हा देश रोडी पाहताना...... ' बस' ना आता ! !
एव्हाना कामावरती ठरवून लवकर निघायचं आणि फक्त
दहा रुपयांच्या तिकिटात केवळ दहा मिनिटात संपणारा प्रवास एक तास करण्यातली मजा ‘टॉफिक’
नावाच्या मानवनिर्मित समस्येचा 'वाहनसंख्याची वाढती गर्दी आणि अंरुद रस्ते' यामुळे घडणारा
हा एथेच्छ प्रवास ‘घरातील बायकोसोबतच्या भांडणाच्या कटकटीपासून सुटका’ या वैश्विक समस्येशी
केलेली उत्तम तडजोड अन्यत्र कुठल्या देशात होत असेल असे वाटत नाही, आपण सुरवातीच्याच
स्थानकात सगळ्यात मागच्या सीटवर मधोमध बसलो की अगदी पार बुध्दीबळाच्या पटावरच्या राजासारखं अगदी निवांत वाटत मात्र प्रत्येक उंचवटयासरशी आम्हाला एक-दोन फूट सहज हवेत उडवत स्काय जम्पचा अनुभव बससेवेत मिळवून देत. एकमेकांचे हात पकडत समोपचाराचा उत्सव करत मागच्या सीटवरचे आम्ही सारे जण एकाचवेळी उंचवटयाचा अंदाज घेत उभे राहलो खरे पण समोर उभे असलेल्या काही महाभागांनी आमच्या जागा बळकवण्याचा प्रयत्न करत घुसखोरीचे प्रकार आजकाल वाढ चाललेत ते काही उगाच नाही यांचा प्रत्यय आणून दिला, मग हळू-हळू वाढणारी तुडूंब गर्दी निव्वळ चेहऱ्यासमोर बेलबॉटम पॅन्टसचे देखावे आणत एकामागोमाग स्थानकासोबत अक्षरशं धृतराष्ट्रच्या डोळ्यांनी
महाभारत पाहिल्याचं सुख देतात. कोणत्याही महिनाचं लक्षण न दाखवता वाढीव पोटाच्या दिशेने बॅगा घालून आपले आहाराविषयांची संतुलन लपवणारे व वाढत्या गर्दीतही महिला आरक्षित सीटवर न बसू पाहणारे "संस्कारी आणि संयमी" पुरुष मनावर कश्याप्रकारे ताबा राखतात हा संशोधनाचा वैगरे विषय नसून स्त्रीयांच्या
अदृश्य दहशतीचा आणि वाचाळ रणरागिणीपणास सामोरे जाण्यास हतबल झाल्याचा परिपाक असल्याचं
एकूणच प्रवासा अंती दिसून आलं, तर काही पुरुषांनी मात्र भरबसमध्ये पुन्हा जागेवरुन
उठताना होणारी दुशासनी अत्याचार कोणताही पुरुषांस सहन करण्यास जड जात असल्याचे प्राजळंपणे
कबूलही केलं. विशेषत: मुंबईच्या 'शनीशिणंगापूर'स्टायल बिनदरवाजाच्या घराची आठवण करुन देणा-या
बसेस मध्ये स्त्रियांच्या वाढत्या वावरामुळे मागच्या बाजूने उतरण्यातला हिरोपणा जपणा-या पुरुषाच्या चालीरीतीवर बंधने येणे हे खरोखरच बससेवेचा प्रवास नेमका कुठल्या दिशेने सुरु
आहे हे दिसून येते. नव्याने विकसित झालेल्या तरुणपिढीला बसच्या उभा प्रवासातही आपल्या
मोबाईलमधल्या गेमची स्टेप पार करताना, स्क्रीनवर दिसणा-या प्रत्येक मॅसेजला रिप्लाय देताना तोल जाऊ नये म्हणून नवीन ‘स्टॅड’ब्लेट नावाच्या उपकरणाची जोड बसवाहुतकीने दयावी ही नम्र विंनती.
प्रवासीय
झोपेची तर मजाच न्यारी कुठल्यातरी नेहमीच्या गाणाची प्ले लिस्ट कानाला अडकवून समोरच्या जगास बधीर आणि बहिर बनवत पार सायलेंट मोडवर नेत जाम ताणून
देत आपल्या डोक्याला सहप्रवासाच्या खांदयाचा आसरा करत मस्तपैकी सुखासीन होत पुहडून
दयायचं आणि “स्टापलरी टू प्रिनटरीं रुपातंरीत झालेल्या एसटीडीटाईप हलकी यंत्र” झोळीसारखी
खांदयाला अडकवून सीट बाय सीट फिरणा-या, खाकी पोशाखातील अजून एक पेशा दाखवणा-या आणि
ख-या अर्थाने माणसांत राहणा-या,
कंडक्टर नावाच्या फक्त भारतभूमीवर सुटया पैशासं गाफील असलेल्या या समुदायाच्या “तिकीट
बोला तिकीट” या प्रसंगीय समस्येस समोर आल्याचं दिसताच, कंडक्टरला काही लोक देशाचे पंतप्रधान
समजून महागाईविषयी तक्रार करत “तीन गरम मसाला सत्तावीस रुपये, पाच ‘चार बंगला’ फक्त पंच्चेचाळीस रुपये, दोन
हाफ कॅडबरी दहा रुपये, एक आय.आय.टी बारा रुपये” यासांरख्या मागण्या करतात
तेव्हा या अशक्यप्राय मागण्यांना तितक्याच बेमालूमपणे कोणत्याही खोटा अविर्भाव न आणता
केवळ सुटया पैंश्याची वादविवादीत विचारी फरक ठेवत कशी काय परतफेड करत पूर्ण करतात यांची चौकशी थेट सरकारने करावी ही विनंती
अन्यथा उदया एखादा या मागण्या-पुरवठयाच्या जोरावर खरोखरच पंतप्रधान झाला तर त्यांचा
दोष आमच्या सारख्या दक्ष नागरिकास नको. या सा-यात आपण मात्र दोन्ही पापण्यानां ‘झापत’
अनोळखीपणाची झालर ओढत समाधीअवस्थेत(नाटकी झोपेत) निघून जायचं, किंवा या पराधीन जगाचा
एकूणच गंभीरपणे विचार करण्याचा आव आणत आपली नजर अचानकपणे मागे वळवत “सम्या माझं पण
काढ तिकीट” असं आत्मविश्वासपूर्ण म्हणत ‘अनोळखी प्रवाशांना आपलसं करुन’ घेण्याचा वारसा
जपत केलेला केविलवाणा प्रयत्न विनातिकीट प्रवास करण्यास मदत करतो, अर्थांत शेवटच्या सीटवर बसून खिडकीवर तोंड आपटून कपाळमोक्ष करण्याचा शहाणपणा अद्याप होणे नाही.... कधी कधी या तिकीट
परीक्षेत "पास आहे" अस दाखवंत गुपचूप आवरत घ्यायचं आणि जर खरोखरच पास मागितला तर मात्र
“अरेच्चा हा तर जुना पास” असं गंधर्व आठवणीचा
स्वर काढत म्हणायची खोटी की कंडक्टरच्या चेह-यावर 'राग' जमा झाला म्हणून समजाच. आणि इच्छित
स्थळ गाठल्यानंतर बस मधून बाहेर पडल्यावर होणारा पैसे बचतीचा आणि गनिमाकावा यशस्वी
झाल्याचा ओतप्रोत आनंद कामावरती काम न करण्यास अजून उर्जा मिळवून देतो, आणि हा प्रवास जरा अजून जास्त किलामीटरचा
हवा होता असा मोह घालण्यास भाग पाडतो.
आजूबाजूच्या
सहकाऱ्याबदल तो नसताना मस्तपैंकी
गॉसिप करत उदयाच्या दिवशी काय ऑफिस पॉलिटीक्स करायचं यावरचं डिसकशन संपताच कामावरुन
निघाताना, देखील याच टॉफिकमुळेच आपल्याला बस-स्टॉपपर्यंत चालत न जाताच ऑफिसपाशीच आपली
बस योग्य वेळेत मिळाल्याचा आनंद अन्य कोठे होत असेल असे वाटत नाही. कधी-कधी होणारा खडडेमय प्रवास हा मनुष्यप्राण्यांनी चढ-उतारांचा अनुभव गाठीशी राखावा यासाठी
सरकारने केलेले दुर्लक्ष खरोखरच व्याख्या’ना’ लायकच. शिवाय एकूणच एक्सेल वर्ल्डच्या
राइडचा आंनद देणारा, आणि त्यानिम्मित्ताने उचंबळून
आलेले समाजमन हे आपल्या पुढील दोन वाहनांस हवेतल्या हवेत काही फूटभर ओव्हरटेक करण्यास
प्रवृत्त करत, काहीवेळा गुरुत्वीय बलाशी स्पर्धा करत आकाशीय उपग्रहानां भेट नक्की घउवून देण्यास
कारणीभूत ठरत स्वर्गवासी होण्याची संधी देत मोक्ष मिळवून देतात. इथली सरकारे अध्यात्मिक
बनत चालल्याची लक्षणे अजून काय? अर्थात भौतिक जगातील लोक यांस मरण का बरे म्हणतात हे
कोडेच आहे.
रस्त्यावरून धावणा-या दुमजली बस ज्यास काही लोक
भरपेट बसगाडया म्हणजेच डबलढेकर बस म्हणतात, या खास विमानतळ आणि विमाने दाखवण्यासाठी असतात हा
समज नसून ती प्रत्यक्ष व्यवहार्य
गोष्ट असल्याचं दिसून येत. वरच्या मजल्यावरील सुरवातीच्या सीटवर बसून हातात स्टेरींग
न घेता गाडी चालवल्याचा चमत्करिक अनुभव स्वत्वास देण्यासाठी आणि “पराधीन जगाचा” विचार
कायम ठेवत विनातिकीट प्रवास करण्यास कंठिबंध राहत खिश्यातून आणलेली चॉकलेट तोंडात टाकत
त्यावरच वेस्टन बाहेर फेकत हवेच्या मस्करीच्या मूडमुळे डायरेक्ट डॉइव्हरच्या तोंडात
जाण्याचा चावटपणा घडून आण्यास मदत करतात. ज्यामुळे काही नशिबी विमानप्रवासांना दुदैवी
बस टक्कर अर्थात अपघाताचे ओझरते का होईना दर्शन घेता येते.
इतक्या वर्षाच्या एकूण वाटचालीत बस-थांबा दर्शवण्यासाठी वापरणारी
घंटा हा तर अजून एक कौतुकाचा विषय. पावसाळाच्या दिवसात याच घंटा वाजवणा-या दोरीवर भिजलेले
कपडे वाळत घालण्याचा केलेला एक अवघड प्रयत्न अयशस्वी झाल्याचं दुख होत, आणि तुमच्या
मनात असलेले ठिकाण जर बसथांबा नसेल तर हलकेच जागेवरुन उठून त्या दोरीच्या दिशेने हात
नेत ओढायची आणि पटकन गाडीतून उतरत नंतरच्या शिव्या-लाखोल्यास बांधील न राहत मागच्या
मागे पसार व्हायचे यातली मजा काही औरच. पावसात काहीवेळा बसच्या टपामधून गळणारे पाणी ही “इथेच खोलू दया छत्री आता” या अनोख्या विडंबन कविताप्रयोगाच्या प्रत्यक्ष अनुकरणास वाट खुले करण्याचे आवाहन देते मात्र
कंडक्टरच्या आवाजी आणि अवाजवी
दक्षपणामुळे ते अदयाप होणे नाही.
आपण वाटत पाहत असलेली बस जर बिनापाटीची (कापडी
पडदयावर नाव नसलेली पाढं-या कापडयाची) आणि क्रंमाकाशिवाय येत असेल तर ती नक्कीच आपल्याला
निश्चित स्थळी सोडेल याची खात्री एव्हाना बसप्रवासाने तुम्हा-आम्हां सर्वांना करुन दिली असेलच. तरीदेखील आजच्या सुधारित बसस्टॉपवर
छप्पर आणि स्थानक माहितीच्या पाटया नसल्यामुळे दुपारच्या रणरणत्या उन्हात तारकासमूह
पाहण्यास निघणा-या आमच्यासारख्या भंम्रतीवीराचां भ्रमनिरास होण्याची दाट शक्यता (सामाजिक
प्रश्नांची गंभीर खगोलीय दखल अजून काय) तयार करते. बसच्या रांगेत उभं राहणं हे वेळ वाया
घालण्याचं लक्षण असून एखादया वयस्कर आजीआजोबांना रांग सुरु होताच “अहो या वयात का लाईनत”
असं म्हणत त्यांना जबरदस्ती रांगेतून बाहेर काढत पुढील बाजूच्या दरवाजाने बसमध्ये शिरकाव
करण्यास मदत करत त्यानिम्माताने चालून आलेली संधी दवडत आपणही आपली सीट काबीज करावी
अन भविष्यात कधी राजकारणात प्रवेश झालाच तर “बंडखोरी” या नियमित राजकीय समीकरणाशी दुरावा
नको म्हणून अनुभव गाठीशी असावा यासाठीचा सारा अटटाहास असं हलकंच मनास चिमटा काढत समजावावं.
मात्र यामुळे काही तथाकथित सरळमार्गी वाटणाऱ्या लोकांचा खरा शिव्या-शापी
चेहरा दिसून येतो, तो न बघता आपण मात्र पराधीन जगाच्या विचारात निघून ज्यावे.
काहीवेळा मात्र जहाजावरील नेव्हीची सहा-सहा महिने
सुटटी असणारी नोकरी संभाळत उगवणारे, बसच्या लाल रंगाशी प्रतारणा करणारे, जलवाहुतकीच्या
रंगाशी साथ देणारा पोशाख परिधान करत बसचा आर्थिक बोजा होवून बसलेले आणि प्रवाशाला चोरात
रुंपातर करणारे ज्यास हा समाजीय परिकोष तिकीट तपासनीस या नावाने ओळखतात त्यांच्या येणाने
बिथरुन न जाता निसटण्याचा मार्ग
शोधत वाट काढावी अन ती ही संधी नसेल तर “तिकीट काढयाच राहूनचं गेल की हो” असं म्हणत
“ही ही” चा गजर करत कंडक्टरकडे वळावं, एका मोठया कागदी तुकडयाच्या बदल्यात छोटया तुकडयाची
न समजणारी देवाणघेवाण करत किंवा मग आपण “मागच्याकडे आहे तिकीट” असं म्हणत पुन्हा थोरपुरुषाचे
पुतळे मनात आणत अगदी शेवटच्या व्यक्तीकडे बोट दाखवावे आणि तिथूनही प्रतिसादही न आल्यास
मग परिस्थिताचा एकूण गर्भितात लक्षात घेत सकाळी वाचलेली 'हनुमान चाळीसा' कामास न आल्याचा
अनुमान काढत, एका मोठया कागदी तुकडयाच्या बदल्यात तितक्याच मापाचा कागदी तुकडा स्वाक्षरीसह
स्विकारत मनाचे गहिवरने आवरत, “दंड” भरल्याचं खांदयाना हुलकावणी देत, सभोवरचा माहौल
आपल्या विरोधात असल्याचं अधिक गडद झाल्यावर निर्लज्जपणाला साक्षी मानून आतापर्यंतच्या
बचतीत किती रुपयांची हानी झाली यांचा मनोमन विचार करत कधी एकदा आपलं स्थानक येतं याची
वाट पाहावी.
बसच्या वाहकांची समोरच्या दिशेने येणा-या वाहकासबोतचा
होणारा संवाद हा आपल्या आपल्या कंडक्टरला “टॉफिक”मुळे कसा माहेरवास अनुभवास मिळतो यांच्याच
गुजगोष्टी करत असावेत यांबाबत कोणत्याही संशयी मनास शंका नसावी. एव्हाना यांच्या संवादसंगमात
आम्हीमग समोरच्या भरलेल्या बसमधील महिला आरक्षित मोकळ्या सीट पाहून वचकवाद किती दूरवर
पसरला आहे यांची जाणीव करुन घेत असता मात्र बसमधील काही पुरुष यांचा संबध माझ्या 'लालसी
स्त्रीदर्शना'शी लावतात तेव्हा या समुदायास आपल्यावर होणा-या दूरगामी परिणामाची जाणीव
नसावी यांची भलतीच कीव येते आणि यांची पुरुषीहदय कमकुमवत तर झाली नाहीत ना यांची मनास
ठेच लागून राहते. समोरचा रस्ता खुला झालेला पाहून आपआपले हात उंचावून मार्गक्रमण करणारे
हे बसवाले कोणत्या “मोकळ्या परिकोषा”चे सारथीपण करत आहेत यांची त्यांना अदयाप कल्पना
नसावी. रात्रीच्या शेवटच्या फेरीसोबत बिनदरवाजाच्या बसच्या सर्व खिडक्या नियमित लावून
गाडीलाही हवा लागू नये यासाठीचा अटटाहास हा शेखचिल्लीचे आधुनिक अवतारांचे नवे स्वरुप
दाखवून देते आणि आम्हालाही टायरचा श्वास अलगद मोकळा करुन चाकाच्या टणकपणा विषयीची चिंता
कमी करत निर्जीवाशी कणव अशीच कायम
ठेवण्यास मदत करते.
``````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````
-आशिष गुरव .
********************** कथा आवडल्यास अभिप्राय (कॉमेंट मारा) नक्की कळवा ***************
( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online ,must be shared in totality . )
( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online ,must be shared in totality . )
No comments:
Post a Comment