Monday, 21 March 2016

विंडबन कविता: गर्दीच्या डब्यात शिरु द्या रे

 विंडबन कविता: गर्दीच्या डब्यात शिरु द्या रे
                  मूळ संदर्भ: (धव्ज विजयाचा उंच धरा रे)
भरलेल्या लोकलचे अर्धे प्रवासी लोंबकळत आहे
गर्दीच्या डब्यात शिरु द्या रे
शिरु द्या रे

फूटबोर्डंमधल्या इंचाइंचातून
सरकण्याचे घडते पलायन
धक्काबुक्कीसाठी खांदे उडवत, चौथ्या सीटचा हेका धरा रे
गर्दीच्या डब्यात शिरु द्या रे
शिरु द्या रे

दुर्देवी ते प्रवासी सारे
हात सुटूनी खाली कोसळले
फॉरवर्ड-लाईकस्तव क्लिप केली अपमान केला माणुसकीचा
गर्दीच्या डब्यात शिरु द्या रे
शिरु द्या रे

वर्तमानपत्राच्या पानोपानी
अपघाताची पसरते बातमी
घोळकाची रे बाजू सावरुन सरकारला शिवी देऊ सारे
गर्दीच्या डब्यात शिरु द्या रे
शिरु द्या रे

भरलेल्या लोकलचे अर्धे प्रवासी लोंबकळत आहे
गर्दीच्या डब्यात शिरु द्या रे
शिरु द्या रे

                  -आशीश 
( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before  publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online  ,must be shared in totality . )

No comments:

Post a Comment