… पण खरचं खूप दूर आलेले असता… पण वारा काही कमी होत नाही…. त्या प्रत्येक फांदीने आपली किमान मर्यादा ओंलाडलेली असतें त्याचं एकमेकांना घासत राहणं आता काहीतरी वाईटाची चाहूल करुन देतं…. तुम्ही मागे वळून पाहता… मागच्या बाजूची झाडं आवाज करत असतात… नव्हे! त्यांनी आता पेट घेतलेला असतो…. जंगलात वणवा सुरु होतो… ते प्रत्येक हिरवं पान आता जळीतकांड बनत जातयं… क्षणार्धात होत्याचं नव्हतं होत असतं…. पान न् पान आता काळभोर बनत चालयं… आग संपूर्ण जंगलाला वेढा घालत चालयं… तुमचं पळणं सुरु होतं….किती पळाल… तुम्ही दोन क्षण थांबून पाहता. आगीच्या डोबांतून काहीशी झाड बाकी आहेत… ती ही एव्हाना त्या वणव्याच्या तडाख्यात कैद होतात…आता तुम्ही थकता…ही आग आता तुम्हाला गिळल्याशिवाय राहणार नाही… परतीच्या सगळ्या वाटा बंद झाल्यात….आणि तुमचा पुढे पळण्याचा रस्तासुदधा… चारी बाजूच्या आगीने आधीच तुमचा जीव कासावीस झालाय… आगीची धग तुम्हालां जाणवायला लागते…. पुढे वाट संपलीय… तळं…!!!!!

             एका तळ्याकाठी येवून थांबता… तुम्ही आणि ती आगसुध्दा….पण तुम्ही वाचणार कसे…तुम्हाला जिवंत राहायचयं… तुम्ही तळ्याच्या सभोवार एकदा नजर मारता…. एक नजर काहीतरी दाखवते पण तुमचा काही विश्वास बसत नाही तुम्ही पुन्हा एकदा खात्री करण्यासाठी रोखून बघता… अक्राळविक्राळ राक्षसी….मगरी… त्यांच्याकडे पाहवसंही वाटतं नाहीयं… नुसत्या सावजाकडे फिरलेल्या त्याच्या त्या आसुसलेल्या नजरा… मातम सुरु झालाय. कहर! यांच्यापेक्षा वेगळा काय असतो?…. त्या मगरींनाही ती धग सहन होत नसते. त्या तळ्याच्या दिशेने येत असतात ख-या…. पण त्यातल्या त्यात एक मगर तुमच्याकडे बघत असते… तिला त्या आगीची पर्वा नसावी बहुतेक…. मनुष्य खाल्ला नसेल इतक्या दिवसातं… तुम्ही अजूनही तळ्याजवळच आहात…. अजूनही पाण्यात उतरत नाही… पाण्यात उतरुन तरी नेमकं काय करणार?… तुम्हाला पोहता कुठं येतयं…. ती मगर इतर मगरीप्रमाणे पाण्यात न जाता तुमची शिकार करु पाहतेय…. तुमच्या मेंदूचा पार भुगा झालाय… विचार नेमका काय करावा काही सुचतं नाहीय…. साला प्रत्यक्ष आयुष्यात पण असेच घाबरगुडें इंथ तरी थोडे धाडसाने वागा… पण नाही… शेवटी ते तुम्हीच असता डरपोक… तुम्ही गर्भगळीत होता… तुमची जिदद, शौर्यं संगळ खोटं असतं… हो तुम्ही घाबरता!… ती मगर अजूनही तळ्याच्या काठावर असते… तुम्ही ही तळ्यापाशीच… आगीचे सगळे लोट आता तळ्याकाठी येवून ठेपलेयतं…. ती मगर तुमच्यावर झेपावणार… पण इतक्यात जवळ्याच्या झाडाची फांदी आगीसकट मगरीवर पडते… आणि दुस-या क्षणाला ती मोठाली मगर तळ्यात गुडूप होते… तुमचे हातपाय लटपटायला लागतात… मरणाची हमखास हमी देणारा प्रंसग….

             एक खोल तळ…. तळ्याभोवताली सगळ्याबाजूने पेटलेला वणवा… तळ्यात जमा झालेल्या मगरी…. आणि पोहता न येताही नाईलाजाने मगरीने भरलेल्या तळ्यात शिरलेले तुम्ही… स्वतःचीच मरणासन्न अवस्था तुम्ही तळ्याच्याच एका बाजूने पाहत असता… नाही ते तुम्ही स्वतः आहात… झोपतले... हिचं संधी आहे तुम्हाला मरणानंतरची अवस्था जाणून घ्यायची… तुम्ही गाढ झोपेत आहात…. श्वासोश्वास जोरजोरात सुरु आहेत… त्या तळ्यातल्या तुमचं काय होणार… तुम्ही पुन्हा कूस बदलता… नकळत पापण्या उघडतात… समोरची खिडकी दिसते… पण डोळे दुस-या क्षणाला मिटतात… पण तुम्हाला कळत… हा भास आहे….हे स्वप्न आहे… पण तुम्ही स्वतःलाच जाणीव होऊ देत नाही…. मन आता आतल्या एका मनाशी खोटं वागत…
आता चित्र स्पष्ट आहे तुम्ही एक स्वप्न बघताय… भीषण स्वप्न… तुम्ही या दोन्ही पातळ्यावर समान अवस्थेत आहात… अशी संधी क्वचितच भेटते…..तुम्हाला जंगलात घोघवणारा वारा आणि खिडकीपलीकडून येणारी थंडगार हवा एकाचवेळी जाणवतेय…असा अनुभव सहजासहजी येत नाही…तुम्ही मनाशी पक्कं केलयं…आज ही अवस्था जाणून घ्यायची म्हणजे घ्यायचीच..

              तुम्ही स्वतःला मगरीच्या स्वाधीन केलयं… आगीच्या लोटांनी आता तळंही नाही सोंडलय… त्यांनी आता तिथंही मुसंडी मारलीय… या अवस्थेत मगरीनीं जरी काही नाही केलं तरी बुडून मरणं तरी खात्रीने असणार… तुम्ही ती अवस्था अनभवु पाहता… आगीने आपला निसर्गनियम आज पाळला नाही ! ! ते आगीचे लोळ पाण्यापेक्षा वरचढ होत चाललेत… अक्षरशः तळ्याच्या चारीबाजूनां आगीने वेढा घातलाय… हिरव्यागार जंगलाचा काळाकोळसा बनून गेलाय.. पण मगरीना पोहता येत होतं.. त्या तळ्याच्या तळाशी जायला लागल्यायत बहुतेक आणि तुम्हाला पोहता येत नाहीय… तुम्ही गटागळ्या खायला लागता.. यस आज तुम्हाला ती अवस्था कळेल त्या तळ्यातल्या बुडण्या-या माणसाचं मन सुदधा तुमचंच आहे…

             इकडे तुमच्या कपाळाभोवती घाम जमा झालायं.. अंगात घातलेला शर्ट ओलाचिंब झालाय… इतकं घामाघूम होऊनसुदधा तुम्ही आज काहीतरी नक्की जगावेगळं अनुभवणार या खुशीची मनाच्या एका कोपराने तयारी करायला सुरवात केलीय… तुमच्या नाकातोडांत पाणी जातं… तुम्ही पाय हालवू पाहता…. तुम्ही पुन्हा-पुन्हा वरती डोकावू पाहता…. ती मगाची मगर आता तुमच्या जवळ येतें…..एक मन म्हणत असतं… ”फक्त येथून निमूटपणे सुटका व्हावी हिचं अपेक्षा”… एक मन खुशीत असतं… “कदाचित मला आता मरणानंतरीची अवस्था कळेल”…

               हया तळ्याकाठी मरणार आहे ते तुमचंच मन आहे… भम्राला, स्वप्नाला शरीरी आकार नसतो…. तुम्ही गुदमरुन लागता… हे सगळं मरणनाटय या खिडकीपाशी येऊन थांबलयं…तुमचा श्वास गुदमरु लागतो… कुणीतरी गदागदा जोरजोरात हलवायला लागतं….तुम्हाला जाग येतें…. ती अवस्था तुटली जाते…. तुम्ही आता पुन्हा एकदा येथे जगायला सुरवात करता…. जो पाट तुम्ही उशी म्हणून घेतलेला होता तो डोक्यावरुन सटकतो…. ती समान अवस्था नाहीशी होते… आणि तुम्ही परत मूळ जगात येता. ”काय घाम जमा झालाय कपाळावर, उठ आता दिवाबत्तीची वेळ झालीय” आई बडबडायला सुरवात करते. तुम्हीची तंद्री निघून जाते, आपण ही झोप दुपार समजून झोपल्यामुळे अजून रात्र बाकी असल्याचा एक मूड तयार होऊनच झोपी जातो खरे, पण नंतर एका झटक्यात आपल्याला जाग येते, तुम्ही थोडे कावरेबावरे होता… आगीचे लोट मनात घर करुन बसतात… तुम्ही चटईवरुन तडक उठता… स्वयंपाकघरातलं गॅस कनेक्शन नीट असल्याची खातरजमा करता…. सर्व काही ठीक असतं… तुम्ही मोरीत येता, तोंडावर पाणी मारता… तुम्ही काय गमवलयं ते तुमचं तुम्हालाच ठाऊक असतं…तिथंल सगळ काही स्पष्ट आठवतं नाही… तुम्हाला तुमच्या स्मरणशक्तीची कीव येतें….साला मागच्या क्षणाच्या निमूटत्या झलका जरी गवसल्या असत्या तरी चाललं असतं….एकदमचं बाहेर पडलो…मागचं सुपडा साफ करत तुमचं नेहमीच जग जगायला तुम्ही मोकळे होता…. भूक, प्रेम, असुया, नाती सगळं काही जाणीव करुन देतं येथे असण्याची पण तरी देखील तिथे काही नक्की असेल… भम्राचं अस्तित्व नक्की असेल… काय झालं ते आठवतं नाय….शे… नाही… यार! झोप गेली… तो भ्रम गेला.. ती नशा गेली… तो झोपेचा अंमल गेला.. तिथूंन सुटका झाली खरी पण तिथंल अस्तित्व ईथे छळत राहत तुम्हाला…तुम्ही नेमकं काय झालं ते आठवू पाहता…. नेमका अर्थ लावू पाहता त्या स्वप्नाचां…. नंतरचे कितीतरी उपवास, त्यानंतरचा नैवदय, ती भरपेट जेवणाची दुपार, त्यानंतर तुम्ही त्या स्वप्नाची…. त्या भ्रमाची… त्या समानअवस्थेची वाट बघत असता… ती दोन्ही ठिकाणी एकाच वेळी जगण्याचा फील पुन्हा अनभवू पाहता…. आभासीपणाच्या भासाचं जाणवणं आता दुरापास्त होवून जातं…. आता ते पुन्हा गवसणं मुश्कील वाटतं…. तुम्ही तरीही न निराश होता अजूनही प्रतिक्षेत असता ते क्षण अनुभवण्यासाठी… जिथे या अभासी जगाची ती आखीव रेष थोडीशी का होईना, साफ होईल…. तुम्ही वाट पाहताय त्या दुपारच्या झोपेची…


------------------

``````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````
-आशिष गुरव .
( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before  publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online  ,must be shared in totality . ) 




Saturday, 29 October 2016

ओटी, गा-हाणा आणि वायफाय

ओटी, गा-हाणा आणि वायफाय

           

            सुनंदा दरवशीप्रमाणं यंदापण देवीची ओटी भरुकं आपल्या दोन झीलांका घेवून माहेराकं ईला हूता. दोन झील…बारको सतरा आणि मोठो एकवीस वरशाचो. तळकोकणातला नारळापोफळीनं गच्च भरलेला गावं, गावाच्या कडेनं जाणारी नदी, तरीपण दोघवे काल संध्याकाळी मामाकडे ईलापासून हिरमुसले हूते. चारीबाजूनं डोंगर असल्याकारणानं मोबाईलचा नेटवरक दर दोन-दोन मिनिटानं येत-जायत व्हता. आता सकाळी ते दोघवे आवशीबरोबर देवळाकडे चाले हूते. एकदाचो इलो सडो! वीस मिनिटाची घाटी चलून घामाघूम झालेले झीलाकां बघून सुनंदा म्हणता “अरे हैतेशे आम्ही दिवसाचो पन्नासएक खैपा घालू…. आज तैची फळा तुमचो मामा खाता… माझी भैहनची बोळवण दरवरशी दोन आबेंच्या पेटायेवर करता हा…” देवळ्यालागी ईल्याबरोबर सुंनदाचो बारको झील नाराजीनं म्हणता ”मामा बोला होता इकडे सडयावर रेजं पकडेल म्हणून”

            “तात्यानू वळखलास की नायं…”सुनंदानं देवळाच्या पाय-याकडे चप्पल काढीत गुरवाक हाक दिलानं. पण दोघा पोरग्याचा लक्ष अजून पण मोबाईलमध्ये “दादा इथं देवळात पण रेजं नाय… नीट… शीट…” गुरवानं सुंनदाक वळखलानं. “आता नजर कमजोर झाली म्हणून आपल्या वाडीतल्या चेडवाक ओळखल्याशिवाय रहवानं काय, महादेव सुताराची लेकना तू, खयंगो दिलेला तुका”” हातातली उरलेली दोन फुलां पिडीसमोर ठेवीत म्हटलानं.

            “वारंगावात” खांदयाक लावलेल्या बॅगेसून ओटी काढीत सुनंदा बोला.  गुरवानं पाट देवीच्या मूरतीसमोर ठेवत बोलो “पावणे नाय येवकं?” “मिस्टराक सुटटी नाय भेटली यंदा कामावरना, तेनी, मग रेल्वेत बसवलानीं, आता काय पोरगे हतं वागडानं… मग काय प्रवासाचां टेशनं नाय” सुनंदानं नारळ आणि ब्लाऊजपीस पाटावर ठेवीत म्हटलानं.

            सुनंदाच्या दोघव्या झीलानी देवळाच्या आत इल्यावर मोबाईल खिश्यात ठेवल्यानी खरे, पन दोघावंचा लक्ष अरध्यामुडदया नेटवरकवरती ‘प्राफाईल पिचर’ अपलोडिगंकडे लागून रहवला हुता. दोघवाचां एकडेतकडें बघत देवळच्या भितींवरच्या देणगीदारात मामाचां नाव शोधूचा चालला हुता. ”मला दिसलं मामाचं नाव एकशे एकावन्न रुपये….” थोरल्यानं बारक्याक म्हटलानं. तकडे देवळाच्या पडवीत थव्यानं बसलेल्या पोराचो खिदडण्याचो आवाज केवढयानतरी येत हुतो. गुरव कशी तयारी करता तें आता दोघवे बघत हुते…गुरव हातानं काम करती जरी असलो तरी तोंड काय बंद नव्हता “फाटफटी सहा वाजोच्या आधीपासून, हल्ली पोराचो घोळको जमान तयार! मुबंईवाल्यानी गावच्यानसाठी म्हणून एक कायतो राऊटर लावून दिल्यापासून बघूकच नको…” राऊटर ऐकल्याबरोबर दोघवे मुबंईवाले पोरगें चाट पडले. आणि दोघवांनी आपल्या खिशातून मोबाईल काढलानीपनं. “मेलो यता तो हय देवळ्च्या पडवीलागी येवून बसता, राडेच्याका देवीक वाकून नमस्कार घालूचा म्हणशाल तर शपथ…चार फूला काढून आनूक सांगितली तर नाय म्हणती…या बावडेचा पानी उन्हाळ्यात रहवता हा….त्या साखरकराच्या नळाकडना आणूचा लागता…सगळे येवून आपलो मोबाईल घेवून नुसते चकाळतत नुसते…आपला पाचट हसना…ता पन देवीसामनी…या जा काय चाला हा ता काय बरा दिसत नाय… त्या मुबंईवाल्याक लय गावचो कळवळो म्हणन या कवतीक दिलानी बसवून देवळात…” साठी गाठलेलो तात्या गुरव उघडया अंगान सगळी तयारी करीत बडबडत हुतो.

            “स्वयंभू पाषाणी पावणाईदेवीचा मंदिर हा कायतरी अपशकूनी घडात तेव्हा कळात” सुनंदा आपलो पदर सावरीत बोलला. गुरवानं देवीसमोर नारळ ठेवलानं खरो पण तेचो लक्ष सतत अकडे-तकडे काय चालला हा तेच्याकंडेच होता …आता कुणाक तरी बघितलानं. सुनंदाक तेच्याकडे बोट करीत दिखवून म्हणता….“तो तो बघ तो जाबुरकराच्या नानाचो धाकटो…बघ अवतार बघ…जीनच्यो पॅन्टी घालणार काय…फटफटी घेवून शायनींग काय…अरे मुंबईवाले पण अशो फॅशनीन रवत नाय…या मायझव्या कामा काय असततं…मुबंईक जाऊन दोन-चार पैशे कमवाचा धाडस नाय, बसतत हय येवून टावळको करत…”

            गुरवानं सुनंदान आणलेलो अगरबत्तीक पेटवूक माचीसची काडी काढलानं. “तू खय रहवतसं मुबंईक” तात्या गुरव बोलतं हुतो. इकडे या गुरवाचं बोलणा ऐकल्यापासून सुनंदाचे दोघव्या झीलाका ख-या अर्थोनं देवी पावल्यासारखा वाटत हुता. मामाकडें ईल्यापासून काय तरी चुकचुकल्यासारखं वाटत हुता, “वायफाय आहे इथं…तो ही फुल रेंज अरे वा… पण….लॉक आहे” धाकटयानं थोरल्याकं मोबाईल दाखवत म्हटलानं. तिथं बसलेल्या घोळक्याकं पासवरड ईचारूची थोरल्याची हिमंत व्हतं नव्हती पण वायफाय वापरुकं आतून जीव कासावीस झालो हुतो …. दोघावकं मागच्या दोन दिवसापासूनचे मॅसेज चेक करुचे हुते, स्टेटस अपडेट करुचे हुते, प्रॉफिल पिचंरा चेजं करुची हूती, अकडे बारक्यानं थयचं पडवीत बसलेल्या एकाकं “पासवरड काय” विचारुनं नेट चालू पण केलानं…

            “सांग, मला पासवरड काय आहे तो” थोरल्यानं मग आता धाकटयाकं विचारालानं. धाकटा हसत हसत म्हणाला “पावणाईदेवी”

            “होत का नाहीयं…” थोरला रागानं म्हटलानं.

            “पी कॅपिटल…टाकं…” धाकटा पुन्हा हसत हसत बोला…. आता दोघावें जाम खूश दिसत हुते…दोघवानीं देवीच्या मूर्ती बघितलनी…मोबाईल खिश्यात ठेवून…. दोन्ही हातानी नमस्कार केलानी…आता तेका देवीच्या मूर्तीतं तेज दिसत हुता…

            सुनंदा बोलत हुती “मी आता बदलापूरका रहवतयं….पहली रहवत हूतावं लालबागका पेरुच्या चाळीत पण जशजशी सगळ्या दीराची लग्ना झाली तशी रहवक जागा कमी होवक लागली …आमच्या मिस्टरचा कुटूंब काय न्हानं हा….मग काय…चौघाच्या मालकीची ती रुम विकालानी… वाटणी करुन टाकली नी आमच्या हिस्साचो म आम्ही बदलापूरका फॅल्ट घातलो”. तात्या गुरवाच्यां डोळ्यासमोरुन झराझरा मुबंई समोर येवकं लागली. तेंनीं असुयेचो आवढों गिळत म्हटलानं “…आजून म्हणून तकडे काळाचौकीक काय दहा बाय दहाचो रुमचे भाव काय कमी हत…करोडोचो भाव चाललो हा म्हणततं……त काय? आपला मुबंईक स्वत:चा घर तरी झाला नाय गो”.

            “तुमचे झील खय असततं” सुनंदाक एकदा काय माहेरचा माणूस भेटला की मग विचारता सोय नायं…. बोलणं काही थाबंत नव्हतं….देवीक ओटीभरुक आणलेलं तांदूळ सूपात ठेवूचा चाललां हूता…तिचें दोघवे झील आता त्या पडवीच्या भितींजवळ बसलेल्या बाकीच्या टोळक्यात जाऊन मिसळलेपण….तात्यागुरव खूजो अभिमान आणित बोलत हुतो “माझे दोनी झील मुबंईकच असतत विरार का….आमच्या जावयाचो बिल्डींगमध्ये रुम असा…आमचे दोघवे जेवक चेडवाकडेच असतं …रहवोक अशी बैठया चाळीतच रुम घेतालानी… भाडयानं हा… त काय आपला खानावळी आणि आपला कपडालत्ताचा भैहन हा म्हणून चालून जाता…नायतर परत यांच्या आवशीक पाठवूचा लागला असता…. समजूदे तेकां पन बापसान काय दिवस काढलान हुते…ते…आता पासून व्हवहार कळोक लागलो त उदया बायका इलो को परपजं चालवूक मोकळे..त काय…“ तात्या गुरवाचो गळो जरासो का होईना कापरो झालो हुतो…डोळे थोडेशे पाणावल्यासारखे झाले हुते…मिल सुटल्यावर थयचं खयतरी झोपडा बांधून रहवलं असतयं तर आज पोरा का असा मुबंईक भाडयानं रहवचा लागला नसता…मोठो झील म्हणत व्हतो….बाबानो कलमा विकून विरार का रुम घेवून देवा…म्हटला आता तूका घेवून दिलय तर परत बारको झील पण हा…. उदया तो पण मागतलो… आणि रेवती हाच, माझा चेडू… आता परक्या घरचा आपण म्हणू गो… कायदयानं पोरीक तेवढोचं हिस्सो देवचो लागता…चेडू आपला… जावई आपलो नाय…आणि फटकीखावून ईली कलमा पन नाय ना तीन-चार वरश्या झाली…सगळो आंबो कलटावर यंदापण…एक फळ चांगला नाय….काय पेटयो पाठवणार दलालाका…त्यात आणखी पावस…सगळो मोहर गेलो ना वाया…. आणि शेती काय माझ्यानं काय आता व्हतायं एकटानं…आमच्या हिचा आयुष्य गेला चुलीजवळ आता काय होणार हा….तिच्यानं… सगळी बरगडयो गेलो कामातून… तेव्हा अख्खो सडो चलणारी बाई आता दोन पावला चली तरी श्वास कोंडता…तरी बरा आता गावात तो सिलिडंर येवक लागलो… आमची शेती… ती तशीच मागची दोन वरशा पडोन असता …..तेच्या अगोदर परयत तो रघ्याचो झीलगो व्हतो तवसर दोघा भुतू वारगुळ्यात करीत हुतावं… तो रघ्याचो नितो… तकडे बाहेरगावी गेलो ना कोईटला-दुबईक… गेलो त्या रफीकाबरोबर…आता काय बापसाक दर महिनाकं पाच हजार पाठवता…तो तरी कशाक म्हणून शेती करीत वारगुळ्यात.. म्हटलं माज्याकडनं त काय व्हवहाचा नायं एवढा खंडीभर भात लावूकं, लावणी करुकं, दाढ काढूकं, यंदा पंचायतच्या मिटींगीत ठरला हुता…त्या बापूमास्तराची सून संरपच हा ना काय बरा तीचा नाव…” तात्या ओटी भरुचा सामान जवळ करीत हूतो.

            सुनंदानं अवाक होऊन म्हटलानं “बापूमास्तराची सून!”

            एक घटका थांबत तात्या गुरव पाटावर ठेवलेले दोन्ही हात कपाळावर ठेवीत डोळे बंद करीत नाव आठवूक बघित हुतो….पुटपुटत हुतो “नाव असा तोडावर हा बघ… शेम नाव…बघं संध्याकाळच्या सिरयलीमधला नटीचा नाव हा गो…शिरापडली तोंडावर…काय बरा….हा… कल्याणी!… कल्याणी म्हणतं व्हती यंदा वाडीवाडीचे गट करुन सगळ्यानीं ट्रक्टर लावयचो सगळ्या वावळीत….त्या रांडेच्या त्या आमच्या विठोबा गुरवाचा त्योडं सकाळी उठून बघू नये…खयं ख्वाड घालूचा ता येचो पहलो नंबर…वरगनीक तयार पन झाले सगळे वाडीतले….पन हयं राडचों तालूक्याकं कधी गेलो नसात…म्हणता या सगळा घाटावरचा हयं चालूचा नाय… राडचें जळततं एकमेकावरं… यो हुदूदू…गोधळं….एकमेकाकं मारुक काय उठले नी काय… काय ना वरसून आदेश येततं याच्यां साहेबाचे…. आमदारा-खासदाराचे… अनी हे तशे वागततं……बिनपैशाचो तमाशो…ती बापूमास्तराची सून.. संरपच हा नावाक…सगळा काय यो आमचो विठो गुरव बोलणार नी ती कल्याणी ऐकणार…म्हटलां बघितला असता ट्रक्टरनी शेती करुन…आता यंदा काय व्हना नाय…वाटतं… तिघां पोराकां सागूंन ठेवलयं… माझी लाकडा एकदा मसणात गेली की मग काय तो हिस्सो करुन घ्येवा…तवसंर माझ्या जीवान कायं व्हवचा नाय”

            सुनंदान दोन्ही पोराकां खूणेनं बोलावानं. मोबाईल खिश्यात ठेवून दोघवें हात जोडून उभे रहवले. देवीपुढे पेढाचों पुडो सुनंदेनं ठेवीत तात्याक बोली ”तात्यातून गा-हाणा घाला यंदा पोरगो ग्रजुअशनच्या शेवटच्या वरसा असा…यंदा पास होवून चांगल्या कंपनीत लागलो तर पुढच्या वरशी पाच नारळाचा तोराण देईन देवीक…” माहेरवशीननं बोलायची खोटी की अकडे तात्या गुरवानं “हे देवी पावणाई…ही माहेरवशीन सुनंदा तुझी न चुकता दरवरशी परमान यंदापन वटी भरुक इली हा….ती पावणं करुन घे… तिच्या मालकाक, मुलाबाळाक सुखात ठेव…..तिचो पोरगो यंदा” गुरवाचां थांबलेला गा-हाणा बघून थोरलो बोलो “शेवटच्या वर्षाला”, “शेवटच्या वरश्याक बसलो असा… तैका चांगल्या मारकानं पास कर… आणि पुढच्या वरशी चांगल्या कंपनीत रहवलो की ही माहीरवशीण तुका पाच नारळ्याचा तोराण घालीत“

            …गाभा-यात नारळ फुटलो…खोबरयाचें बारीक तुकडे करताना पडवीजवळ बसलेल्याचां खिदडना तात्याच्यांक काय रुचतं नव्हता. तात्या गुरव बोलत सुटलो “राडंच्यानो मुबंईक नाय रहोक जमत तर गावक रहोन कलमा शिपा ता पन नाय…चिखलात हात घालूक लाज वाटता…मोठे झाटलीमन हे… आता यो बबन्या गुरवाचो लेक अगो दारु म्हणो नको… सिगरेट म्हणनू नको…अरे जातीचे गुरव नारे…कसो तुमका देव पावात…आपल्या कुळात कोंबडो बकरो खाउ का नाय…तरी तकडे तालुक्याक जाऊन चायनीज कायता हासडततयं… अरे देव बघता…मागे आवस खुळावली हुती…बापूस पन अडमिट हुतो सायन हॉस्पीटलात मुंबईक…यास हा कुटंबाक…अख्खा घरदार भोगता मग…”
“पहिली काय भरभराट हुती नाय तात्यानूं..” सुनंदा आजूबाजूक बघीत हलक्या आवाजात बोलला.
गुरवही मग आवाज ब-यापैकी खाली नेत बोलत हुतो “अगो काय तरी हुता गुतांड करुन ठेवल्यानी……वस्तू हुती घरात…देवदेवस्की काय कमी हा…आता नाबूत झाली खयं वस्तू…मरु देत करीत ता निस्तारीत… कोण कसो वागतां तां…देवी पावणाई बघता हा…”

            “…तर आता काय रवला नाय पयल्यासारखा तात्यानू…आमच्या सासरी सगळे भट आता मच्छी-मटाण खाततं…तकडे मुबंई तर सगळा आपला चालता” सुनंदानं नाराज होवून म्हणत हुता. खोंब-यांचे तुकडे गुरवानं सुनंदाच्या हातावरं ठेवीत बोलो “नाय पन गावाकं शंभू भटांन तरी टिकवलान हा…. तेचो एक झिल पुण्याक असता…विधी वैगरा शिकता हा…आता बापसानंतर तोच चालवितसा वाटता”

            सुनंदान खोब-यांचो तुकडो देवीक नमस्कार करीत तोडांत घातलानं “आणि त्यांचा चेडूचा…झाला काय लगीन…?” सुनंदाक सगळां लफडा माहित असून पण मुददाम कुचाटन्या काढूचा म्हणून विषय काढलानं…गुरवाक पन असले विषय चगळीत बसूची सवय….आजूबाजूक नजर फिरवीत कोण बघीत नायना येच्याकडे बारीक लक्ष देत सुनदांक सागोक लागलो “जायत हुता तेलयाबरोबर पळून…आवझारी आवस-बापूस दोघवा बारामाशी… चेडू खय जातां येता तेच्यावर लकक्ष नको…वाडीतले बाकीचे प्योर बघितचं व्हतें कोण करता काय…हंत आजून दोघं-तिघं अशी लफडयावालीं…गावातं रहोन हेच धंदे सुचततं…म्हणून आमच्या दोघवाकं मुबंईक पिटाळलें…म्हटलं हयं रवले तर…चिरे फोडाता फोडता… संगतीनं खयचे तरी नुकोतो वासे मांडवाक लावचा बघती…” पण सुनंदाची दोंघंव झील मागसंपासून पडवीजवळ…. मोबाईलवरुसून देवीचे फोटो अपलोड करण्यात दंग झाले हुते…

            “देवाच्या गाभा-यात पण शांती ठेवलानी नाय फटकेक नायती कुळकशा होउदेत रांडच्याचो…ते बघं अजून दोघेजण इले मायझवे….देवापुढे विडे पन ठेवचो माग रहवलो नाय आता
अक्करमाशानो….दुपारतिपराचा झोप म्हणून पण नाय… तो बाबा मेरोपकर येवदे यंदा गावच्या मिटीगं नाय ते का झाडून टाकतय की नाय ता बघ…राडच्यानू तुमच्या त्या बंद घरापुढ लावा तो वायफाय कायतो..हयं देवळालागी नको…मोठे मुंबईवाले ना मायझवे..” तात्या गुरवानं पाच पेढे आणि अरधी नारळाची वाटी सुंनदाक देत बाकीचो सगळो मेवो आपल्या खुटयेक टांगलेल्या पिशवीत टाकीत बोलत हुतो. सुनंदाची एक नजर गुरवाच्या पिशवीतल्या पेढयाकडे कितीवेळ टिकून हुती…

            “अरे त्या ईलास दुसनकराची आऊस लयं सिरीयस हा…..! काय जगातशी वाटत नाय म्हातारी... ! पुढच्या क्षणाक डोळें मिटातशी वाटता” पक्यानं व्हाटसअपवर इलेलो मॅसेज सुधीराक दाखवित म्हटलानं. सुनंदा आणि तिचे दोघवे झील चप्पल घालूक लागले, गुरव आता थयसर येवून सुनंदेक बोलता “या बघ……मुबंई कुणाचा काय झाला ता सगळा वाडीभर अगदी दुस-या मिनीटाक कळतां आणि गावाकं जरा काय साटंसुट झाली रे झाली की मुबंईक बातमी वा-यासारखी पसरता….”

            “चला तात्यानू चलतयं….आज संध्याकाळी जावचा नाधीवडयात सासरका” सुनंदा गुरवाच्या पाया पडीत म्हटलानं….दोघवे झील आता खूश हुते…सगळा तेच्या मनासारखां झाल्यासारखा दिसत हुता…मोबाईल पॅन्टच्या खिश्यात ठेवत तेनी मग गुरवाच्या पायाक हात लावलानी… “बाबोनो म्हातारे-शितारे व्हावा….हेतेशेच येतं रहावा मामाकडे…मामाकं पोरगी नसली म्हणून काय झाला…”तात्या गुरवान दोघवाच्या डोकावरना हात फिरवलानं…सुनंदा आणि पोरा निघाली. आता मघाच्या पक्याच्या बोलण्याकडे तात्याचों लक्ष हुतोच…गुरवच तो आता ऐकलान हा तर गप्प कसो रवतालो ”…जास्त सीरीयस हा की? मोठया झीलाकडे राहवं गेली होती ना? फटखी खाव दें आता खयं म्हातारीचे खावचे दिवसं सुरु झालेनी…या असा…” गुरवानं खोबराचे तुकडे पडवीत बसलेल्या बाकीच्याक वाटूकं लागलो… तात्या गुरवानं असा म्हणोक की सुधीरानं व्हाटसअपवर इलेलो म्हातारेचे सलाईना लावलेलो फोटो गुरवाक दाखवलनं, ”तो आमचो थोरल्या काकाचों अजितनी गेले हुते बघुगं सायनका.. यो फोटो काडलानी तेव्हा” “बाकी कुकूं आजून तसाच्या तसा हानारे” गुरवानं मोबाईलच्या स्क्रीनवरच्या फोटोकडे बघतं म्हटलानं. “राडच्यानं आमच्या अजितानं सोळा मेगापिकसलवालो मोबाईल घितलान हा …कुकं भडक दिसात नाय तर काय? म्हातारेन उदयाचो दिवस तरी काढूक हवो नायतर उदया परशुरामाच्या घरीचो बारसो बारगळलो म्हणून समजा…हा तेका आणखी आता धाकधूक म्हातारेच्या तब्यतेचो…” सुधीर काळजीनं म्हणतं हुतो. “सगळा आणून ठेवलान हा वेपर, फरसान, झीलगाच नाव कोरुक थरमकाल, हा आपलो रातरी बसूचो पण बेत ठरलोलो हा पण या म्हातारेवर हा….!” पक्यानं आपल्या जवळची खबर सांगत म्हटलानं. तेवढयात निलेशानं म्हटलानं “पन वाडीत सांगोचाच नायाना…बारसो व्हयंसर… पयली आदी पावशेर घशाच्या खाली उतरु दे मग काय तो गावभर डको पीटा…तं काय….मुकेशाक आणि बाकी पोराका तसा सांगोन ठेव”  

            आता सुनंदा जाऊन सुतारवाडीतला अजूऩ एक नवीन जोडपा देवीच्या दरशानक ईला हुता. गुरव आता त्येंका सांगत हुतो “या बघ या असा चालेला सगळा आमच्या टाईमाक माणूस मरुन चार दिवस झाल्यावर मुबंईत पत्र यायचा नि आता थय माणूस हार्ट अटैक येवच्या अगोदर हय बारावाचा जेवान बनवूक लागले पण…”

                              ------------------

``````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````
-आशिष गुरव .
********************** कथा आवडल्यास अभिप्राय (कॉमेंट मारा) नक्की कळवा ***************
( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before  publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online  ,must be shared in totality . ) 

Saturday, 15 October 2016

ख़रीदारी


ख़रीदारी

रेल्वेस्टेशनके प्लॅटफॉर्म नंबर छे के उपर के पब्लिक पूलकें आखिरी कोनेमें पार्वती और उसका पती किशन  हाथभरसी जगह में सामान बेचने के लिए बैठे थे। 

सामान में ज्यादा कुछ नही… वही मोबाईल के प्लॅस्टिक कव्हर, ताला और चावी, बच्चों का मन बहलानेवाले खिलौने, रंगीबेरगी लाईटवाले लॅम्प, फोन नंबर लिखने के लिए ईस्तमाल होनेवाली डायरी, गॅस लायटर…. पर आज ज्यादा कुछ बेच नही पाऐं थे…. उसी कारण दोनो कुछ खफा-खफासे दिख रहे थे। 

”सुबहसे एकभीं खिलौना बेच नही पाऐं….मैने आपसे कहा था खिलौने आजकल कोई नही खरीदतां….आजकल के सब बच्चे मोबाईल के उपर गेम खिलने में लगे रहते हे…” पार्वती नाराज होकर कहने लगी।

“अरे अभी तो रात के साडेसात ही बजे होगे…अभी देख… सात चालीस की फास्ट लोकल आऐगी ना तो ज्यादा भीड होगी, कोई ना कोई तो जरुर कुछ ना कुछ खरीद लेगां….” 

इतने में फास्ट लोकल प्लॅटफॉर्म नंबर छे पर आने की अनाऊस्टमेंट हो गई….”आप तो सुबहसे यही कह रहे है…. ताला-चाली कोई खिरीदता ही नही….” 

पार्वती सामने रखे सामान को हाथसें एकबार गिनने में जूट गई “अब गिनो मत” किशनने अपने तरफ आऐं पार्वती के हाथको, अपने हाथोसें रोकते हुऐ कहा “ट्रेन आ गई” नीचे की तरफ जैसे ही ट्रेन आ गई वैसेही लोगोंकी उपर की और सीडीयों की तरफ भागने की आवाजे दोनो को सुनाई दे रही थी……लोगो की चहलपहल को वो महसूस कर रहे थे। 

किसनने एक बार हलकांसा अपना गला साफ किया….और जोरसे चिल्लाने लगा ”मोबाईल कव्हर ले लो मोबाईल कव्हर…! !घर की सुरक्षा ताला चाबी…छोटे बच्चे के लिए खिलौना ले लो ! !” 

किसन की उम्मीद थी…दो-तीन बार चिल्लाने पर कोई ना कोई तो जरुर खरीदने के लिए रुकेंगा…. पर नही….किसीने भीं नही पूछां….भीड की आवाज कम हो गई और उसी कारन किसन काफी निराश हो गया….”लगता है बारिश का मौसम खत्म होने आ गया है ना….. ईसलिऐ कोई मोबाईल कव्हर ले नही रहा है” किसन पार्वतीसे अपनी निराशा को हंसी में बदलने की कोशिश करते हुऐ कह रहा था। 

पर पार्वतीने बात को पकड लिया “कौनसी कौनसी चीजों के लिए कौनसे कौनसे नये बहाने बनावोंऐगें आप….वो दस रुपये वाली बॅटरी बेचने के लिए रखनी चाहिए थी, सरला कह रही थी आजकल बहोत चलती है…वो लाईट अच्छी देती है और सस्ती होने के कारण बहोत लोग लेते है….” 

किसनने बेचने के लिए रखें सामान के उपरसे हाथ घुमाकर गिनते वक्त कहा “उसे कैसे पता दस रुपयेवाली बॅटरी अच्छी लाईट देते है या नही, आखिर वो भीं तो अपने जैसे है ना, पर सरला तो लॉटरी की टिकीट भेजती थी ना….” पार्वती थोडीसी गुस्सा होकर कहने लगी “सरला नही उसका पती किशोर लॉटरी की तिकीट बेचता है ओ… हो ….आप को कुछ भी याद नही रहता आज कल” किसनने मुस्कराकर कहा “क्या करे अब बूढे होने लगे है हम”। 

“बुढे और आप….काला चष्मा डालके रस्ते पर ज्यादा घुमना मत… लोग फिल्मवाला हिरो समज लेंगे” पार्वतीके बात खत्म हुई नही थी की दोनों पती-पत्नी जोरजोरसे मुस्कराने लगे। 

इतने में फिरसे प्लॅटफॉर्मपरसे और एक ट्रेन निकल गई…..ट्रेन की आवाज के साथ ही दोनो की हंसी भी कही गायब हो गई…. पार्वती आवाज सुनते हुऐं बोली ”लगता है फास्ट ट्रेन है” हा..ट्रेन आ गई…भीड की आवाज के साथ ईस बार पार्वती जोरजोरसे चिल्लाने लगी ”अरे लायटर ले लो लायटर….प्लॅस्टिक का फोल्डर ले लो..फोल्डर…” पार्वती की उम्मीद पर फिरसे एक बार पानी फिर गया था। 

चिल्लाते रहने के कारण उसका गला पूरी तरह सुक गया था। ”आज सिर्फं चालीस रुपयें का सामान बेचा गया है…..उपरसे यहां बैठने का हप्ता तीनसौ रुपयां महिने का अलग… मुझे नही लगता हम दोनो ये सामान बेच पाऐंगें…इसमें हमारा महिने का गुजारा होना मुश्कील लग रहा है” “अरे शुरुशुरु में ऐसे होता है….” किसन बीवी को समझाने की कोशीश कर रहा था। पर पार्वती तुरंन्त बोल पडी “आज पूरे दस दिन हो चुके है अब तो पता चल चुका है ना, चलो फिरसे ट्रेन के अंदर…. गा….” “ट्रेन के अंदर गाना नही गाना है अब हमें…कितने दिन तक हम वही करते रहेगें” किसन पार्वती की बात को बीचमें ही रोकते हुऐ बोला। “पर यहांसे तो अच्छा ही कमा रहे थे हम” पार्वतीभीं कहा रुकनेवाली थी। “कमा रहे थे! भिखं मागते थे हम…”किसन का आवाज बड चुका था उसके चेहरे पें गुस्सा साफ दिखाई दे रहा था। अब पार्वती के आखोंसे आसूं आ रहे थे “कमसे कम उस भिख में पेट तो भर पाते थे, यहां इज्जतसे कमाने से सिर्फं मरने के लिए आसानी हो जाऐगी और कुछ नही” अब किसन को पार्वतीके आवाजसे पता चला की वो रो रही है उसने उसका हाथ धुंडते हुऐ कहा। 

“थोडासा धीरज रखो…भगवान के घर देर है अंधेर नही” आसूकों पोछते हुऐ पार्वती बोली “अंधेर तो है पर भगवान नही”। इतने में बारिश की बूंदे एकदमसी बरसने लगी, सही में काफी जोर की हवा आने लगी थी, अब उपरकी छतकी बारिश की वजहसे होने वाली आवाजोंसे ठीकसे ट्रेन की अंनाऊसमेंट सुनाई नही दे रही थी..

शायद ट्रेन आ चुकी थी….अब भीड आ रही थी..पर कोई भाग नही रहा था….आज मौसम अचानकसे बदल गया था….कई लोगो के पास छाता नही था….वो प्लॅटफॉर्म की उपरी पूल पर ही रुकते थे…और कोई चारा ही नही था….अब हर दुसरी नजर उस सामान पर पड रह थी…एक बच्चा अब अपने माँसे जिदद कर रहा था…

“हां हां वही चायनीज खिलौने…ये कितने का है घोडा है” औरत की आवाज पार्वती के कानो पर पडी।

आवाज को सुनते ही पार्वतीने कहा “तीस का एक….है घोडा”

”पच्चास का दो दे दो!” खिलौने की किमंत को लेकर बहस चल रही थी।

किसन बीचमें बोल “नही….परवडता है….फिक्स रेट है”।

पर वो खिलौना खरीदने वाली औरत बच्चे को चूप करते हुऐं किसनसे खिलौनेकी किमंत को लेकर तोलमोल की बात चल रही थी “अरे दे दो…बारिश की वजहसे रुके, नही तो….”
पार्वती बीचमें बोल पडी “ठीक है ले लो पच्चास का दो…अरे बच्चा बहोत ही रो रहा है लगता है”।

किसनके हाथमें उस औरतने पच्चास का नोट रख दिया। 

औरतने बच्चे के हाथमें खिलौना थमातें हुऐ मोबाईल पें आऐ कॉल को उठाते हुऐं कहने लगी  “अरे आ रही हूं बाबा, स्टेशनपें हू बारिश… आ गई…. अचानक, और ये चिटूं खिलौने की जिदद पकड रहा था…खरीदनेवाली नही थी……जिदद करने लगा…और वो बेचनेवाले भीं अंधे थे इसलिए….दया आ गई….वरना”

मोबाईल पर चल रही बातें सुन रहे किसन को अपने अंदर चल रही घुटन को दबा रहा था…..और पार्वती रोना बंद कर खिलखिलानेवाले बच्चे की हंसी सुनने में दंग हो गई थी।

                                 ---------------

Thursday, 4 August 2016

परीक्षा, पेपर आणि समुद्र!

                परीक्षा, पेपर आणि समुद्र!


       सकाळी साडेचार वाजता उठायचं! का तर…? सकाळी एकदम टाईमावर सात वाजता परीक्षाक्रेंदावर हजर व्हायचं… कशाला? साडेनऊ वाजताच्या पेपरसाठी…पेपर किती?…तीन…पहिले दोन पेपर झाले की साडेबाराला सुटका आणि….पुन्हा तिसरा आणि शेवटचा पेपर होणार दोन वाजता.... तो अडीच तासाचां…म्हणजे एका दिवसात तीन पेपर देवून मुक्तता होणार ती सांयकाळी साडेचार वाजता…परीक्षेला मित्र म्हणावा सोबतीला तर कोणी नाही…मग चला एकटेच… काही मोठाली उत्तरे लिहायची नाहीत की परिच्छेदांनी रकाने भरायचे नाहीत…काही नाही…निव्वळ प्रश्न त्याचें चार पर्याय…काही जास्त हाताला ताण न देता पेपर सोडवायचा…हे झालं वेळापत्रक…आणि ही काही लिपीकपदासाठीची सरकारी खात्यातील, बॅकेची किंवा रेल्वेची परीक्षा नव्हे…अभ्यास होता पण परीक्षेला नेमकं काय येईल यांचा काही नेम नाही…मागच्या प्रश्नपत्रिकाचा काही आधार नाही…मी इतके दिवस निव्वळ घोकंपटटी चालू ठेवली होती…दिमागाचा पार भुग्गा होतो अशावेळी आणि कधी एकदा परीक्षेत सगळं काही ओकून डोकं मोकळं करतों असं होतं… 
      शेवटी हॉलतिकीट आलं एकदाचं…बघू सेंटर कुठे…किमान त्यामुळे तरी अभ्यास करण्यास उत्साह येईल…उगाचचं…आपलं, मनास उभारी…वैगेरे…बघितलं हॉलतिकीट… वर्सोवा! ! !…जुहू-वर्सोवा लिकं रोडजवळचं कॉलेज…एकदा वाटलं परीक्षाकेंद्र जाऊन बघावं परीक्षेअगोदर उगाच परीक्षेदिवशी धादंल नको…यापूर्वीं तिकडें कधी जाणं झालं नव्हतं…पण मग मोबाईलकडे बघत आळस केला…म्हटलं “जाऊ देत…” गुगल मॅपवर बघू…जाऊ शोधत-शोधत… वर्सोवाला मेट्रोने जायचं अगोदरचं निश्चित केलं. शेवटी या परीक्षेच्या आदल्या रात्री अकरा वाजता झोपून एकदम अर्लामच्या साडेचारच्या ठोक्याला उठून सगळी तयारी करत पाच वाजता घरातून निघालो…वातावरण पाऊसाचं होतं खरं पण छत्री खांदयाला अडकवलेल्या बॅगतच होती…सहाच्या सुमारास घाटकोपर मेट्रो…. सकाळी सकाळी मेट्रो ब-यांपैकी मोकळी पण मुबंईपण जपण्याइतपत माणंस होती…या मेट्रोच्या प्रवासाचा फायदा हा की प्रवास अल्हादायक आणि सुखकर असतो. आणि लोकलच्या प्रवासाची सवय झालेल्या माझ्यासारख्या मुंबईकराला हा प्रवास लक्षातच राहत नाही. नाही म्हणायला, असल्फाच्या आसपासच्या टेकडीपरिसरात वसलेल्या दुर्तफा झोपडपटटीतून मार्ग काढणा-या उन्नत मेट्रों कोणताही आवाज न करत गारेगार प्रवासाची अनुभूत देत काही अंशी आपल्याला पंख फुटल्याचा भास करुन देतें….गरीबी-श्रीमंती किती कोनात आणि किती अंशात मुबंईच्या या उपनगरातून वसलीय यांची झलक बघायची असेल तर मेट्रोचा प्रवास निश्चीत करावा. आडव्या जाणा-या रस्त्यांना उभं चिरत जाणारी मेट्रो, थोडाफार इंडस्ट्रियल एरिया, मोठमोठाली हॉटेल, एअरपोर्टचं किचिंतस होणार दर्शन, वेस्टन एक्सप्रेस हायवे आणि पुन्हा थराथरानीं एकमेंकावर कुरघोडी करणारी झोपडपटटी, त्याच्यां छप्परावर कोबंडयाच्या तु-यासारखी दिसणारे डिश एन्टीना, मंदीर-मशीदीचं होणार ओझरतं दर्शन. लोकलने म्हणालं तर तिथंही असं दिसणं होतं, पण ते जमीनीवरुन, इमारतीच्या वरच्या मजल्यापाशी डोकावता येत नाही. अर्थांत थोडं तिकीट महागं वाटतं पण रस्त्यावरच्या खडडयाकडे नजर गेल्यावर यांची किमंत कळते. 
      चला शेवटचा स्टॉप आलं एकदाचं.... वर्सोवा!. परीक्षाकेद्रं शोधत गाठायला गुगलमॅपची मदत घेत बराच वेळ गेला. पोहचलो एकदाचा सातच्या अगोदर. सहा-सात मजली, काचेचं बाह्यआवरण असलेलं महाविदयालय…कॉलेजचा गेट पार केला की आतमध्ये लगेचच बरी ऐसपैस मोकळी जागा होती…कॉलेजच्या आवारात शंभरऐक मांणस बसतील इतकी गादी निघालेली एकाच लाईनीत बसता येईल अशी लोखंडी आसनव्यवस्था. पेपर साडेनऊचा…खूप सारेजण आपला खोलीनंबर समोरच्या फलकावर बघण्यात व्यस्त होती… गेटवर सिक्युरिटी गार्ड असून नसल्यासारखेचं होते…सहाशे मुलं परीक्षेला येणारं मग कुठे आणि कसलं नियंत्रण…आणि हॉलतिकीट दाखवलं की गेटच्या आतमध्ये प्रवेश. तोही ब-यापैकी वैतागला होता पहिल्या अर्धांतासातच…. काहीजणं, दुपारीचं बाहेर पडायला भेटणार म्हणून त्या कॉलेजच्या कॅटीनपाशी मिसळ, डोसा, मेदूंवडा आणि चायच्या आर्डंर देत हादडत होती…. काहीजण एक निवांत कोपरा पकडून आपल्या सोबत आणलेल्या पुस्तकात डोकावून बसलेले…काही जण अजूनही सोशलनेट्वर्किंगच्या जगात एकटेच हसत-खिदडत बसलेले…काही मोबाईलशी चाळा करत बसलेले….कोणी या आवरात कुठेतरी निवांत कोपरा शोधत उभा असलेलं…काही घोळक्याने परीक्षा दयाला आलेले…या परीक्षेसाठी मार्काची पात्रता मिळवली की मग किती ही वेळा फेल व्हा काही हरकत नाही…वयाचंसुद्धा बंधन नाही....बहुतेक हा घोळका तोच असावा... माझी ही परीक्षा देण्याची पहिलीच वेळ आहे! काय माहित मी ही या घोळक्याचा भविष्यात भाग झालो तर…. एक-एक करत गर्दी वाढत होती…. काही सुजाण पालक आपल्या मुंलाच्या भविष्याची काळजी वाहवून आली होती. बावीस-तेवीस पार केलेल्या आमच्या सारख्यांना अजूनही आई-वडील परीक्षाकेद्रांवर का लागतात…? मला सकाळी सकाळी प्रश्न पडत होते खरे…काही पालक होऊन सुदधा परीक्षा दयायला आलेले…..पण अभ्यासाची म्हणून जी काही पुस्तक आणली होती ती न काढता मी टगळमगळ करत इकडे तिकडे बघण्यात वेळ घालवत होतो. बाजूला रंगत असलेले किस्से ऐकत होतो…बहुतेक आर्टसची असणार…साहित्यकाची साहित्य लक्षात ठेवण्याची अंताक्षरी चालली होती. साधारण आत वर्गात प्रवेश साडेआठच्या सुमारास मिळणार होता. हॉलतिकीटवरच्या एका सूचनेने या चालू असलेल्या गोधंळाला शांतता प्राप्त करुन दिली. सूचना 'वरुन' आली होती, शिक्षण मंडळाकडून, कोणालाही बॅग आतमध्ये नेता येणार नाही! ! जितकीं जण आली होती परीक्षेला त्या सगळ्याकडे मोबाईल होते आणि तो मोबाईल आता बॅगतच ठेवणार….आपोआप बॅगेला किमंत प्राप्त होणार…तीचं बॅग इथे या बाहेरच्या आवारात ठेवायची म्हणजें… "अहो किमान वर्गाबाहेर तर ठेवू दया….","मंडळाने लिहून दिलं ठीकं पण आजकाल मोबाईल….","नुसता मोबाईलचं नाही अजूनही ब-याच महत्वाच्या गोष्टी असतात बॅगेत…" एक ना अनेक बोलणं कानावर येतं होतं…अनेक जणाचें मेंदूवडे अर्धवटचं होतें…अश्या बॅग्या कश्या बाहेर ठेवणार…तिथं गेटवर सिक्युरीटीवालांना कागद दाखवला तरी कोणालाही प्रवेश देतात…आणि आतमध्ये येवून बॅग घेवून गेला तर…इथं बॅग ठेवून आत जायचं कसं…साडेआठचे नऊ वाजत आले….मोबाईलमुळे अस्तित्व असलेल्या आमच्यासारख्या "सुशिक्षित" लोकांना हे असं बाहेर बॅगा सोडायचं तेही कुणाच्या जीवावर?.... तर या सुरक्षकाच्या भरोश्यावर….! जे काहीवेळापूर्वींचं आळसावलेत त्याच्यांवर…पुढारीपण करणारी लोक त्या महाविघालयाच्या सूचनाधारी मंडळीशी भांडत होतें…”असं कसं करता तुम्ही म्हण्याऱ्यांना "आम्हाला तश्या ऑर्डर आहेत” यांची उत्तर तयार….मागच्या दहा मिनिटापासून हेच चालू होतं.“…आणि हॉलतिकीटवर लिहिलं देखील होतं…काही आणू नये…”, “नेमकं अशा सूचना बनवणारे कुठल्या जगात राहून हया सूचना बनवतात त्यांनाच ठाऊक…”, “आता नाही म्हणायला ही सगळी कामाधंदयाला जाऊन परीक्षा देणारी बहुतेक तरुणमंडळी... मोबाईल तर आणारच ना…अजून काही मत… एव्हाना रांगा तयार झाल्या होत्या….हॅअ….काहीजण तयार ही झाली बॅग अशी बाहेर ठेवून आत मध्ये परीक्षा दयायला …अं…हे काय ..टाटा…ओ नो….त्या प्रवेशदवाराच्या पलीकडून बाय करणारे…अरे हे तेचं सगळें जण आहेत जे आपल्या आई-वडीलांना सोबत घेवून परीक्षा दयायला आलेले….आता मला माझी कीव येत होती….मी आता त्या पालकांकडे बघत होतो….काही पालक जरा जास्तच तरुण वाटले….नाही ही प्रियकर मंडळी… आता प्रेमात पडलेल्याचें फायदे बघत आपण कश्या कश्यात कमी पडलो याला दोष देत मग मी ही आवरातल्या एका आसनाखाली माझी बॅग ठेवली…त्यांच्या तपासणीला सामोरा गेलो.  मशीन हातात घेवून अंग आणि खिसे चेक केल्यानंतर अखेर पाचव्या मजल्यावरच्या परीक्षेच्या खोलीच्या दिशेने आगेकूच केली…तरी सव्वानऊ झाले होते…आपली बॅग कोणी घेवून तर जाणार नाही ना यांची तर भीती मला काय सगळ्यानां होती….फक्त ज्यांचे पालक आणि प्रेमिका सोबत आले होते त्यांना ही फिकीर नव्हती…त्यांत पेपर लिहायचा आहे कसलहीं टेशन न घेता... खालती ठेवलेल्या बॅगचंसुद्धा… 
      दोन पर्यवेक्षक अगोदरच प्रश्नपत्रिका-उत्तरपत्रिकेसह वर्गात हजर होते…तीस मुलांसाठी दोन पर्यवेक्षक जरा जास्तच होते…अजून दहा मिनीट बाकी….मी माझा क्रंमाक शोधत बाकापाशी आलो आणि बसलो…आणि बघतो तर काय वर्गाच्या थेट समोरच्या खिडकीतून दिसणारा अंथाग समुद्र. माझ्या सारख्या मुंबईच्या ईशान्य टोकाला राहणा-याला, खाडी आणि तलावाशी ओळख असणा-याला अश्या लाटा डोळ्यांनी बघत पेपर लिहण्याची (नाही निव्वळ गोळे करण्याची!) ही पहिलीचं वेळं. इथं बाकापाशी ओळखपञक आणि हॉलतिकीट वरचा चेहरा तपासणं चालू होतं. मागच्याबाजूला खिडकी आणि रहिवाशी इमारतीचा परिसर. वर्गात समोरचा फिकट हिरवा दिसणारा दिसणारा फळा…ब-यापैकी परीक्षार्थी गैरहजर होते….त्यामुळे वर्ग जरा जास्तच मोकळा वाटत होता…इकडे तिकडे विचारत खाणाखुणा करत एकमेकांना उत्तर विचारायचा संबधच नव्हता…. उत्तर आणि दक्षिण दिशेला दोन वेगवेगळ्या विषयावरच्यां परीक्षाबददल, दोघांनाही एकमेंकाबददलच्या विषयाबदल काही माहित नसणार…कोण सोशलवर्क, कोण इकॉनामिकस, कोणी आर्टस…कोणी आमच्या सारखं कार्मेसवालं…त्यातहीं प्रत्येकाला वेगवेगळें सेट ए,बी,सी,डी…म्हणजें खरी परीक्षा…आता मला त्या शिक्षणमंडळाच्या अधिका-यांचा बुदधीची क्षमता कळून आली होती…. पहिला पेपर सव्वातासाचा म्हणजे पावणेअकराला संपणार….आणि साठ प्रश्न त्यातलं पन्नासाची उत्तर दयायची.. फक्त उत्तरपत्रिकेतील प्रश्नक्रंमाकासमोरचा योग्य पर्यायाला उत्तरपत्रिकेत गोल रंगवायचा…काही वय, आकडेमोडे, लॉजिकवाले प्रश्न, मानवी व्यवहार, परिच्छेदावरुन उत्तर…इंग्रजीत प्रश्न नाही समजला तर हिदींतही बाजूच्या पानाकडे बघा…म्हणजे अजून डोकेदुखी… काही गोल प्रामाणिकपणे भरले….काही नुसतेचं नकळत भरले…काही प्रश्न दिमागाची हटवणारे…जागतिक प्रदुषण, संगणकाचे भाग, बायनरी कोड, दूरजवळची अंतर, आई-वडीलाच्यां वयावरुन मुलाचं वय, भारताचे संविधान, रिसर्चचे प्रकार…काहीच्या उत्तराबदल शाशंक होतो…”अजून पंधरा मिनिट आणि वीस प्रश्न बाकी”…. काहीच समजत नव्हतं कुठलचं लॉजिक कामी येत नव्हतं….बर झालं निगेटिव्ह मार्कीगं नव्हतं…नाहीतर रिझल्ट निगेटिव्हमध्येच!…आता काय करायचं…कशी दयायची उत्तर…समोरच्या समुद्रावर नजर होती…खेळ ठरला मनाचा….समोरच्या प्रश्नांपैकी सगळ्यात जवळचे वाटणारे दोन पर्याय मनात आणायचे….डोळे बंद करायचे…आणि त्या पाचव्या मजल्यावरुन दिसणा-या लाटामध्ये जो पर्याय दिसणार…तो रकाना रंगवायचा…घडाळ्याकडे नजर होती… विचार करायला वेळ नव्हता…जो दिसेल तो गोल रंगवत होतो….नेमकं तिकडें बेल वाजली आणि इकडं लाटेतं दिसलेला शेवटच्या प्रश्नक्रमांकासमोर ‘सी’चा गोल रंगवत….दिला एकदाचा पन्नास उत्तराचा खेळ नशीबावर सोपवून… 
      पहिला पेपर कसाबसा संपला…पुढचा पेपर सव्वाअकरा वाजता….म्हणजे आता अर्धांतास मोकळा… पुढच्या पेपरमध्ये प्रश्न पन्नास आणि सगळे सोडवायचे….एवढे दिवस केलेल्या अभ्यासातलं एवढसं पण आठवत नव्हतं…मनातल्या मनात रिविजन काय डोबंलाची करणार….समुद्राला संमातर दिशेने असलेल्या वीजेच्या तारावर सरळ रेषेत काही पक्ष्यांचा येण्याजाण्याचा खेळ मागच्या काही तासापासून मी पाहत होतो. मगाशी गोळे रंगवायची लगबग होती…आता थोडं निवांत होतो. कश्याचंच बंधन नंसण….हव तसं जंगण….मुक्तपणे….इतक्या उंचावरुन आजूबाजूचा रहाटगाडा पाहत बसायचं…काय मजा येतं असेलं ना. या पक्ष्यांना खंरच काही गुपित माहित असतील…त्यांना मन असेल…त्यांनाही माणसांबदल…आजूबाजूच्या जगाबददल…प्रश्न पडतं असतील... का फक्त खा, प्या आणि उडा एवढचं…काहीतरी खूणागाठाबांधून विश्वनिर्मात्याने त्यांना इथं निर्माण केलं असेल नाही का… मनात विचाराचं काहूर वाढतचं चाललं होतं…समोर लाटा खूपचं जोरजोरात किना-यावर येतं होत्या. आता मात्र जोरदार पाऊस सुरु झाला आणि त्या वीजेच्या ता-यावरुन पक्ष्यांनी एक-एक करत उडून जाऊ लागले….काहीनीं वर्गासमोरच्या खिडकीजवळ आसरा घेतला आणि पुन्हा एकदा त्याच्यां स्वातंत्र्याची कीव येत होती…आपण का परीक्षेला आलोय याची जाणीव झाली…शेवटी पैसा कमवायचायं….एक आसरा या ऊन, वारा, पाऊस याच्यांपासून बचावासाठी….या जगाच्या रहाटगाडयाच्यां चाकात आपण कसं गुरफटलोय ते कळून चुकलयं…पुन्हा दुसरा पेपर सुरु झाला….मात्र पुन्हा हा देखील पेपर कठीण जात होता….आणि पुन्हा उरलेल्या पंचवीस प्रश्नांना समोरच्या समुद्रमंथनातून येणा-या ए,बी,सी,डी मधून निवडायला तयार झालो…इकॉनामिकस, बेसिक अंकाऊटस, डिमाडं सप्लाई करव, कॅपिटल गिअरिंग रेशो कशाचाच थांगपत्ता लागत नव्हता. यावेळी मात्र लाटासोबतचा खेळ फार कमी वेळात संपला…. मात्र सकाळी त्या इतर मुलांनी का मिसळपाव, मेंदूवडे खाले याचीं प्रचिती मला आता सव्वाबारा वाजता येत होती…किमान चहा तरी प्यायला हवा होता पोटात कावळे ओरडत होतें…शेवटी बेल वाजली.

     आता तिसरा पेपर दोन वाजता म्हणजे दीड वाजतावरती यायचं… मी आता पहिल्यादां वर्गाबाहेर आलो. म्हटलं आता खिडकीसमोरुन नको…थोडयाश्या वरच्या बाजूला असलेल्या पाय-यावरुन बघितलं…ओ मॉय गॉड….आजूबाजूच्या झाडीनीं वसलेल्या त्या भागात आता समुद्रकिनारा स्पष्ट मोठाला दिसत होता….वाळू मध्ये उनाडग्या करणारी टपोरी पोरं, किना-याच्या वरच्या बाजूला असलेलीं झोपडपटटी, कुणाचंही न ऐकणा-या आपल्याच नादात असलेल्या लाटा म्हणजे वर्गातून जे बघतं होतो ती झलक होती तर….इतक्यां उंचावरुन समुद्र दररोज बघता येणा-या समोरच्या त्या झाडी पलीकडल्या इमारतीमधल्या लोकाचं मला खंरच हेवा वाटत होता सकाळी झोपतून उठल्या उठल्या समोर रिफरेश करायला समुद्र दिमतीला…वा! या कॉलेजमध्ये इजिंनीअरिगं करण्याला येथून समुद्र पाहत शिकताना किती मजा येतं असेलं….मी आता येथेच रमत बसणार…इतक्यात कुणीतरी खालती असलेल्या बॅगाची आठवण करुन दिली आणि मी भानावर आलो. 
      लिफ्टच्या जवळ आधीच खूप गर्दी होती…. मग पाच मजले उतरत धावत-धावत खाली उतरलो….बॅग सुरक्षित ठिकाणी होती…या शिपाई लोकांनी खूप मोठं काम केलं होतं…लोकांची अस्तित्व सुरक्षित ठेवण्याचं….सोबत बॅगेतून आणलेली बिस्किट खातं मी माझ्या प्रश्नप्रत्रिका बघत चुकींच्या उत्तराची चहलपहल करत होतो. इकडे त्या कॅटीनपाशी भलीमोठी दोनशे लोकांची रांग सुरु होती. कॅटीनवाले सुदधा पूर्ण तयारीनिशी होते. या दुस-या पेपरशी निगडीत थोडीफार फारकत जरी असली तरी मिळता-जुळता असलेल्या अभ्यासक्रमाशीं तिसरा पेपर….अजून काही डोक्यात साठवायला मन तयार नव्हतं…तरीदेखील जेवढं वाचता येईल तेवढं वाचतं होतो…इकडे लग्नसंभारभाप्रमाणे त्या सगळ्या आवरात लोकांची खाण्याच्या त्या ताटासकट जागा मिळवण्याची भूपाळी जेवणावेळेची तगमग ईथेही होतीच. माझ्या शेजारी बसलेल्या एकाचं बॅगेतून डबा काढत घास खातं-खांतच फोनवर बोलणं चालू होतं “अरे पहिला पेपर नीट गेला ….दुस-यातलं काहीचं येत नव्हतं…जो मागच्या वर्षी पास झाला असेल त्याला देखील यंदाचा पेपर सोडवता येणार नाही” आजूबाजूला सा-याचीं माझ्यासारखीच अवस्था आहे…मनाला धीर येणं म्हणजें काय तर हे….आपल्यासारखीच दुस-याची अवस्था असेल तर आपलं आता काय होणार याची काळजी वाटून राहत नाही…काहीजणांनी कित्येक वर्षापासूनची सहभोजनाची हौस या निमित्ताने भागवून घेत जमिनीवर बैठक मारली. “अरे बॅगा किमान वर्गासमोर ठेवायला दिली पाहिजे होती”…सकाळचं पालुपदं आताही चालूं होतं. काहीजण आता तेथल्या सिक्युरिटीशी वाद करत होते आणि तो देखील तितक्याच आत्मविश्वासाने “काही होणार नाही, इथं कोण येणार नाही…” आपली बाजू लावून धरण्याचे काम करत होते. “इथे सीसीटीव्ही सुदधा नाही आहेत, उदया काय चोरीला गेलं म्हणजे?”तेचं मगाचे पालक व प्रेमियुगुलाचां समुदाय भुकेलेल्या परीक्षार्थीनां बघुन त्यांच्या प्लेटीतला मेंदूवडा उचलत “वरुनचं तशी नोटीस आलीय…वरुन ऑर्डर आली म्हणून काय झालं….थोडातरी कॉमनसेन्स राखा…” आता सकाळपासूनच्या बाता आता भरपेट करत होते इतकेच….मॅनेजमॅटकडे यांची उत्तर नव्हती. आता पोट भरली होती…प्रेमीयुगुल अजूनही पेपर मधली उत्तर तपासण्यात मश्गूल होती…त्यांनाच खरी आपल्या जोडीदाराच्या भविष्याबदल चितां होती. आणि पुन्हा एकदा आपल्या बॅगा ठेवत खिसे आणि इतर तपासणी करत आतमध्यें सोडण्याचें काम सुरु झाले. आता पुन्हा काय चेक करायचं पण मॅनेजमेंटला कोणताही धोका पत्करायचा नव्हता. एखादा महाभाग मागच्या पेपरचा अनुमान घेत येणा-या तिस-या पेपरसंबधी नोटस घेवून गेला तर…. त्या गर्दीत काही जण आपला रोष “मागच्या दहा वर्षांपासून ही परीक्षा देतोय पण असा गोधंळ बघितला नव्हता असं म्हणून व्यक्त करत होते…” अजून दोन-तीन आवाजांनी तर अकरा, बाराचा आकडा सांगितला…आणि आपल पण असंच होणार की काय असं वाटू लागलं. दीड वाजायला अवकाश होता…मी पाचव्या मजल्यावर येवून पुन्हा समुद्र पाहत होतो…किना-यावर त्या दुपारच्या उन्हात कोणीही नव्हतं….इथे माझ्या शेजारी आणखी काहीजण हा नजारा पाहत होती…मला क्षितीज हा प्रकार फार भयानक वाटतो…जे खरचं कधी होणार नाही…जे दोघ कधीच एकमेकांना भेटणार नाहीत ते भेटल्यासारखं वाटणं…डोळ्याना सुखावणार, दिसणारं…असत्य….. एका ठराविक ठिकाणावर संपून गेला असावा वाटणारा हा समुद्र स्वत:सोबत किती-किती अनादी वर्षांपासून इथे पृथ्वीवर होण्या-या स्थित्यांतराचा साक्षी असेल ना…..आपणही एक दिवस नष्ट होऊ…जाऊ यांच्यातच मिसळून तरीदेखील हा इथेच असेल… लाटामागून येणा-या लाटा…यांला माहिती असेल का यांच्या अस्तित्वाचा सुरवातीचा काळ…त्यांने राखून ठेवलेली अनेक गुपित….लाखों किलोमीटरवरच्या चंद्राबरोबरचं त्याचं नातं…पुढेही टिकून राहिल का हे आकर्षण….
      पावणेदोन वाजले…. आतमध्ये वर्गात येऊन बाकावर बसलो पण अजूनही लाटा दिसत होत्या….इकडे कूजबूज सुरु झाली की हा पेपर सोडवायला केवळ एक-दीड तास पुरेसा आहे…सगळे अनुभवी परीक्षार्थी….मला आश्चर्य वाटलं कसं शक्य आहे… यावेळी पंच्याहत्तर प्रश्न…. सगळे सोडवायचे आणि अडीच तास….…पेपर सुरु झाला. पहिल्या एक तासा नंतर तीन दहाच्या सुमारास काही जणानीं आपली गोळे करुन झालेली उत्तरपत्रिका पर्यवेक्षकांकडे जमा करत बाहेर निघालेसुदधा मात्र त्यांना प्रश्नपत्रिका बाहेर नेण्यास मनाई होती ती ईथेच पर्यवेक्षकांकडे जमा करावी लागणार होती जर साडेचार वाजेपर्यंत थांबल्यात तरच प्रश्नपत्रिका नेता येणार होती (शिक्षणमंडळाचे वरुन आलेले आदेश काय करणार!), काहीजणं साडेतीन, पावणेचार वाजता जायला तयार झाले…पणं प्रश्नपत्रिका पुढच्या परीक्षेच्यावेळी अभ्यास करायला उपयोगी पडेल म्हणून साडेचारपर्यंत बसून राहणार होते….मला शिक्षणमंडळाच्या आदेशापासून…पुढच्या परीक्षेवर अवलंबून राहणा-या माझ्यासारख्या सगळ्याबदल हसूं येत होतं… सुटण्याअगोदर दिली असती प्रश्नपत्रिका घेवून जाऊ तर कोणता मोठा प्रश्न उभा राहणार होता…नेमक्या कुणाला त्यामुळे कॉपी करायला मदत होणार होती… हया प्रश्नपत्रिका ठेवून निघून गेल्यावर काही दिवसातं नेटवर उपलब्ध झाल्या असत्या, हा आमचा मूर्खपणा, जे आम्हाला त्याचं आपण सोडवलेल्या प्रश्नपत्रिका हव्या होत्या….चार वाजले…मी पुन्हा एकदा शाशंक होतो…पंच्याहत्तर मधले अजून बरेच प्रश्न मी मनाच्या आणि समुद्रमंथनातून लाटेवर येणा-या उत्तरावर सोडून दिल्या. मनी आणि कॅश मार्केट ते मोड मिडयन, बॅका, त्यांची स्थापनासाल, आंतराष्ट्रीय नाणेनिधी, पुन्हा डिमाडं स्पलाय, इलास्टीसीटी संगळ... संगळ…काय बरोबर?....काय चूक?…चारीहीच्या चारी पर्यायबरोबर….कोणतेतरी दोन निवडा…आणि.…. खेळ सुरु. इकडे माझ्या उजव्या बाजूकडील दोन महिलामंडळीनी सगळे गोळे रंगवून झाल्यावर आपआपसात चर्चासत्र सुरु केलं आणि आता यांत कोणत्याही गनिमी कावा नसल्याचं पर्यवेक्षक मंडळीना लक्षात आल्यानं त्यांनीही दुर्लक्ष करत त्यांना मूकसंमती देऊन टाकली….बरं चालं होत त्यांच…बाता पेपरावरुन महागाईवर आल्या होत्या…दोघीही सगळी उत्तर अंदाजे लिहिल्याचं बोलत होत्या…सव्वाचार वाजले…मी ही आता वैतागलो होतो…परीक्षा मनासारखी गेली नव्हती…आता पुन्हा एकदा पहिल्यापासून अभ्यास करावा लागणार असचं वाटतं होतं…पाऊस वाढतच होता….आणि खिडकीच्या बाजूच्या तावदानावर येवून बसणा-या पक्ष्याची संख्या वाढत होती….इतक्या उंचीवरुन समुद्राच्या लाटा आणि परीक्षा असा माहौल पुन्हा येईल का माहित नाही…
     शेवटची बेल झाली…आणि तीन पेपरसह मी ही मागच्या अनेक महिन्यापासूनचा डोक्यात साठवलेल्या अभ्यासचां भार हलका करत इमारतीचे मजले उतरत खाली बॅग शोधू लागलो…मागच्या अडीच तासामुळे…डोक जरा भ्रमिष्ट झाल्यासारखं वाटतं होतं…कोठे ठेवली…इथे..नाही….हा…सापडली… बॅग सापडली…मोबाईलही होता…बॅगा अडकवतं खूप जणं पेपर सोपा-कठीण असल्याचं एकमेकांना सांगत रस्त्यावरुन चालत होती…आता पुन्हा समुद्र उंचावरुन पाहत वेळेशी बांधील राहत…लाटाच्या मदतीने सोडवलेली उत्तर….पुन्हा कधी माहित नाही? बाहेर पाऊस नव्हता. ओलसर रस्तावरुन चालत, यावेळी गुगलमॅपची मदत न घेता मेट्रो गाठली…. “पेपर कसा गेला?” या घरच्यांच्या प्रश्नाला काय उत्तर दयावं यांचा विचार सुरु झाला…

-आशिष अशोक  गुरव .
********************** कथा आवडल्यास अभिप्राय (कॉमेंट मारा) नक्की कळवा ***************
       ******************* Please comment if you like the story ***************
( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before  publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online  ,must be shared in totality . ) 

Sunday, 31 July 2016

माझं मन- कविता

                                          माझं मन

 स्वतःच्या शोधात
   मनाच्या डोहात
    खोलवर जात
      तळ गाठत
        ओजंळीत सापडेल
          तेवढं घेऊन 
             काठावरती….
               गुदमरलेला श्वास घेत
                  सापडलेली पुंजी
                     एक एक करत उलगडत…
                  चिकटलेली जळमट
                दोन-चार रुसवे-फुगवे
             थोपवलेल्या आणा-भाका
          पश्चातापाच्या फुगीर खुणा
        फुशारकीच्या फाजील बाता
  वर्चस्वाची छुपी लढाई
आणि गलितगात्र झालेला स्वाभिमान
  या सगळ्याचा…
     काठावरती हिशोब मांडत
          काय खर अन किती खरं
               विवेकवादाशी फारकत घेत
                   जुना मामला झाकत
                        नवा मुलामा लावत
                           पुन्हा एकदा तयार केलं मन
                             रस्त्यावरच्या खडडयापासून
                                खटकणा-या स्पर्शापासून
                            पदोपदी होणा-या अपमानासाठी
                         जातीपातीच्या राजकारणासाठी
                      आरक्षणाच्या टक्कयासाठी
                   सगळ्यासाठी तयार केलं मन
               सोशलसाईटवरच्या हॅशटॅगसाठी
           सरकारला निव्वळ दोष देण्यासाठी,
           माणुसकीला कॅमेरात कैद करण्यासाठी
           गरीबीचे फोटो घेण्यासाठी
           अपघाताचे विडिओ अपलोड करण्यासाठी
           सगळ्यासाठी तयार केलं मन
        दुभंगलेलं माझं मन पुन्हा एकदा
      थकत आणि स्वतःच्या शोधात
    मनाच्या डोहात
  खोलवर जात
तळ गाठत……
                                                          -आशिष अशोक गुरव 

********************** कविता आवडल्यास अभिप्राय (कॉमेंट मारा) नक्की कळवा ***************
       ******************* Please comment if you like the poem  ***************
( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before  publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online  ,must be shared in totality . )